ईव्ही कार म्हणजे काय?
इलेक्ट्रिक कार पूर्णपणे बॅटरीवर चालतात आणि त्यांना पेट्रोल किंवा डिझेलची आवश्यकता नसते. या कार चार्ज करण्यासाठी विजेचा वापर केला जातो. भारतात अनेक कंपन्यांनी ईव्ही लाँच केल्या आहेत, ज्यामध्ये टाटा नेक्सॉन ईव्ही सारख्या कार खूप लोकप्रिय आहेत. ईव्ही कारचे फायदे:
- इंधन खर्च जवळपास संपतो
- प्रदुषण खुप कमी होते
- मेंटेनेंसचा खर्च कमी
advertisement
एक लहान निर्णय आणि महिन्याला होईल 3,550 रुपयांची बचत! डेली प्रवास करणाऱ्यांसाठी बेस्ट
हायब्रिड कार म्हणजे काय?
हायब्रिड कारमध्ये पेट्रोल इंजिनसह एक इलेक्ट्रिक मोटरही असते. म्हणजेच ही कार पेट्रोल आणि वीज दोन्हीने चालते. यामुळे मायलेज चांगले होते आणि इंधन कमी लागते. भारतात टोयोटा इनोव्हा हायक्रॉस आणि टोयोटा अर्बन क्रूझर हायरायडर सारख्या कार या सेगमेंटमध्ये लोकप्रिय आहेत. हायब्रिड कारचे फायदे :-
- पेट्रोल कारच्या तुलनेत जास्त मायलेज
- चार्जिंगचं टेन्शन नाही
- दूरच्या प्रवासासाठी बेस्ट
फक्त 1500 रुपयांच्या EMI वर मिळेल ही बाइक! फूल टँकमध्ये चालते 700KM
सर्वसामान्यांसाठी कोणती बेस्ट?
तुम्ही शहरात जास्त ड्राइव्ह करत असाल आणि तुमच्या आजुबाजूला चार्जिंग स्टेशन उपलब्ध असतील. तर EV एक चांगला ऑप्शन होऊ शकतो. यामुळे इंधन खर्चात खुप बचत होऊ शकते. तसंच तुम्ही नेहमीच लांबचा प्रवास करत असाल किंवा अशा परिसरात राहत असाल जिथे चार्जिंग इंफ्रास्ट्रक्चर कमी आहे. तर हायब्रिड कार जास्त प्रॅक्टिकल ऑप्शन ठरु शकते.
