Love Horoscope: मन तिकडं ओढतंय! पण ती वाट सगळं उद्ध्वस्त करेल, या राशींना मोठा अलर्ट
- Written by:Chirag Daruwalla
- trending desk
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Today Love Horoscope 12 January 2025 in Marathi: जीवनात प्रेम महत्त्वाचे आहे. प्रियकर-प्रेयसी किंवा जोडीदार हा आपल्या आयुष्यातील महत्त्वाचा घटक असतो. त्याच्यासोबतचे आपले संबंध कसे राहतात, यावर अनेक गोष्टी अवलंबून असतात. 12 जानेवारी 2025 लव्ह राशीफळ जाणून घेऊ.
मेष : आज तुम्ही खर्च करण्याच्या मूडमध्ये असाल आणि सेन्सुअल गोष्टींवर सढळ हाताने खर्च कराल. तुम्हाला आणि तुमच्या जोडीदाराला आनंदी करणारी कोणतीही गोष्ट करण्याचा तुमचा मूड असेल. तुम्ही दोघंही आज रोमँटिक मूडमध्ये असाल. या छान वेळेचा जास्तीत जास्त फायदा करून घ्या. जोडीदाराला आनंदी ठेवण्यासाठी आज काही भेटवस्तूंचा वापर करा.
वृषभ : तुमचं रोमँटिक आणि घरगुती जीवन सुसंवादी असल्याचं तुम्हाला जाणवेल. तुमच्या जोडीदारासोबत तुम्हाला समाधानी वाटेल, तसंच जोडीदाराविषयी आपुलकीची आणि रोमँटिक भावना वाटेल. यामुळे तुम्हाला आतून ऊबदार आणि शांत वाटेल. तुम्हाला या काही दिवसात छान एकत्र वेळ घालवता येऊ शकेल. त्यामुळे जोडीदारासोबत उत्तम वेळ घालवायचा प्रयत्न करा.
मिथुन : आजचा दिवस तुमच्यासमोर काही आव्हानं उभा करू शकतो. तुम्ही हुशारीने त्यांचा सामना केला, तर तुम्ही तुमचं नातंही मजबूत करू शकाल; पण तुम्ही एकमेकांवर आरोप करणं आणि परिस्थिती नाकारणं सुरू ठेवलं तर नियंत्रण नसलेल्या नावेप्रमाणे तुमचं नातं हेलकावे खाईल. आर्थिक बोजा मर्यादित ठेवण्याचं उद्दिष्ट ठेवा. तसंच एकमेकांसोबत आरामदायी आयुष्य घालवण्याचा प्रयत्न करा.
advertisement
कर्क : तुमचं लक्ष जोडीदाराची आर्थिक परिस्थिती, आरोग्य, सध्याचा मूड किंवा व्यक्तिमत्त्वातले बदल यावर केंद्रित करा. तुम्हाला जोडीदाराच्या मूडबद्दल, त्यातल्या चढ-उताराबद्दल जास्त चांगलं ठाऊक असतं. त्यामुळे तुम्ही जोडीदाराशी पुढे होऊन त्याबद्दल बोललं पाहिजे. परिस्थितीच्या मुळाशी जाऊन पुढे जाण्याची ही वेळ आहे.
सिंह : आज तुमचं नातं अपेक्षेपेक्षा जास्त गुंतागुंतीचं आणि मागणी करणारं असेल. दिवसेंदिवस ते अधिकच जटिल होत जाईल. चांगल्या आणि वाईट अशा कोणत्याही परिस्थितीत नात्यात राहण्याचं तुम्ही ठरवलं असेल तर आज तुमचा परीक्षेचा दिवस आहे. या परीक्षेतली आव्हानं अपेक्षेपेक्षा जास्त मोठी असली तरी तुम्ही त्यात उत्तीर्ण व्हाल.
advertisement
कन्या : विचारी आणि संरक्षक राहून आज तुम्ही तुमच्या प्रियाजनांप्रति असलेलं तुमचं प्रेम आणि आपुलकी दाखवून द्याल. सगळं ठीक होईल असं केवळ गृहीत न धरता तुम्ही ते सुधारण्यासाठी चौकटीबाहेर जाऊन प्रयत्न कराल. तुम्हाला ज्यांची काळजी वाटते ते सुरक्षित आणि आनंदी राहावेत यासाठी तुम्ही पुढे होऊन पावलं उचलाल.
तूळ : तुमच्या वैयक्तिक आयुष्यात नवे मापदंड आणि नियम तयार करा. काही चांगलं व्हावं असं वाटत असेल, तर नव्या सुरुवातीसाठी योग्य परिस्थिती तयार करण्याचा प्रयत्न करा. आहे ते सोडून नवं सुरू करण्याची भीती वाटत असेल तर जोवर धाडस होत नाही तोवर धीर धरा आणि स्वतःचं संरक्षण करू शकाल इतके मजबूत व्हा. थोडक्यात स्वतः आतून मजबूत व्हा आणि मग सध्याच्या नात्याबद्दल किंवा प्रेमाबद्दल निर्णय घ्या.
advertisement
वृश्चिक : तुम्हाला तुमचं नातं वेगळ्या उंचीवर न्यायचं आहे; पण तुम्हाला काही तरी मागे खेचतं आहे. तुमच्या विचारांबाबत आत्मपरीक्षण करण्याची आणि उत्तरं शोधण्याची गरज आहे. हे काय आहे? स्वसंरक्षण की भीती? काहींना स्वतःमध्ये बदल झाल्यासारखं वाटेल. दिवसाच्या उत्तरार्धात एखाद्या काळजीची जागा काही नवं, धाडसी करण्याची इच्छा घेईल. काही जण नव्या प्रेमाचा शोधही सुरू करतील.
advertisement
धनू : तुमच्या जवळच्या नात्यांबाबत तुम्ही अधिक स्थिर, रोमँटिक आणि कदाचित पझेसिव्ह होत असल्याचं तुम्हाला जाणवेल. निष्ठा आणि इतर गोष्टींबद्दल तुम्ही वचनबद्ध असाल आणि तुमच्या जोडीदाराकडूनही तशीच अपेक्षा कराल. तुम्हाला एक तर खरं, मजबूत नातं हवं आहे किंवा काहीच नको आहे. जोडीदाराकडे तुम्ही एक टिपिकल जोडीदार म्हणून पाहात नाही; पण तुमची काळजी घेण्याइतपत छाप पाडाल.
advertisement
मकर : तुमच्या जीवनात प्रेमसंबंध पुन्हा ताजेतवाने आणि रोमांचक होतील. कारण तुमच्यापैकी अनेक जण कोणत्या तरी परिस्थितीशी दोन हात करत असतील आणि नात्यातला उत्साह वाढवत असतील, पुढे जात असतील आणि काही नवं शोधत असतील. आता तुम्ही पूर्वीपेक्षा अधिक उत्साही, मनोरंजक, प्रेमामध्ये उत्कटता असलेले, करिअरमध्ये स्पर्धात्मक आणि मजबूत असल्यामुळे इतरांपेक्षा तुम्ही वेगळे दिसाल.
advertisement
कुंभ : तुम्ही दाखवत असलेल्या तुमच्या प्रतिमेबद्दल किंवा तुमच्या वागण्याबाबत जोडीदाराचं असलेलं मत याबाबत तुम्हाला काही चिंता वाटत असेल. आज सगळं सोडून द्या आणि नवी सुरुवात करा. तुम्ही निष्पापपणे केलेली एखादी गोष्ट किंवा बोललेलं काही सोडून देण्यासारखं असेल, तर ते पूर्णपणे ठीक आहे. एखाद्या नात्यात काय झालं किंवा काय होऊ शकलं नाही याबाबत काळजी करण्यापेक्षा दुसऱ्या नात्याबाबत, पार्टी किंवा डेटबाबत विचार करा. मोठी स्वप्नं पाहण्यासाठी आणि उत्कृष्टतेच्या दृष्टिकोनातून विचार करण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे.
मीन : आजचा दिवस थोडा वेगळा असणार आहे. एखाद्याला केवळ तुम्ही त्याच्यासाठी क्रेझी आहात हे सांगू नका, तर तुम्ही किती महान आहात हे सिद्ध करून दाखवा. कोणतीही गोष्ट गृहीत धरू नका. तुमच्या प्रेमाच्या व्यक्तींच्या जवळ असल्यावाचून काही जण राहू शकणार नाहीत. कोणी तरी तुमच्या प्रिय व्यक्तीला तुमच्यापासून हिरावून घेतलंय, असा संशय घेण्यासारखा आजचा दिवस नाही. अति उत्साह दाखवू नका.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 12, 2025 7:37 AM IST
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Love Horoscope: मन तिकडं ओढतंय! पण ती वाट सगळं उद्ध्वस्त करेल, या राशींना मोठा अलर्ट










