Bajaj Platina 100
बजाज ऑटोची प्लॅटिना 100 ही एक विश्वासार्ह बाईक आहे. तुम्ही ती दैनंदिन वापरासाठी वापरू शकता. तिची मऊ आणि लांब सीट तुम्हाला थकवणार नाही. इंजिनबद्दल बोलायचे झाले तर, या बाईकमध्ये 102cc डीटीएस-आय इंजिन आहे जे 7.9PS पॉवर जनरेट करते. या बाईकमध्ये 17 इंचाचे टायर आहेत. यामध्ये समोर 130mm ड्रम ब्रेक आणि मागे 110mm ड्रम ब्रेक आहेत. ही अँटी-स्किड ब्रेकिंग सिस्टम आहे. या बाईकचे वजन 117 किलो आहे.
advertisement
पावसाळ्यात कारला लागणार नाही गंज! या ट्रिक्स करा फॉलो, होईल फायदाच फायदा
Hero Passion Pro
मोटोकॉर्पची पॅशन प्रो बऱ्याच काळापासून ग्राहकांना आकर्षित करत आहे. या बाईकची साधी रचना आणि तिचे इंजिन हे त्याचे प्लस पॉइंट्स आहेत. तुम्ही ही बाईक दैनंदिन वापरासाठी वापरू शकता. या बाईकची एक्स-शोरूम किंमत 82,451 रुपये आहे. पॅशन प्रोमध्ये 97.2cc इंजिन आहे जे 5.9PS पॉवर देते. समोर 130mm ड्रम ब्रेक आणि मागे 130mm ड्रम ब्रेक (IBS) आहेत. यात 18 इंचाचे चाके आहेत.
तुमच्या कारमधील CNG किट लीक होतेय का? घरच्या घरी असं करा चेक
TVS Sport
टीव्हीएस स्पोर्ट ही एंट्री लेव्हल सेगमेंटमधील सर्वात स्पोर्टी आणि स्टायलिश बाईक आहे. तिची एक्स-शोरूम किंमत 60 हजार रुपयांपासून सुरू होते. इंजिनबद्दल बोलायचे झाले तर, बाईकमध्ये 110cc इंजिन आहे जे 6.03kwची पॉवर देते. हे इंजिन 4 स्पीड गिअरबॉक्सने सुसज्ज आहे, या बाईकचा टॉप स्पीड 90km/h आहे. यात 17 इंच टायर आहेत आणि दोन्ही टायर्समध्ये ड्रम ब्रेकची सुविधा आहे. दैनंदिन वापरासाठी ही एक उत्तम बाईक आहे.
या तिन्ही बाईक नियमित राइडसाठी चांगल्या आहेत. बंपर टू बंपर ट्रॅफिकमध्येही त्या चालवण्यास सोप्या आहेत. या बाईकमध्ये आपल्याला दिसणारी एकमेव कमतरता म्हणजे डिस्क ब्रेकचा अभाव. सुरक्षितता लक्षात घेऊन कंपन्या येत्या काळात हे फीचर समाविष्ट करू शकतील अशी अपेक्षा आहे.