MG Windsor ev ग्राहकांची पहिली पसंती बनली
MG ची Windsor ev ग्राहकांना सतत आवडत आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, या कारने अवघ्या 8 महिन्यांत 27,000 युनिट्सच्या विक्रीचा आकडा ओलांडला आहे. विंडसर ईव्ही ही भारतातील सर्वाधिक विक्री होणारी इलेक्ट्रिक कार बनली आहे. काही काळापूर्वी, ती कार लांब रेंजसह सादर करण्यात आली होती. विंडसर ईव्ही दोन बॅटरी पॅकसह येते, त्यापैकी एक 38 kWh बॅटरी पॅक आहे आणि दुसरा 52.9 kWh बॅटरी पॅक आहे. ज्याची रेंज अनुक्रमे 332 किमी आणि 449 किमी आहे.
advertisement
मारुती आणि हुंडईने दिलं मान्सून डिस्काउंट! 1.40 लाखांपर्यंत होईल बचत, पहा किंमत किती
तुम्ही तुमच्या गरजेनुसार मॉडेल निवडू शकता. त्यात बरीच चांगली जागा आहे. सामान ठेवण्यासाठी या कारमध्ये 604 लिटरची बूट स्पेस आहे. विंडसर प्रो ईव्हीची किंमत 17.49 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. सुरक्षिततेसाठी, यात 6 एअरबॅग्ज, एबीएस, ईबीडी, 360 डिग्री कॅमेरा, ईपीएस, रेन सेन्सिंग वायपर, फॉलो मी हेडलॅम्प आणि एलईडी कॉर्नरिंग लाईट तसेच Level 2 ADAS सारखी अनेक वैशिष्ट्ये आहेत. डिझाइन, जागा आणि रेंजच्या बाबतीत ती खूपच चांगली आहे.
बाईकमधील ABS म्हणजे काय? मोटरसायकलमध्ये कशा प्रकारे करते काम
एमजी लवकरच भारतात त्यांच्या दोन नवीन इलेक्ट्रिक कार लाँच करणार आहे. ज्यामध्ये MG M9 आणि Cyberster यांचा समावेश आहे. M9 चाचणी दरम्यान नोएडा एक्सप्रेसवेवर दिसला आहे.