TRENDING:

उन्हाळ्यात पांढऱ्या कारच्या तुलनेत काळी कार जास्त गरम होते? जाणून घ्या फॅक्ट 

Last Updated:

उन्हाळा सुरु होत आहे आणि आता उष्णता वाढणार. अशावेळी कुठेही माणूस घामाघूम होतो. तुम्ही असं ऐकलं असेल की, काळा रंग हा उष्णता लवकर शोषूण घेतो. पांढरा रंग गारवा देतो. कारच्या बाबतीही असं होतं का? चला जाणून घेऊया.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Black vs White Car Heat: मार्च महिना सुरू झाला आहे आणि उन्हाळ्याची चाहूल लागलीये. उन्हाळ्यात उष्णता प्रचंड वाढते. अशावेळी उन्हात उभ्या असलेल्या कारमध्ये बसणेही कठीण वाटू लागतं. अशावेळी लोकांच्या मनात प्रश्न उपस्थित होतो की, काळा रंग खरंच पांढऱ्या कारच्या तुलनेत जास्त गरम होतो का? की हा फक्त आपला समज आहे? चला याविषयी सविस्तर जाणून घेऊया.
ब्लॅक कार vs व्हाइट कार
ब्लॅक कार vs व्हाइट कार
advertisement

तुम्हीही नवी कार खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि कारच्या रंगाविषयी कंफ्यूज असाल तर रंग आणि तापमानातील थेट संबंध समजून घेणे गरजेचे आहे.

काळ्या कार खरंच जास्त गरम होतात का?

सोप्या शब्दात जाणून घ्यायचं झाल्यास, काळ्या कार सामान्यतः जास्त गरम होतात. यामागे वैज्ञानिक कारण आहे. काला रंग सूर्याचा प्रकाश आणि इंफ्रारेड किरणांना जास्त प्रमाणात शोषूण घेतो.

advertisement

'या' आहेत देशातील 10 सर्वात बेस्ट Electric Car! जाणून घ्या किंमती, फीचर्ससह रेंज डिटेल्स

ज्यावेळी ऊन हे कारच्या बॉडीवर येतं. तेव्हा काळा रंग जास्त ऊर्जा एब्जॉर्ब करुन त्याला उष्णतेत रुपांतरीत करते. या उलट, पांढरा किंवा फिकट रंगांच्या कार सूर्य किरणांचा मोठा भाग रिफ्लेक्ट करतात. याच कारणामुळे एकसारख्या परिस्थितीत काळ्या कारच्या बाहेरचा भाग पांढऱ्या कारच्या तुलनेत जास्त गरम होतात.

advertisement

केबिन तापमान का वाढते?

कारमधील तापमान केवळ बाहेरील रंगाने ठरवले जात नाही. खरा खेळ म्हणजे ग्रीनहाऊस इफेक्ट. जेव्हा सूर्यप्रकाश कारच्या खिडक्यांमधून आत जातो तेव्हा डॅशबोर्ड, सीट्स आणि इतर पृष्ठभाग गरम होतात. ही उष्णता आत अडकते, ज्यामुळे केबिनचे तापमान वेगाने वाढते. संशोधनातून असे दिसून आले आहे की अशाच परिस्थितीत, काळ्या कारचे आतील भाग पांढऱ्या कारपेक्षा काही अंशांनी जास्त गरम असू शकते. तसंच, आत वापरलेले साहित्य आणि रंग देखील महत्त्वपूर्ण परिणाम करतात. केबिनमधील गडद रंगाच्या सीट्स आणि डॅशबोर्ड हलक्या रंगाच्या सीट्सपेक्षा जास्त उष्णता शोषून घेतात आणि जास्त काळ टिकवून ठेवतात.

advertisement

पेट्रोलचं टेन्शनच नाही! 1 लाखांहून कमीमध्ये येते ही इलेक्ट्रिक बाईक, रेंज किती?

रंगापेक्षा महत्त्वाचे काय?

अनेकदा लोक बाहेरच्या पेंटला दोष देतात. मात्र अनेकदा केबिनची डिझाइन आणि मटीरियल मोठा फरक पाडतात.कारच्या आतील इंटीरियर फिकट रंगाचा आहे आणि चांगल्या क्वालिटीचा फॅब्रिक किंवा लेदरचा वापरला आहे तर तापमान थोडे कमी जाणवते. म्हणजेच फक्त कारचा रंग नाही तर आंतील स्ट्रक्चरही महत्त्वाची भूमिका निभावते.

advertisement

उष्णतेत कार गार ठेवण्याच्या सोप्या पद्धती

तुमही कार उन्हात जास्त गरम होत असेल तर काही सोपे उपाय मदत करु शकतात. प्रयत्न करा की, गाडीला सावलीत पार्क करा. विंडशील्डवर सनशेड लावा जेणेकरुन ऊन थेट आत येणार नाही. टिंडेड ग्लासही तापमान कमी करण्यात मदत करते. कारमध्ये बसण्यापूर्वी काही मिनिटे खिडक्या ओपन करा, जेणेकरुन आतील उष्ण हवा बाहेर निघू शकेल. या व्यतिरिक्त चांगला एयर कंडीशनिंग सिस्टम आणि व्हेंटिलेटेड सीट प्रवासाला आरामदायक बनवू शकतील.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
इराणचा ‘तो’ निर्णय अन् महाराष्ट्रातला शेतकरी संकटात, काय घडतंय, पाहा Video
सर्व पहा

अखेरीस हे सांगणं चूक ठरणार नाही की, काळी कार उन्हात जास्त गरम होते. मात्र योग्य देखरेख आणि काही समजदारीची पाऊलं उचलली तर कोमत्याही रंगाची कार उन्हाळ्यात जास्त गरम होणार नाही.

मराठी बातम्या/ऑटो/
उन्हाळ्यात पांढऱ्या कारच्या तुलनेत काळी कार जास्त गरम होते? जाणून घ्या फॅक्ट 
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल