TRENDING:

एका पाठोपाठ 4 गाड्या लॉन्च करणार Hyundai! मॉडर्न टेक्नॉलॉजीने असतील सुसज्ज 

Last Updated:

upcoming cars 2026: Hyundai 2026 मध्ये भारतात 4 नव्या कार लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. या लिस्टमध्ये Verna Facelift पासून नवीन ईव्ही आणि एसयूव्हीचाही समावेश ईहे. चला या कारच्या फीचर्सविषयी जाणून घेऊया.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : 2025 मध्ये अनेक शानदार कार लॉन्च केल्यानंतर Hyundai आता 2026 साठी मोठा प्लॅन तयार केला आहे. कंपनी पुढील वर्षी बजेटपासून प्रीमियम सेगमेंटपर्यंत एकूण चार नव्या कार्स भारतात लॉन्च करु शकते. या गाड्यांमध्ये फेसलिफ्टपासून नवीन इलेक्ट्रिक कार आणि एक अगदी नव्या SUV चा समावेश आहे. रिपोर्ट्सनुसार Hyundai चा पहिला लॉन्च 2026 च्या दुसऱ्या तिमाहीमध्ये पाहयाला मिळू शकतो. चला या अपकमिंग कारच्या लिस्टवर एक नजर टाकूया...
ऑटो न्यूज
ऑटो न्यूज
advertisement

1. Verna Facelift

Hyundai 2026 ची सुरुवात 6th जेनरेशन Vernaच्या फेसलिफ्ट मॉडलपासून करु शकते. सध्याची Verna मार्च 2023 मध्ये लॉन्च करण्यात आली होती आणि कंपनी आपल्या तीन वर्षाच्या प्रॉडक्ट लाइफसायकलच्या हिशोबाने एप्रिल 2026 मध्ये याचं अपडेटेड व्हर्जन सादर करु शकते. नवीन Verna चा फ्रंट डिझाइन लेटेस्ट Hyundai Sonata ने इंस्पायर्ड असेल. ज्यामुळे याचा लूक पहिल्यापेक्षा शार्प आणि स्पोर्टी दिसेल. यामध्ये 12.3-इंचाचा डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर आणि 12.3-इंच टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम मिळेल. जो वायरलेस Android Auto आणि Apple CarPlay सपोर्ट कले. इंजिन ऑप्शन पहिल्यासारखाच राहण्याची आशा आहे.

advertisement

33.77 KM मायलेज, सनरुफ आणि 6 एअरबॅग! मार्केटमध्ये तुफान विक्री होतेय 'ही' सेडान, किंमत फक्त...

2. Hyundai Exter Facelift

ह्युंदाई एक्स्टर फेसलिफ्ट 2026 च्या दुसऱ्या तिमाहीत लाँच होण्याची अपेक्षा आहे. नवीन एक्स्टरमध्ये 12.9-इंचाचा मोठा टचस्क्रीन सिस्टम आणि 9.9-इंचाचा डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले असण्याची अपेक्षा आहे. यात नवीन फ्रंट बंपर, अपडेटेड हेडलॅम्प आणि टेललॅम्प आणि नवीन 15-इंचाचे अलॉय व्हील्स देखील असू शकतात. तसंच, त्याच्या इंजिन आणि ट्रान्समिशनमध्ये कोणतेही बदल अपेक्षित नाहीत.

advertisement

3. नवी Ioniq 5 EV

जून किंवा जुले 2026 मध्ये Hyundai आपली इलेक्ट्रिक कार Ioniq 5 चा फेसलिफ्ट व्हर्जन भारतात लॉन्च करु शकते. या EV मध्ये नवीन डिझाइन एलिमेंट्ससह रियर वाइपर, डिजिटलच्या 2, नवी स्टीयरिंग व्हील आणि 12.3-इंचचे दोन मोठे डिस्प्ले मिळतील. सर्वात खास गोष्ट म्हणजे, यामध्ये 84kWh ची मोठी बॅटरी मिळू शकते. ज्यामुळे याची ड्रायव्हिंग रेंज आणखी चांगली होईल.

advertisement

Tata ने आणली मायलेदार SUV, आता Maruti Wagon R पेक्षा आहे मजबूत अन् किंमतही कमी!

4. Venueच्या वर नवीन SUV

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
15 वर्षांच्या पूजाच्या मागे लागला साप? 3 महिन्यात 7 वेळा केला दंश, जालन्यातील...
सर्व पहा

ह्युंदाई सणासुदीच्या काळात Bayon ही एक पूर्णपणे नवीन SUV लाँच करण्याची अपेक्षा आहे. ही 4 मीटरपेक्षा कमी उंचीची एसयूव्ही असेल आणि व्हेन्यूच्या वर स्थित असेल. ती चौथ्या पिढीच्या आय२० च्या प्लॅटफॉर्मवर आधारित असेल आणि 1.2-लिटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिनद्वारे समर्थित असेल अशी अपेक्षा आहे.

advertisement

मराठी बातम्या/ऑटो/
एका पाठोपाठ 4 गाड्या लॉन्च करणार Hyundai! मॉडर्न टेक्नॉलॉजीने असतील सुसज्ज 
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल