TRENDING:

Car इन्शुरन्स रिन्यू करताय? आधी हे वाचा, अपघात होऊनही लागणार नाहीत पैसे

Last Updated:

सध्याच्या काळात बऱ्याच लोकांकडे कार आहेत. ज्यांच्याकडे कार आहे त्यांना विमा काढावा लागतो. नवीन कारचं विमा रिन्यू करत असताना Zero Depreciation पॉलिसी घेण्याचा सल्ला अनेकांना दिला जातो. तुम्हीही घेत असाल तर आधी ही माहिती अवश्य वाचा...

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : कार वापरणाऱ्यांसाठी कार इन्शुरन्स घेणं खुप गरजेचं झालं आहे. पण अनेक लोक हे कार इन्शुरन्स घेताना कंफ्यूज असतात. कारण त्यांना याविषयी जास्त माहिती नसते. गाडीचा विमा रिन्यू करत असताना झिरो डेप्रिसिएशन पॉलिसी घेणं हे सध्याच्या काळात कार मालकांसाठी एक स्मार्ट निर्णय ठरतोय. विशेषतः 5 वर्षे जुन्या गाड्या असलेल्यांसाठी, त्यांच्यासाठी अ‍ॅड-ऑन कव्हर खुपच फायदेशीर ठरते. मात्र अनेक लोकांना याविषयी चुकीा समज आहे. ते विचार करतात की, यामुळे अ‍ॅक्सीडेंट झाल्यावर खिशातून एक रुपयाही जात नाही.मात्र सत्य खुप वेगळं आहे. आज आपण जाणून घेऊया की, झिरो डेप काय आहे, याचे फायदे काय आहेत आणि अ‍ॅक्सीडेंट क्लेममध्ये खिशातून खर्च न लागण्याचा खरा नियम कोणता?
कार इन्शुरन्स
कार इन्शुरन्स
advertisement

झिरो डेप्रिसिएशन कव्हर म्हणजे काय?

झिरो डेप्रिसिएशन (निल डेप्रिसिएशन/बंपर टू बंपर कव्हर) कार विमाच्या कॉम्प्रिहेंसिव्ह पॉलिसीमध्ये एक पर्यायी अ‍ॅड-ऑन कव्हर असते. सामान्य विमा पॉलसीमध्ये अपघात किंवा नुकसान होते, तेव्हा विमा कंपनी क्लेम सेटर करताना गाडीच्या पार्ट्स म्हणजेच प्लास्टिक बंपर, फायबर बॉडी पार्ट्स, रबरचे भाग, हेडलाइट्स, ग्लास इत्यादी) ची डेप्रिसिएशन व्हॅल्यू कट करते .

advertisement

आता डेप्रिसिएशन म्हणजे काय? तर गाडी जेवढी जुनी होत जाते. त्याच्या पार्ट्सची व्हॅल्यू तेवढीच कमी होते. उदाहरण पाहायला गेल्यास, नव्या गाडीमध्ये प्लास्टिक पार्ट्सवर 0-5% डेप्रिसिएशन. 2-3 वर्षे जुन्या गाडीमध्ये 30-50% पर्यंत. तर 5 वर्षांहून जास्त जुन्या गाडीत 50% किंवा जास्त.

2026 Kia Sonetची मार्केटमध्ये दमदार एंट्री! पाहा कोणते बदल झाले, किंमत फक्त...

advertisement

याच कारणामुळे क्लेम अमाउंट ही कमी होत जाते. मग कार मालकांना आपल्या खिशातून पैसे द्यावे लागता. झिरो-डेप कव्हरेजमुळे ही कपात दूर होते. म्हणजेच, विमा कंपनी भागांचे पूर्ण बाजार मूल्य देते (कोणत्याही कपातीशिवाय). झिरो-डेप इन्शुरन्सचे फायदे जाणून घेऊया.

क्लेममध्ये जास्त फायदे मिळतात : अपघातात बंपर, डोर, हेडलाइट्स किंवा विंडशील्ड बदलावी लागली तर सामान्य पॉलिसीमध्ये 30-50% होऊ शकते. झिरो डेपमध्ये पूर्ण रक्कम दिली जाते. ज्यामुळे हजारो ते लाखो रुपयांपर्यंत बचत केली जाऊ शकते. विशेषतः लग्जरी किंवा महागड्या कारमध्ये हा खुप मोठा फायदा होतो.

advertisement

खिशातून खर्च कमी होतो : डेप्रिसिएशन कपात झाली नाही खिशातून पैसा खुप कमी खर्च होतो. अनेक प्रकरणात फक्त कंपल्सरी डिडक्टिबल (जे 1000-2000 रुपयांपर्यंत होते) तेच द्यावे लागते.

नव्या गाड्यांसाठी परफेक्ट : अनेक विमा कंपन्या हा कव्हर फक्त 5 वर्षे जुन्या गाड्यांनाच देतात. मात्र काही 7-10 वर्षांपर्यंतच्या गाड्यांनाही देतात. अनेक कारमध्ये पार्ट्स महागडे असतात. यामुळे हे कव्हर प्रीमियमच्या तुलनेत अनेक पटींनी फायदेशीर ठरते.

advertisement

मार्केटमध्ये आली जबरदस्त रेंजची Electric Scooter! किंमत फक्त 49,999 रुपये

प्लास्टिक, रबर, फाइबर पार्ट्सची पूर्ण सुरक्षा : हे पार्ट्स सर्वाधिक डेप्रिसिएट असतात आणि झिरो डेप त्यांना पूर्णपणे कव्हर देते.

मानसिक दिलासा : शहरांमध्ये ट्रॅफिक जास्त असते, अशावेळी लहान मोठे स्क्रॅच किंवा अपघात सामान्य आहेत. झिरो डेपमुळे क्लेम प्रोसेस सोपी आणइ कमी खर्चिक होते.

खिशातून एक रुपयाही लागत नाही का? सत्य काय?

अनेकांना गैरसमज असतो की, झिरो डेप घेतल्याने 100% सर्व फ्री होते. खिशातून एक रुपयाही द्यावा लागत नाही. मात्र हे पूर्ण सत्य नाही. झिरो डेप फक्त डेप्रिसिएशन कपात कमी करते. मात्र काही खर्च तुम्हाला द्यावे लागू शकतात. ते खर्च कोणते आहेत जाणून घेऊया.

कंपल्सरी डिडक्टिबल: हे प्रत्येक पॉलिसीमध्ये ठरवलेले आहे आणि कारच्या किमतीनुसार 1000-5000 पर्यंत असू शकते. ही रक्कम विमा कंपनीकडून दिली जात नाही, तर तुम्हाला द्यावी लागते.

वॉलंटरी डिडक्टिबल : तुम्ही पॉलिसीमध्ये अतिरिक्त डिडक्टिबल निवडले असेल तरीही खिशातून जाते.

कंज्यूमेबल आयटम्स: ऑइल, ब्रेक फ्लुइड, गॅस्केट, नट आणि बोल्ट यासारख्या वस्तू सामान्यतः स्वतंत्र कंज्यूमेबल कव्हर घेतल्याशिवाय कव्हर होत नाही.

टायर्स, बॅटरी, इंजिनचे पार्ट्स: हे वेगळे कव्हर करण्यात आलेले नाहीत. इंजिन प्रोटेक्शन कव्हर तुम्हाला वेगळे अ‍ॅड-ऑन करावे लागेल.

नॉन-अ‍ॅक्सीडेंटल डॅमेज : वियर एंड टियर किंवा सामान्य स्क्रॅच यामध्ये कव्हर नसते.

थर्ड पार्टी क्लेम : तुमच्या चुकीमुळे दुसऱ्या कोणाला नुकसान झाले तर थर्ड पार्टी लायबिलिटी वेगळी कव्हर होते. अशावेळी झिरो डेपचा उपयोग होत नाही.

उदाहरण: समजा तुम्हाला 50,000 रुपयेांचं बिल अपघातात आलं. एका सामान्य पॉलिसीमध्ये 20,000 रुपयांची डेप्रिसिएशन कपात असू शकते, म्हणून कंपनी 30,000 रुपये देईल आणि तुम्हाला 20,000 हून जास्त डिडक्टेबल द्यावी लागेल. झिरो डेप पॉलिसीमध्ये, कंपनी संपूर्ण 50,000 रुपये (डिडक्टिबल वगळून) देईल, म्हणजेच तुमचे खर्च डिडक्टिबल रकमेपर्यंत मर्यादित असतील.

म्हणूनच खरं सांगायचं झाल्यास, डेपने खिशातून खुप कमी खर्च होऊ शकतो. मात्र पूर्ण फ्री होईल असं नाही. तुम्ही कंज्यूमेबल कव्हर, रोडसाइड असिस्टेंस इत्यादी अ‍ॅड-ऑनही घेतले. तर खर्च आणखी कमी होऊ शकतो. मात्र इन्शुरन्स चा प्रीमियम खुप वाढेल.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
पुणेकराचा देशी जुगाड, गोडतेलावरची फ्यूल चूल, 7 रुपयांत एक तास चालणार!
सर्व पहा

आमचा सल्ला : गाडीचा विमा रिन्यू करत असताना झिरो डेप्रिसिएशन कव्हर अवश्य निवडा. तुमही गाडी नवी असेल तर हे करणे गरजेचे आहे. शहरात जास्त चालत असेल किंवा महाग असेल तर हे खुप गरजेचे असते. याचा प्रीमियम थोडा जास्त असतो म्हणजेच जवळपास 20-30% जास्त लागतो. पण एकदा क्लेम आल्यावर हे अनेक पट बचत करते. पॉलिसी डॉक्यूमेंट नेहमी चांगल्या प्रकारे वाचा आणि विमा कंपनीला स्पष्ट प्रश्न विचारा.

मराठी बातम्या/ऑटो/
Car इन्शुरन्स रिन्यू करताय? आधी हे वाचा, अपघात होऊनही लागणार नाहीत पैसे
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल