सध्या मार्केटमध्ये १०० सीसी, १२५ सीसी आणि १३५ सीसीमध्ये स्वस्तात मस्त अशा बाईकचा पर्याय उपलब्ध आहे. चाकरमानी आणि छोटा व्यवसाय करणाऱ्यांची या बाइक पहिल्या पसंतीच्या आहे. जर तुम्ही सुद्धा अशी स्वस्तात मस्त आणि जास्त मायलेज देणाऱ्या बाइक विकत घेण्याचा प्लॅन करत असेल तर खालील काही बेस्ट ऑप्शन आहे.
हीरो स्प्लेंडर प्लस
advertisement
हीरो स्प्लेंडर ही सगळ्या पहिल्या क्रमांकावर येते. भारतात गेल्या अनेक दशकांपासून स्प्लेंडर राज्य करत आहे. या बाइकमध्ये चांगले फिचर्स आहे. ARAI ने दावा केला आहे की, 70-80.6 किलोमीटर प्रति लीटर इतकं मायलेज ही बाइक देऊ शकते. किंमतचा विचार केला तर या बाइकची किंमत ही 77,026 रुपये एक्स-शोरूम पासून सुरू होते. प्रत्येक राज्यामध्ये वाहन धोरणानुसार दर कमी जास्त असू शकतात.
बजाज प्लॅटिना 100
बजाज मोटर्सही भारतातील सर्वात मोठी दुचाकी उत्पादक कंपनी पैकी एक आहे. बजाजच्या सगळ्याच बाइक या मायलेज किंग म्हणून ओळखल्या जातात. बजाज प्लॅटिना 100 ही 70 किलोमीटर प्रति लिटर इतका मायलेज देऊ शकते असा दावा कंपनीने केला आहे. या बाइकची किंमत स्प्लेंडरच्या तुलनेत कमी असून 68,890 रुपये एक्स-शोरूम किंमत आहे.
TVS रेडियन
TVS ची रेडियन ही बाइक सध्या मार्केटमध्ये आपलं स्थान कायम राखून आहे. ही बाइक 73.68 किलोमीटर प्रति लिटर इतकं मायलेज देते. दिल्लीत या बाइकची किंमत 69,429 रुपये एक्स-शोरूम इतकी आहे.
Bajaj CT 110 X
बजाजची आणखी एक बाइक मायलेज आणि विक्रीच्या बाबतीत पुढे आहे. Bajaj CT 110 X बाइकची ग्रामीण भागात चांगली विक्री आहे. या बाइकचं मायलेज 70 किलोमीटर इतकं आहे. या बाइकची किंमत 68,328 रुपये एक्स-शोरूम इतकी आहे.
Yamaha Ray ZR 125
स्टायलिश आणि स्पोर्ट बाइक तयार करणारी यामाहा सुद्धा मायलेज देणाऱ्या बाइकच्या शर्यतीत आहे. यामाहाची रे-जेडआर 125 एफआय ही एक हायब्रिड स्कुटर आहे. एका लिटरमध्ये ही स्कुटर तब्लब 71.33 किलोमीटर इतकं मायलेज देते. या स्कुटरची किंमत 87,888 रुपये एक्स-शोरूम इतकी आहे.