ब्रेक आवाज करू लागला तर
गाडी चालवताना, ब्रेक लावताना, जर तुम्हाला रबिंगचा आवाज ऐकू आला तर तुम्ही समजून घेतले पाहिजे की ब्रेक पॅड बदलण्याची वेळ आली आहे. हा आवाज पॅडच्या जीर्ण पृष्ठभागावर रोटर्सच्या धातूवर घासल्यामुळे होतो.
लेकीला कॉलेजला जाण्यासाठी गिफ्ट द्या 'या' इलेक्ट्रिक स्कूटर! किंमत 62 हजारांपासून सुरु
याशिवाय, ब्रेक पॅड खराब होऊ लागले आहेत की नाही हे पाहून तुम्ही हे देखील शोधू शकता. ते म्हणजे त्यांची जाडी कमी झाली असेल तर ते बदलणे चांगले. एवढेच नाही तर जर पॅडची जाडी 2mm पर्यंत कमी झाली असेल तर ते ताबडतोब बदला, कारण ते खराब झाले आहेत.
advertisement
ब्रेकिंग खराब होऊ लागते, ब्रेकिंग फोर्स देखील कमी होतो
गाडी चालवताना ब्रेक पॅड खराब होतात तेव्हा ब्रेकिंग फोर्स कमी होऊ लागतो. यामुळे ब्रेकिंग अप्रभावी होते. जर तुम्हाला अचानक गाडी थांबवावी लागली तर गाडी थांबत नाही, थोडी पुढे गेल्यावर ती मंदावते. तर काही प्रकरणांमध्ये ब्रेक काम करत नाहीत आणि अपघाताची शक्यता वाढते.
ऑफिसला किती दिवस पावसामध्ये भिजत जाणार? घरी आणा 34 किमी मायलेज देणारी CAR
कार डॅशबोर्ड वॉर्निंग लाइट्स
आजकाल अनेक नवीन कारमध्ये सेफ्टी सेन्सर बसवलेले असतात जे डॅशबोर्डवरील वॉर्निंग लाइट्सच्या स्वरूपात जीर्ण झालेले ब्रेक पॅड दर्शवतात. जेणेकरून तुम्हाला कळेल की ब्रेक पॅड खराब होऊ लागले आहेत आणि ते वेळेत बदलले पाहिजेत.
ब्रेक लावताना तुम्हाला ब्रेक पेडलवर थोडासा कंपन जाणवत असेल तर ते जीर्ण झालेले ब्रेक पॅड असल्याचे लक्षण आहे. त्याकडे दुर्लक्ष करू नका आणि सर्व्हिस सेंटरसी संपर्क साधा. जर तुम्ही ही सुरुवातीची चिन्हे वेळीच समजून घेतली तर तुमच्या गाडीतील ब्रेकिंग कधीही खराब होणार नाही.
