मिळालेल्या माहितीनुसार, बंगळुरूमध्ये रविवारी संध्याकाळी ही घटना घडली. एका इन्फ्लुएन्सरचा ही Lamborghini Aventador कार होती. Lamborghini Aventador ला आग लागली या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ही कार लोकप्रिय सोशल मीडिया इन्फ्लुएंसर संजीवची होती. ज्याला त्याच्या इन्स्टाग्राम हँडल 'निम्मा माने मग संजू' द्वारे ओळखलं जातं. व्हिडिओमध्ये, कारच्या मागील भागात आग दिसत आहे, जिथे इंजिन बसवलं आहे.
advertisement
मात्र, प्रसिद्ध उद्योजक आणि रेमंडचे चेअरमन गौतम सिंघानिया यांनी इंन्साटाग्रामवर एक पोस्ट केली आहे. या व्हिडीओमध्ये Lamborghini Aventador च्या इंजिनमध्ये आग लागली आहे.रस्त्याच्या बाजूला ही कार उभी आहे.
सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झालं नाही. ही कार पूर्णपणे जळून खाक झाली आहे, परंतु संजयने कारला आग लागल्याची पुष्टी केली आहे, परंतु वाहनाचे कोणतेही गंभीर नुकसान झाले नाही.
आग कशी लागली?
आगीचे खरे कारण अद्याप कळू शकले नाही. मात्र, प्रसिद्ध उद्योजक गौतम सिंघानिया यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर व्हिडिओ शेअर केला आहे. “यावेळी बंगळुरूमध्ये ही आता 'दुर्मिळ घटना' राहिलेली नाही. ही एक पद्धत आहे. लॅम्बोर्गिनी शांत का आहे? त्यांच्या गाड्यांना आग का लागत आहे? त्यांच्या गाड्या सुरक्षित आहेत का? भारतात त्यांना परवानगी द्यावी का?” त्यांना आग का लागते? असा सवाल त्यांनी उपस्थितीत केला. बहुतेक आग काही बदलांमुळे लागतात, परंतु काही प्रकरणांमध्ये कार सहन करू शकणारे कमाल तापमान देखील कारण आहे. इंजिन खूप उष्णता निर्माण करते आणि थंड न होता ट्रॅफिकमध्ये बसल्याने देखील अशा आगी लागू शकतात.