TRENDING:

Cyberster: आता Ferrari घेण्याचं स्वप्न होईल पूर्ण, MG मोटर्सने आणली स्पोर्ट कार, किंमतही कमी

Last Updated:

मागील आठवड्यातच एमजी मोटर्सने  MG9 नावाची एमपीव्ही लाँच केली होती. त्यानंतर आता ही स्पोर्ट कार लाँच केली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
JSW MG मोटर्सने मागील काही दिवसांपासून भारतीय ऑटो मार्केटमध्ये एकापेक्षा कार लाँच करून खळबळ उडवून दिली आहे. आता पुन्हा एकदा MG मोटर्सने  भारतात सायबरस्टर (Cyberster) नावाची सुपरकार लाँच केली आहे. मागील आठवड्यातच एमजी मोटर्सने  MG9 नावाची एमपीव्ही लाँच केली होती. त्यानंतर आता ही स्पोर्ट कार लाँच केली आहे. या कारचं वैशिष्ट्य म्हणजे, कारची सर्वात कमी किंमत. या कारची किंमत ज्याची किंमत ७४.९९ लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. लक्झरी इलेक्ट्रिक एमपीव्ही प्रमाणे, सायबरस्टर फक्त एमजी सिलेक्ट MG Select डीलरशिपवर उपलब्ध आहे.
News18
News18
advertisement

MG मोटर्सने या वर्षी मार्चमध्ये ५१,००० रुपयांच्या टोकन रकमेपासून Cyberster ची प्री-बुकिंग सुरू झाली. ज्या ग्राहकांना आधीच कार प्री-बुकिंग केली आहे, त्यांना ७२.४९ लाख रुपये (एक्स-शोरूम) द्यावे लागतील. काही आठवड्यांपूर्वी डीलरशिपवर  Cyberster च्या युनिट्स येण्यास सुरुवात झाली आहे. एमजी Cyberster ची डिलिव्हरी १० ऑगस्ट २०२५ पासून सुरू होईल. Cyberster ही १९६० च्या दशकातील आयकॉनिक एमजीबी रोडस्टरपासून प्रेरित आहे. या कन्व्हर्टिबलमध्ये रिट्रॅक्टेबल हार्डटॉप आणि बोल्ड २०-इंच अलॉय व्हील्स आहेत. मागील बाजूस, इंडिकेटर असलेले स्लीक कनेक्टेड एलईडी टेल लाइट्स त्याला आकर्षक लूक देतात.

advertisement

 ड्युअल-टोन कलर पर्याय

Cyberster चार ड्युअल-टोन बाह्य रंग पर्यायांमध्ये उपलब्ध आहे, ज्यामध्ये ब्लॅक रूफसह न्यूक्लियर यलो, ब्लॅक रूफसह फ्लेअर रेड, रेड रूफसह अँडीज ग्रे आणि रेड रूफसह मॉडर्न बेज यांचा समावेश आहे.

सेफ्टी फिचर्स

सुरक्षिततेच्या दृष्टीने, लेन-कीपिंग असिस्ट, अ‍ॅडॉप्टिव्ह क्रूझ कंट्रोल, इमर्जन्सी ब्रेकिंग आणि टक्कर चेतावणी यासह लेव्हल २ ADAS फिचर्स दिले आहेत. तसंच कारमध्ये ६ एअरबॅग्ज, ३६०-डिग्री कॅमेरा, ट्रॅक्शन कंट्रोल, ईएसपी, ब्लाइंड स्पॉट मॉनिटरिंग आणि टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम दिलं आहे.

advertisement

580 किमी रेंज

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शोरमा विकून महिन्याला किती कमाई होऊ शकते? प्रणयचं इन्कम पाहून तुम्ही कराल कौतुक!
सर्व पहा

MG Cybersterरमध्ये ड्युअल-मोटर, ऑल-व्हील ड्राइव्ह सेटअप आहे. या ड्युअल-मोटर सेटअपमधून एकत्रित आउटपुट ५०४ बीएचपी आणि ७२५ एनएम पीक टॉर्क आहे. चार ड्राइव्ह मोड उपलब्ध असून यामध्ये कम्फर्ट, कस्टम, स्पोर्ट आणि ट्रॅक. ड्युअल-मोटर सेटअप ७७ किलोवॅट प्रति तास बॅटरी पॅकमधून पॉवर घेतो ज्याचे एमजी ११० मिमीवरील सर्वात पातळ बॅटरी म्हणून वर्णन करते. ही बॅटरी एका चार्जवर ५८० किमीची रेंज असल्याचा दावा करते.

advertisement

मराठी बातम्या/ऑटो/
Cyberster: आता Ferrari घेण्याचं स्वप्न होईल पूर्ण, MG मोटर्सने आणली स्पोर्ट कार, किंमतही कमी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल