Weekly Rashi Bhavishya In Marathi: साप्ताहिक राशीभविष्य! डबल लाभाचे योग, आठवडा या राशींच्या कामाचा

Last Updated:
Weekly Rashi Bhavishya In Marathi: जानेवारी महिन्याचा येणारा आठवडा कोणासाठी कसा असेल ज्योतिषी चिराग दारूवाला यांनी सांगितलेलं 13 जानेवारी ते 19 जानेवारी 2025 या आठवड्यासाठीचं राशिभविष्य
1/12
मेष (Aries) : मेष राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा संमिश्र असेल. या आठवड्यात मेष राशीच्या व्यक्तींनी विनाकारण अडचणीत न पडता आपल्या कामावर पूर्ण लक्ष केंद्रित करावं. इतरांशी बोलताना भान ठेवावं. मुत्सद्देगिरीचा वापर करा आणि तुमच्या कामात सावधगिरी बाळगा. नात्याची खूप काळजी घ्यावी लागेल. कोणतीही कौटुंबिक समस्या सोडवताना किंवा आपले विचार मांडताना कोणाच्याही प्रतिष्ठेला ठेच लागणार नाही किंवा कोणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाहीत याची काळजी घ्या. या आठवड्यात नातेवाईकांकडून कमी सहकार्य मिळेल. आठवड्याच्या उत्तरार्धात तुम्ही एखाद्या विशिष्ट व्यक्तीबद्दल काळजी कराल. अज्ञात धोक्याची भीती वाटू शकते. न्यायालयीन प्रकरणांबाबत तुम्हाला अधिक धावपळ करावी लागू शकते. विद्यार्थ्यांचं अभ्यासातून लक्ष विचलित होऊ शकतं. प्रेमसंबंधात सावधगिरीने पुढे जा. जोडीदाराच्या आरोग्याबाबत आणि अनावश्यक गोष्टींवरील खर्चामुळे तुम्ही काळजीत असाल.Lucky Color : Pink
Lucky Number : 7
मेष (Aries) : मेष राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा संमिश्र असेल. या आठवड्यात मेष राशीच्या व्यक्तींनी विनाकारण अडचणीत न पडता आपल्या कामावर पूर्ण लक्ष केंद्रित करावं. इतरांशी बोलताना भान ठेवावं. मुत्सद्देगिरीचा वापर करा आणि तुमच्या कामात सावधगिरी बाळगा. नात्याची खूप काळजी घ्यावी लागेल. कोणतीही कौटुंबिक समस्या सोडवताना किंवा आपले विचार मांडताना कोणाच्याही प्रतिष्ठेला ठेच लागणार नाही किंवा कोणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाहीत याची काळजी घ्या. या आठवड्यात नातेवाईकांकडून कमी सहकार्य मिळेल. आठवड्याच्या उत्तरार्धात तुम्ही एखाद्या विशिष्ट व्यक्तीबद्दल काळजी कराल. अज्ञात धोक्याची भीती वाटू शकते. न्यायालयीन प्रकरणांबाबत तुम्हाला अधिक धावपळ करावी लागू शकते. विद्यार्थ्यांचं अभ्यासातून लक्ष विचलित होऊ शकतं. प्रेमसंबंधात सावधगिरीने पुढे जा. जोडीदाराच्या आरोग्याबाबत आणि अनावश्यक गोष्टींवरील खर्चामुळे तुम्ही काळजीत असाल.Lucky Color : PinkLucky Number : 7
advertisement
2/12
वृषभ (Taurus) : वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा शुभ आणि लाभदायक असेल. एखाद्या चांगल्या बातमीने आठवड्याची सुरुवात होईल. करिअर आणि व्यवसायाच्या दिशेने केलेले प्रयत्न यशस्वी होतील. कामाच्या ठिकाणी आनंददायी वातावरण असेल. वरिष्ठ आणि कनिष्ठ तुम्हाला पूर्ण पाठबळ देतील. तुम्ही बऱ्याच दिवसांपासून नोकरीच्या शोधात असलात, तर या आठवड्यात तुमची इच्छा पूर्ण होऊ शकते. आठवड्याच्या मध्यात एखाद्या प्रभावशाली व्यक्तीशी भेट होईल, तिच्या मदतीने तुम्हाला आर्थिक लाभ मिळेल. व्यवसायाशी संबंधित लोकांसाठी हा आठवडा यशस्वी आणि लाभदायक ठरेल. आठवड्याच्या मध्यात धार्मिक-शुभ कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल. लांब किंवा कमी अंतराच्या प्रवासाची योजना अचानक बनू शकते. परीक्षा आणि स्पर्धांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगली बातमी मिळू शकते. आठवड्याच्या उत्तरार्धात जोडीदारासोबत आनंददायी वेळ घालवता येईल. तुम्ही अविवाहित असाल तर मैत्रीचं प्रेमात रूपांतर होऊ शकतं. आरोग्य सर्वसाधारण राहील.Lucky Color : Cream
Lucky Number : 14
वृषभ (Taurus) : वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा शुभ आणि लाभदायक असेल. एखाद्या चांगल्या बातमीने आठवड्याची सुरुवात होईल. करिअर आणि व्यवसायाच्या दिशेने केलेले प्रयत्न यशस्वी होतील. कामाच्या ठिकाणी आनंददायी वातावरण असेल. वरिष्ठ आणि कनिष्ठ तुम्हाला पूर्ण पाठबळ देतील. तुम्ही बऱ्याच दिवसांपासून नोकरीच्या शोधात असलात, तर या आठवड्यात तुमची इच्छा पूर्ण होऊ शकते. आठवड्याच्या मध्यात एखाद्या प्रभावशाली व्यक्तीशी भेट होईल, तिच्या मदतीने तुम्हाला आर्थिक लाभ मिळेल. व्यवसायाशी संबंधित लोकांसाठी हा आठवडा यशस्वी आणि लाभदायक ठरेल. आठवड्याच्या मध्यात धार्मिक-शुभ कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल. लांब किंवा कमी अंतराच्या प्रवासाची योजना अचानक बनू शकते. परीक्षा आणि स्पर्धांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगली बातमी मिळू शकते. आठवड्याच्या उत्तरार्धात जोडीदारासोबत आनंददायी वेळ घालवता येईल. तुम्ही अविवाहित असाल तर मैत्रीचं प्रेमात रूपांतर होऊ शकतं. आरोग्य सर्वसाधारण राहील.Lucky Color : CreamLucky Number : 14
advertisement
3/12
मिथुन (Gemini) : मिथुन राशीच्या व्यक्तींच्या करिअरसाठी हा आठवडा खूप शुभ असेल; पण नातेसंबंधांच्या दृष्टिकोनातून काळ थोडा प्रतिकूल असू शकतो. गरज असताना जवळच्या व्यक्तींची मदत होणार नाहीत. नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला चांगली ऑफर मिळू शकते. या आठवड्यात, तुम्हाला वरिष्ठ किंवा कनिष्ठांकडून अपेक्षित सहकार्य मिळणार नाही; पण तुम्ही स्वतःहून चांगली कामगिरी कराल. या आठवड्यात तुम्हाला आयुष्यात खूप छान गोष्टी शिकायला मिळतील. सर्वांत महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही तुमच्यात दडलेली ऊर्जा आणि क्षमता ओळखायला शिकाल आणि त्यांचा चांगला वापर कराल. आठवड्याच्या उत्तरार्धात भावनेच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नका. फायद्याऐवजी आर्थिक नुकसान होऊ शकतं. आयुष्यातील कोणत्याही आव्हानात्मक काळात तुमचा जोडीदार तुमच्या पाठीशी उभा असेल. आठवड्याच्या शेवटी धार्मिक स्थळाला भेट देण्याचा प्लॅन बनू शकतो.Lucky Color : Green
Lucky Number : 2
मिथुन (Gemini) : मिथुन राशीच्या व्यक्तींच्या करिअरसाठी हा आठवडा खूप शुभ असेल; पण नातेसंबंधांच्या दृष्टिकोनातून काळ थोडा प्रतिकूल असू शकतो. गरज असताना जवळच्या व्यक्तींची मदत होणार नाहीत. नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला चांगली ऑफर मिळू शकते. या आठवड्यात, तुम्हाला वरिष्ठ किंवा कनिष्ठांकडून अपेक्षित सहकार्य मिळणार नाही; पण तुम्ही स्वतःहून चांगली कामगिरी कराल. या आठवड्यात तुम्हाला आयुष्यात खूप छान गोष्टी शिकायला मिळतील. सर्वांत महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही तुमच्यात दडलेली ऊर्जा आणि क्षमता ओळखायला शिकाल आणि त्यांचा चांगला वापर कराल. आठवड्याच्या उत्तरार्धात भावनेच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नका. फायद्याऐवजी आर्थिक नुकसान होऊ शकतं. आयुष्यातील कोणत्याही आव्हानात्मक काळात तुमचा जोडीदार तुमच्या पाठीशी उभा असेल. आठवड्याच्या शेवटी धार्मिक स्थळाला भेट देण्याचा प्लॅन बनू शकतो.Lucky Color : GreenLucky Number : 2
advertisement
4/12
कर्क (Cancer) : कर्क राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा शुभ आणि लाभदायक असेल. या आठवड्यात तुम्ही केलेले प्रयत्न यशस्वी होतील आणि तुम्हाला नफाही मिळेल; पण उत्साहामुळे संवेदना गमावू नका. नाही तर नफ्याचं प्रमाण कमी होऊ शकतं. या आठवड्यात तुम्ही कष्ट कराल आणि त्याचे परिणाम दिसतील. दिनचर्या आणि आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. नाही तर शारीरिक आणि मानसिक त्रासाचा सामना करावा लागू शकतो. अशा समस्या टाळण्यासाठी, आपला वेळ आणि ऊर्जा यांचं व्यवस्थापन करा. जर तुम्ही व्यवसायाचा विस्तार करण्याचा विचार करत असलात, तर तुमचं स्वप्न या आठवड्यात पूर्ण होईल. या संदर्भात केलेला प्रवास आनंददायी आणि अपेक्षित लाभ देणारा ठरेल. जमीन आणि इमारतींच्या खरेदी-विक्रीची इच्छा पूर्ण होईल. तुम्हाला त्यातून लक्षणीय नफा मिळेल. आठवड्याच्या उत्तरार्धात चैनीच्या वस्तूंवर मोठ्या प्रमाणात खर्च होऊ शकतो. एखादी आवडती गोष्ट मिळाल्याने किंवा कुटुंबातल्या एखाद्या सदस्याच्या मोठ्या यशामुळे मन प्रसन्न राहील. प्रेमसंबंध अधिक घट्ट होतील. जोडीदारासोबत आनंदाचे क्षण घालवण्याची संधी मिळेल. वैवाहिक जीवन आनंदी राहील.Lucky Color : Grey
Lucky Number : 5
कर्क (Cancer) : कर्क राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा शुभ आणि लाभदायक असेल. या आठवड्यात तुम्ही केलेले प्रयत्न यशस्वी होतील आणि तुम्हाला नफाही मिळेल; पण उत्साहामुळे संवेदना गमावू नका. नाही तर नफ्याचं प्रमाण कमी होऊ शकतं. या आठवड्यात तुम्ही कष्ट कराल आणि त्याचे परिणाम दिसतील. दिनचर्या आणि आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. नाही तर शारीरिक आणि मानसिक त्रासाचा सामना करावा लागू शकतो. अशा समस्या टाळण्यासाठी, आपला वेळ आणि ऊर्जा यांचं व्यवस्थापन करा. जर तुम्ही व्यवसायाचा विस्तार करण्याचा विचार करत असलात, तर तुमचं स्वप्न या आठवड्यात पूर्ण होईल. या संदर्भात केलेला प्रवास आनंददायी आणि अपेक्षित लाभ देणारा ठरेल. जमीन आणि इमारतींच्या खरेदी-विक्रीची इच्छा पूर्ण होईल. तुम्हाला त्यातून लक्षणीय नफा मिळेल. आठवड्याच्या उत्तरार्धात चैनीच्या वस्तूंवर मोठ्या प्रमाणात खर्च होऊ शकतो. एखादी आवडती गोष्ट मिळाल्याने किंवा कुटुंबातल्या एखाद्या सदस्याच्या मोठ्या यशामुळे मन प्रसन्न राहील. प्रेमसंबंध अधिक घट्ट होतील. जोडीदारासोबत आनंदाचे क्षण घालवण्याची संधी मिळेल. वैवाहिक जीवन आनंदी राहील.Lucky Color : GreyLucky Number : 5
advertisement
5/12
सिंह (Leo) : सिंह राशीच्या व्यक्तींनी या आठवड्यात कोणत्याही कामात निष्काळजीपण करू नये. स्वत:चं काम इतरांवर सोपवू नका आणि विरोधकांपासून सावध राहा. चांगल्या पद्धतीने हाताळता येईल तितकी जबाबदारी तुम्ही स्वीकारली पाहिजे. परदेशात करिअर किंवा व्यवसाय उभारण्याचा विचार करत असाल तर या दिशेने अपेक्षित यश मिळवण्यासाठी थोडी वाट बघावी लागेल. या आठवड्यात हंगामी आजार किंवा जुने आजार उद्भवल्याने आरोग्याशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागू शकतो. आहार आणि जीवनशैली दोन्ही योग्य ठेवण्याची गरज आहे. आठवड्याच्या मध्यात अचानक एखादा जुना मित्र किंवा प्रिय व्यक्तीची भेट होऊ शकते. मित्र आणि नातेवाईकांसोबत आनंदाने वेळ घालवण्याची संधी मिळेल. व्यवसायाच्या संदर्भात जवळचा किंवा लांबचा प्रवास करावा लागेल. प्रेमसंबंधात अडथळे येऊ शकतात. या आठवड्यात जोडीदारासोबत गैरसमज होऊ शकतात. त्यामुळे तुम्ही थोडे उदास व्हाल.Lucky Color : Yellow
Lucky Number : 1
सिंह (Leo) : सिंह राशीच्या व्यक्तींनी या आठवड्यात कोणत्याही कामात निष्काळजीपण करू नये. स्वत:चं काम इतरांवर सोपवू नका आणि विरोधकांपासून सावध राहा. चांगल्या पद्धतीने हाताळता येईल तितकी जबाबदारी तुम्ही स्वीकारली पाहिजे. परदेशात करिअर किंवा व्यवसाय उभारण्याचा विचार करत असाल तर या दिशेने अपेक्षित यश मिळवण्यासाठी थोडी वाट बघावी लागेल. या आठवड्यात हंगामी आजार किंवा जुने आजार उद्भवल्याने आरोग्याशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागू शकतो. आहार आणि जीवनशैली दोन्ही योग्य ठेवण्याची गरज आहे. आठवड्याच्या मध्यात अचानक एखादा जुना मित्र किंवा प्रिय व्यक्तीची भेट होऊ शकते. मित्र आणि नातेवाईकांसोबत आनंदाने वेळ घालवण्याची संधी मिळेल. व्यवसायाच्या संदर्भात जवळचा किंवा लांबचा प्रवास करावा लागेल. प्रेमसंबंधात अडथळे येऊ शकतात. या आठवड्यात जोडीदारासोबत गैरसमज होऊ शकतात. त्यामुळे तुम्ही थोडे उदास व्हाल.Lucky Color : YellowLucky Number : 1
advertisement
6/12
कन्या (Virgo) : कन्या राशीच्या व्यक्तींनी व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनात कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा टाळावा. एक छोटीशी चूक तुम्हाला अडचणीत आणू शकते. या आठवड्यात जवळच्या व्यक्तींच्या भावना दुखावू नका. नाही तर नातेसंबंध ताणले जाऊ शकतात. सर्व नियोजित कामं वेळेवर आणि हव्या त्या पद्धतीने पूर्ण व्हावीत असं वाटत असेल तर सर्वांच्या सहकार्याने आणि पाठिंब्याने पुढे जाणं योग्य ठरेल. नातं घट्ट राहावं असं वाटत असेल तर इतरांना दिलेली वचनं कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करावी लागतील. भागीदारीत व्यवसाय करत असाल तर इतरांवर डोळे झाकून विश्वास ठेवू नका. नाही तर आर्थिक नुकसान सहन करावं लागू शकतं. प्रेमसंबंध सुधारण्यासाठी लव्ह पार्टनरच्या भावनांकडे दुर्लक्ष करू नका. वैवाहिक जीवन आनंदी ठेवण्यासाठी व्यग्र वेळापत्रकातून थोडा वेळ काढा.Lucky Color : Red
Lucky Number : 9
कन्या (Virgo) : कन्या राशीच्या व्यक्तींनी व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनात कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा टाळावा. एक छोटीशी चूक तुम्हाला अडचणीत आणू शकते. या आठवड्यात जवळच्या व्यक्तींच्या भावना दुखावू नका. नाही तर नातेसंबंध ताणले जाऊ शकतात. सर्व नियोजित कामं वेळेवर आणि हव्या त्या पद्धतीने पूर्ण व्हावीत असं वाटत असेल तर सर्वांच्या सहकार्याने आणि पाठिंब्याने पुढे जाणं योग्य ठरेल. नातं घट्ट राहावं असं वाटत असेल तर इतरांना दिलेली वचनं कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करावी लागतील. भागीदारीत व्यवसाय करत असाल तर इतरांवर डोळे झाकून विश्वास ठेवू नका. नाही तर आर्थिक नुकसान सहन करावं लागू शकतं. प्रेमसंबंध सुधारण्यासाठी लव्ह पार्टनरच्या भावनांकडे दुर्लक्ष करू नका. वैवाहिक जीवन आनंदी ठेवण्यासाठी व्यग्र वेळापत्रकातून थोडा वेळ काढा.Lucky Color : RedLucky Number : 9
advertisement
7/12
तूळ (Libra) : तूळ राशीच्या व्यक्तींनी या आठवड्यात कोणत्याही प्रकारचे शॉर्टकट घेऊ नयेत. नाही तर अनेक समस्यांसह मोठ्या आर्थिक नुकसानाचा सामना करावा लागू शकतो. या आठवड्यात दुसऱ्याच्या अडचणीत अडकू नका किंवा कोणतेही नियम-कायदे मोडू नका. व्यवसाय करताना कागदपत्रं पूर्ण ठेवा आणि पैसे हाताळताना काळजी घ्या. जमीन आणि वास्तूशी संबंधित वाद सोडवण्यासाठी जास्त धावपळ करावी लागू शकते. वडिलोपार्जित मालमत्ता मिळवण्यात अडथळे येऊ शकतात. नातेवाईकांशी संबंध चांगले ठेवण्यासाठी स्वातंत्र्याशी तडजोड करावी लागू शकते. मोठ्या अडचणीतून बाहेर पडण्यासाठी वडिलधाऱ्यांचा सल्ला प्रभावी ठरेल. आठवड्याच्या उत्तरार्धात काम आणि कुटुंबाचा समतोल साधण्यात काही अडचणी येऊ शकतात. कामाच्या अति भाराबरोबरच बिघडलेलं आरोग्यदेखील त्रासाचं कारण बनेल. प्रेमात काही मोठ्या अडचणी येऊ शकतात. तिसऱ्या व्यक्तीच्या हस्तक्षेपामुळे तुमचं मन अस्वस्थ राहील.Lucky Color : Black
Lucky Number : 3
तूळ (Libra) : तूळ राशीच्या व्यक्तींनी या आठवड्यात कोणत्याही प्रकारचे शॉर्टकट घेऊ नयेत. नाही तर अनेक समस्यांसह मोठ्या आर्थिक नुकसानाचा सामना करावा लागू शकतो. या आठवड्यात दुसऱ्याच्या अडचणीत अडकू नका किंवा कोणतेही नियम-कायदे मोडू नका. व्यवसाय करताना कागदपत्रं पूर्ण ठेवा आणि पैसे हाताळताना काळजी घ्या. जमीन आणि वास्तूशी संबंधित वाद सोडवण्यासाठी जास्त धावपळ करावी लागू शकते. वडिलोपार्जित मालमत्ता मिळवण्यात अडथळे येऊ शकतात. नातेवाईकांशी संबंध चांगले ठेवण्यासाठी स्वातंत्र्याशी तडजोड करावी लागू शकते. मोठ्या अडचणीतून बाहेर पडण्यासाठी वडिलधाऱ्यांचा सल्ला प्रभावी ठरेल. आठवड्याच्या उत्तरार्धात काम आणि कुटुंबाचा समतोल साधण्यात काही अडचणी येऊ शकतात. कामाच्या अति भाराबरोबरच बिघडलेलं आरोग्यदेखील त्रासाचं कारण बनेल. प्रेमात काही मोठ्या अडचणी येऊ शकतात. तिसऱ्या व्यक्तीच्या हस्तक्षेपामुळे तुमचं मन अस्वस्थ राहील.Lucky Color : BlackLucky Number : 3
advertisement
8/12
वृश्चिक (Scorpio) : वृश्चिक राशीच्या व्यक्तींना चैनीच्या वस्तू खरेदी करण्यासाठी किंवा घराच्या दुरुस्तीसाठी खिशातून जास्त पैसे खर्च करावे लागतील. त्यामुळे बजेट थोडं विस्कळीत होऊ शकतं. आठवड्याच्या सुरुवातीला नोकरदारांचे वरिष्ठ किंवा कनिष्ठांशी वाद होऊ शकतात. हे टाळण्यासाठी छोट्या छोट्या गोष्टींना किंवा माणसांना महत्त्व देऊ नका. व्यवसायाशी संबंधित लोकांना कामात चढ-उतारांचा सामना करावा लागू शकतो. जर तुम्ही भागीदारीत व्यवसाय करत असाल तर जोडीदाराशी वाद टाळण्यासाठी आर्थिक समस्या दूर करून पुढे जा. संस्थेत उच्च पद हवं असेल किंवा नोकरीत बदल हवा असेल, तर त्यासाठी अजून थोडी वाट पहावी लागेल. नोकरदार महिलांना काम आणि घर यांच्यात समन्वय राखण्यात अडचणी येऊ शकतात. परीक्षा आणि स्पर्धांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना कठोर परिश्रम करावे लागतील तरच अपेक्षित निकाल मिळेल. आठवड्याच्या उत्तरार्धात घरातल्या वडीलधाऱ्या व्यक्तीच्या तब्येतीची काळजी वाटेल. वैवाहिक जीवन आनंदी राहील.Lucky Color : Orange
Lucky Number : 10
वृश्चिक (Scorpio) : वृश्चिक राशीच्या व्यक्तींना चैनीच्या वस्तू खरेदी करण्यासाठी किंवा घराच्या दुरुस्तीसाठी खिशातून जास्त पैसे खर्च करावे लागतील. त्यामुळे बजेट थोडं विस्कळीत होऊ शकतं. आठवड्याच्या सुरुवातीला नोकरदारांचे वरिष्ठ किंवा कनिष्ठांशी वाद होऊ शकतात. हे टाळण्यासाठी छोट्या छोट्या गोष्टींना किंवा माणसांना महत्त्व देऊ नका. व्यवसायाशी संबंधित लोकांना कामात चढ-उतारांचा सामना करावा लागू शकतो. जर तुम्ही भागीदारीत व्यवसाय करत असाल तर जोडीदाराशी वाद टाळण्यासाठी आर्थिक समस्या दूर करून पुढे जा. संस्थेत उच्च पद हवं असेल किंवा नोकरीत बदल हवा असेल, तर त्यासाठी अजून थोडी वाट पहावी लागेल. नोकरदार महिलांना काम आणि घर यांच्यात समन्वय राखण्यात अडचणी येऊ शकतात. परीक्षा आणि स्पर्धांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना कठोर परिश्रम करावे लागतील तरच अपेक्षित निकाल मिळेल. आठवड्याच्या उत्तरार्धात घरातल्या वडीलधाऱ्या व्यक्तीच्या तब्येतीची काळजी वाटेल. वैवाहिक जीवन आनंदी राहील.Lucky Color : OrangeLucky Number : 10
advertisement
9/12
धनू (Sagittarius) : धनू राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा संमिश्र असेल. मेहनतीपेक्षा कमी फळ मिळत असल्याचं जाणवेल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ आणि कनिष्ठांमध्ये कामाबाबत तणाव निर्माण होऊ शकतो. प्रतिकूल काळामुळे, अगदी लहान कामं पूर्ण करण्यासाठीदेखील जास्त वेळ लागू शकतो. गरजेपेक्षा जास्त धावपळ करावी लागू शकते. नोकरी आणि व्यवसायातल्या, तसंच तुमच्या वैयक्तिक आयुष्यातल्या समस्या सोडवण्यात काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. आठवड्याच्या मध्यात मुलांची काळजी वाटेल. जमीन आणि मालमत्तेशी संबंधित प्रकरणं सोडवण्यासाठी तुम्हाला कोर्टाच्या फेऱ्या माराव्या लागतील. हितचिंतक आणि वरिष्ठांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करण्याची चूक करू नका. या आठवड्यात तुमचं मन अस्वस्थ राहील. कारण व्यग्र वेळापत्रकामुळे जोडीदारासाठी वेळ काढता येणार नाही. खाण्यापिण्याच्या सवयींची काळजी घ्या. नाही तर पोटाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात.Lucky Color : Purple
Lucky Number : 6
धनू (Sagittarius) : धनू राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा संमिश्र असेल. मेहनतीपेक्षा कमी फळ मिळत असल्याचं जाणवेल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ आणि कनिष्ठांमध्ये कामाबाबत तणाव निर्माण होऊ शकतो. प्रतिकूल काळामुळे, अगदी लहान कामं पूर्ण करण्यासाठीदेखील जास्त वेळ लागू शकतो. गरजेपेक्षा जास्त धावपळ करावी लागू शकते. नोकरी आणि व्यवसायातल्या, तसंच तुमच्या वैयक्तिक आयुष्यातल्या समस्या सोडवण्यात काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. आठवड्याच्या मध्यात मुलांची काळजी वाटेल. जमीन आणि मालमत्तेशी संबंधित प्रकरणं सोडवण्यासाठी तुम्हाला कोर्टाच्या फेऱ्या माराव्या लागतील. हितचिंतक आणि वरिष्ठांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करण्याची चूक करू नका. या आठवड्यात तुमचं मन अस्वस्थ राहील. कारण व्यग्र वेळापत्रकामुळे जोडीदारासाठी वेळ काढता येणार नाही. खाण्यापिण्याच्या सवयींची काळजी घ्या. नाही तर पोटाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात.Lucky Color : PurpleLucky Number : 6
advertisement
10/12
मकर (Capricorn) : मकर राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा संमिश्र असेल. आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला कामासाठी लांबचा प्रवास करावा लागू शकतो. प्रवास थकवणारा असेल आणि अपेक्षेपेक्षा कमी लाभदायक असेल. यामुळे तुमचं मन थोडं उदास राहील. नोकरदार व्यक्तींनी आपली मतं इतरांवर लादू नयेत. कोणत्याही प्रकारचे वाद टाळण्यासाठी, आपण इतरांच्या गोष्टींमध्ये लक्ष देऊ नये. जर तुम्ही व्यवसाय करत असलात, तर जास्त नफा मिळवण्यासाठी फसवणूक करू नका किंवा जोखमीच्या योजनांमध्ये पैसे गुंतवू नका. आठवड्याच्या मध्यात तुमचे विरोधक सक्रिय होतील. या काळात तुम्हाला एखादी नवीन कला शिकण्याची किंवा एखाद्या खास व्यक्तीच्या मदतीने नवीन काम करण्याची संधी मिळू शकते. सत्ता आणि सरकारमधल्या व्यक्तींशी जवळीक वाढेल. जोडीदाराशी नातं दृढ होईल. वैवाहिक जीवन आनंदी राहील. कुटुंबातल्या सदस्यांसोबत आनंदाने वेळ घालवण्याची संधी मिळेल.Lucky Color : Brown
Lucky Number : 8
मकर (Capricorn) : मकर राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा संमिश्र असेल. आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला कामासाठी लांबचा प्रवास करावा लागू शकतो. प्रवास थकवणारा असेल आणि अपेक्षेपेक्षा कमी लाभदायक असेल. यामुळे तुमचं मन थोडं उदास राहील. नोकरदार व्यक्तींनी आपली मतं इतरांवर लादू नयेत. कोणत्याही प्रकारचे वाद टाळण्यासाठी, आपण इतरांच्या गोष्टींमध्ये लक्ष देऊ नये. जर तुम्ही व्यवसाय करत असलात, तर जास्त नफा मिळवण्यासाठी फसवणूक करू नका किंवा जोखमीच्या योजनांमध्ये पैसे गुंतवू नका. आठवड्याच्या मध्यात तुमचे विरोधक सक्रिय होतील. या काळात तुम्हाला एखादी नवीन कला शिकण्याची किंवा एखाद्या खास व्यक्तीच्या मदतीने नवीन काम करण्याची संधी मिळू शकते. सत्ता आणि सरकारमधल्या व्यक्तींशी जवळीक वाढेल. जोडीदाराशी नातं दृढ होईल. वैवाहिक जीवन आनंदी राहील. कुटुंबातल्या सदस्यांसोबत आनंदाने वेळ घालवण्याची संधी मिळेल.Lucky Color : BrownLucky Number : 8
advertisement
11/12
कुंभ (Aquarius) : या आठवड्यात कुंभ राशीच्या व्यक्तींना आरोग्याची, नातेसंबंधांची आणि पैशाची खूप काळजी घ्यावी लागेल. थोड्याशा निष्काळजीपणाचा या तिन्ही बाबींवर परिणाम होऊ शकतो. दैनंदिन दिनचर्या, ऊर्जा आणि पैशांचं व्यवस्थापन करा. आठवड्याच्या सुरुवातीला तुमची नियोजित कामं वेळेवर पूर्ण होणार नाहीत. त्यामुळे तुम्ही थोडे निराश व्हाल. एखाद्या व्यक्तीकडून फसवणूक झाल्यामुळे तुम्ही दुःखीदेखील राहू शकता. तुमचं प्रेम व्यक्त करण्याचा विचार करत असलात तर अनुकूल वेळेची वाट पहावी. वाहन चालवताना काळजी घ्या. नाही तर दुखापत होण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या उत्तरार्धात तुमचे गुप्त शत्रू सक्रिय होऊ शकतात. बदलत्या ऋतूमध्ये आपल्या आहाराची काळजी घ्या आणि आरोग्याशी संबंधित कोणत्याही समस्येकडे दुर्लक्ष करू नका.Lucky Color : Blue
Lucky Number : 11
कुंभ (Aquarius) : या आठवड्यात कुंभ राशीच्या व्यक्तींना आरोग्याची, नातेसंबंधांची आणि पैशाची खूप काळजी घ्यावी लागेल. थोड्याशा निष्काळजीपणाचा या तिन्ही बाबींवर परिणाम होऊ शकतो. दैनंदिन दिनचर्या, ऊर्जा आणि पैशांचं व्यवस्थापन करा. आठवड्याच्या सुरुवातीला तुमची नियोजित कामं वेळेवर पूर्ण होणार नाहीत. त्यामुळे तुम्ही थोडे निराश व्हाल. एखाद्या व्यक्तीकडून फसवणूक झाल्यामुळे तुम्ही दुःखीदेखील राहू शकता. तुमचं प्रेम व्यक्त करण्याचा विचार करत असलात तर अनुकूल वेळेची वाट पहावी. वाहन चालवताना काळजी घ्या. नाही तर दुखापत होण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या उत्तरार्धात तुमचे गुप्त शत्रू सक्रिय होऊ शकतात. बदलत्या ऋतूमध्ये आपल्या आहाराची काळजी घ्या आणि आरोग्याशी संबंधित कोणत्याही समस्येकडे दुर्लक्ष करू नका.Lucky Color : BlueLucky Number : 11
advertisement
12/12
मीन (Pisces) : मीन राशीच्या व्यक्तींनी या आठवड्यात आपला गर्व आणि आळशीपणावर नियंत्रण ठेवलं तर त्यांना अपेक्षेपेक्षा जास्त नफा आणि यश मिळू शकतं. नोकरदार व्यक्तींना या आठवड्यात कामाच्या ठिकाणी वरिष्ठ आणि कनिष्ठ दोघांकडून खूप सहकार्य व पाठिंबा मिळेल. मित्रांच्या मदतीने तुम्ही तुमचं काम अधिक चांगल्या पद्धतीने कराल आणि नवीन ध्येय निश्चित कराल. चैनीशी संबंधित वस्तू खरेदी करू शकता. त्यामुळे घरात आनंदाचं वातावरण निर्माण होईल. जमीन आणि इमारतींच्या खरेदी-विक्रीचं स्वप्नही साकार होऊ शकते. आठवड्याच्या मध्यात कुटुंबातल्या एखाद्या व्यक्तीच्या मोठ्या कामगिरीमुळे तुमचा मान-सन्मान वाढेल. अविवाहित व्यक्तीचं लग्न होऊ शकतं. समाजसेवेशी संबंधित व्यक्तींना विशेष पुरस्काराने सन्मानित केलं जाऊ शकते. प्रेमप्रकरणांमध्ये, खूप काळजीपूर्वक पुढे जावं. वैवाहिक जीवन आनंदी राहील.Lucky Color : White
Lucky Number : 4
मीन (Pisces) : मीन राशीच्या व्यक्तींनी या आठवड्यात आपला गर्व आणि आळशीपणावर नियंत्रण ठेवलं तर त्यांना अपेक्षेपेक्षा जास्त नफा आणि यश मिळू शकतं. नोकरदार व्यक्तींना या आठवड्यात कामाच्या ठिकाणी वरिष्ठ आणि कनिष्ठ दोघांकडून खूप सहकार्य व पाठिंबा मिळेल. मित्रांच्या मदतीने तुम्ही तुमचं काम अधिक चांगल्या पद्धतीने कराल आणि नवीन ध्येय निश्चित कराल. चैनीशी संबंधित वस्तू खरेदी करू शकता. त्यामुळे घरात आनंदाचं वातावरण निर्माण होईल. जमीन आणि इमारतींच्या खरेदी-विक्रीचं स्वप्नही साकार होऊ शकते. आठवड्याच्या मध्यात कुटुंबातल्या एखाद्या व्यक्तीच्या मोठ्या कामगिरीमुळे तुमचा मान-सन्मान वाढेल. अविवाहित व्यक्तीचं लग्न होऊ शकतं. समाजसेवेशी संबंधित व्यक्तींना विशेष पुरस्काराने सन्मानित केलं जाऊ शकते. प्रेमप्रकरणांमध्ये, खूप काळजीपूर्वक पुढे जावं. वैवाहिक जीवन आनंदी राहील.Lucky Color : WhiteLucky Number : 4
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement