TRENDING:

'या' महिन्याच्या अखेरीस होणार धमाका, मार्केटमध्ये एंट्री मारणार या 5 गाड्या

Last Updated:

Upcomig Cars In The Second Half Of February 2026: या महिन्याच्या सेकंड हाफमध्ये ऑटो मार्केटमध्ये मोठा धमाका होणार आहे. 5 भारी गाड्या फेब्रुवारीच्या सेकंड हाफमध्ये एंट्री मारणार आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : फेब्रुवारी 2026 चा सेकंड हाफ भारतीय ऑटोमोबाईल बाजारासाठी रोमांचक ठरणार आहे. येथे अनेक नवनवीन कार लॉन्च होणार आहेत. ईको-फ्रेंडली ईव्हीपासून तर लग्जरी एसयूव्हीपर्यंत नवीन गाड्या टेक्निकल इनोवेशन, चांगली रेंज आणि आकर्षक डिझाइनसह येत आहेत. मारुती सुझुकी आणि टोयोटासारख्या ब्रांड ईव्ही सेगमेंटमध्ये पाऊल ठेवत आहेत. तर टाटा, निसान आणि फॉक्सवॅगन अपडेटेड मॉडल्स सादर करत आहेत.
अपकमिंग कार
अपकमिंग कार
advertisement

या कार 10 लाखांपासून ते 50 लाख रुपयांपर्यंतच्या किंमतीत उपलब्ध असतील. ज्या बजेटपासून प्रीमियम खरेदीदारांना आकर्षित करतली. वाढत्या ईव्ही डिमांडमध्ये हे लॉन्च बाजाराला नवीन ऊर्जा देईल आणि कंपटीशन वाढवेल. एकूणच, हा महिना ऑटो इंथुजिआस्टसाठी खुप भारी असणार आहे. चला अपकमिंग इव्हेंट्सवर एक नजर टाकूया.

मॉडर्न लूकसह येतेय नवी Hyundai Verna! किंमत, फीचर्समध्ये होणार 'हे' बदल

advertisement

Volkswagen Tayron R-Line

फॉक्सवॅगन टॅरॉन आर-लाइन फॉक्सवॅगनची फ्लॅगशिप एसयूव्ही आहे. जी फेब्रुवारीच्या अखेरीस लॉन्च होईल. ही 7-सीटर एसयूव्ही टिगुआनचा मोठा व्हर्जन आहे. ज्यामध्ये 2.0-लीटर टीएसआय पेट्रोल इंजिन आहे. जे 204 पीएस पॉवर आणि 320 एनएम टॉर्क देते. 7-स्पीड डीएसजी गियरबॉक्स आणि ऑल-व्हील ड्राइव्हसह ही शानदार परफॉर्मेंस देईल. डिझाइनमध्ये कनेक्टेड एलईडी लाइट्स, शार्प लाइन्स आणि मॉडर्न लूक आहे. इंटीरियरमध्ये ड्यूअल-स्क्रिन सेटअप, एडास आणि प्रीमियम फीचर्स आहेत. अंदाजे किंमत 48-50 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे.

advertisement

Toyota Urban Cruiser Ebella EV

टोयोटा अर्बन क्रूझर एबेला ईव्ही टोयोटाची पहिली मास-मार्केट इलेक्ट्रिक एसयूव्ही आहे. जी 16-19 फेब्रुवारीला लॉन्च होईल. ही मारुती ई-विटाराचा रिबॅज्ड व्हर्जन आहे. ज्यामध्ये 49 kWh किंवा 61 kWh बॅटरी पॅक आहे आणि 500 किमीहून जास्त रेंज मिळते. डिझाइनमध्ये पिक्सल-स्टाइल एलईडी लाइट्स, स्लीक बंपर्स आणि क्लीन लूक आहे. इंटीरियरमध्ये ड्यूअल स्क्रीन्स एडास आणि सेफ्टी फीचर्स आहेत. अंदाजे किंमत 16-20 लाख रुपये आहे. जी टाटा कर्व्ह ईव्ही आणि हुंडई क्रेटा ईव्हीला टक्कर देईल.

advertisement

MG Majestor खरेदीचा प्लॅन आहे? जाणून घ्या 5 गोष्टी, नंतर होणार नाही पाश्चाताप

Maruti Suzuki e Vitara

मारुती सुझुकी ई विटारा कंपनीची पहिली बॉर्न-इलेक्ट्रिक कार आहे. जी फेब्रुवारीच्या अखेरपर्यंत येईल. HEARTECT-e प्लेटफॉर्मवर तयार ही एसयूव्ही 49 kWh आणि 61 kWh बॅटरीसह 500 किमीहून जास्त रेंज देईल. रग्ड डिझाइन, ड्यूअल-स्क्रिन इंटीरियर, एडास आणि अडव्हान्स फीचर्ससह येईल. अंदाजे किंमत 15-30 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. ही टाटा कर्व्ह ईव्ही, एमजी जेडएस ईव्ही आणि ह्युंडई क्रेटा ईव्हीला टक्कर देईल.

advertisement

Tata Punch EV Facelift

टाटा पंच ईव्ही फेसलिफ्ट 20 फेब्रुवारी रोजी लाँच होणार आहे. हे अपडेटेड मॉडेल 40.5 kWh  बॅटरी पॅकसह 500 किमी पर्यंतची रेंज देण्याची शक्यता आहे. डिझाइनमध्ये नवीन ग्रिल, एलईडी लाईट्स आणि आधुनिक अपडेट्स आहेत. इंटीरियरमध्ये सुधारित फीचर्स, मोठी टचस्क्रीन आणि सेफ्टी किट समाविष्ट आहे. अंदाजे किंमत 9.99-14.5 लाख आहे. ही कॉम्पॅक्ट ईव्ही या सेगमेंटमध्ये एक मजबूत पर्याय असेल, जी बजेट ईव्ही खरेदीदारांना आकर्षित करेल.

Nissan Gravite 

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
पुणेकर आजही पितात ब्रिटिशांनी उभारलेल्या वाड्यातून दूध, आजही आहे 1500 गायी-म्हशी
सर्व पहा

निसान ग्रेवाइट 17 फेब्रुवारीला डेब्यू करेल. ही कॉम्पॅक्ट एमपीव्ही रेनो ट्रायबरवर आधारित आहे. जी सब-4M सेगमेंटमध्ये 7-सीटर ऑप्शन देईल. डिझाइनमध्य यूनिक ग्रिल, एलईडी लाइट्स आणि मॉडर्न लूक आहे. इंजिन ऑप्शनमध्ये 1.0-लीटर पेट्रोलचा समावेश असू शकतो. अंदाजे किंमत 6.9 लाख रुपये आहे. जी बजेट फॅमिली कारच्या रुपात आकर्षक ठरेल. हे निसानचं भारतीय बाजारात कमबॅक बजबूत करेल.

मराठी बातम्या/ऑटो/
'या' महिन्याच्या अखेरीस होणार धमाका, मार्केटमध्ये एंट्री मारणार या 5 गाड्या
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल