Maruti Suzuki Ertigaची किंमत किती आहे?
जीएसटी कपातीनंतर नवीन मारुती एर्टिगाची किंमत आता ₹8.80 लाख (एक्स-शोरूम) पर्यंत घसरली आहे. तर टॉप-ऑफ-द-लाइन मॉडेल ₹12.94 लाख (एक्स-शोरूम) पर्यंत वाढले आहे. तुम्ही दिल्लीमध्ये बेस LXI पेट्रोल मॉडेल खरेदी केले तर तुम्हाला सुमारे ₹10 लाख द्यावे लागतील, ज्यामध्ये ऑन-रोड किंमत, RTO शुल्क आणि विमा यांचा समावेश आहे.
advertisement
तुम्ही या MPV साठी किमान ₹1.5 लाख पर्यंत वित्तपुरवठा करू शकता. उर्वरित ₹8.50 लाख कार कर्ज म्हणून घेतले जातील. तुम्हाला हे कर्ज 5 वर्षांसाठी 9% व्याजदराने मिळाले तर EMI अंदाजे 17 हजार 655 रुपये असेल. तुम्ही 7 वर्षांसाठी कारसाठी फायनेन्स केला तर EMI 13 हजार 683 पर्यंत कमी होईल.
Mahindra करणार लवकरच मोठा धमाका, आणतेय फॅमिलीसाठी खास 7 सीटर SUV
Maruti Ertigaची पॉवरट्रेन
मारुती एर्टिगा 1.5-लिटर स्मार्ट हायब्रिड पेट्रोल इंजिनद्वारे सपोर्टेड आहे जे 101.65 bhp आणि 136.8 Nm टॉर्क निर्माण करते. हे इंजिन पेट्रोल आणि CNG दोन्ही व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. त्याच्या CNG व्हेरिएंटमध्ये, हे इंजिन 88 PS पॉवर आणि 121.5 Nm टॉर्क निर्माण करते.
किती दिवस बसमध्ये धक्के खात ऑफिसला जाणार? दिवाळीत घ्या सगळ्यात स्वस्त Bike, मायलेजही 80 किमी!
पेट्रोल मॉडेलसाठी ट्रान्समिशन ऑप्शनमध्ये 5-स्पीड मॅन्युअल आणि 6-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचा समावेश आहे. सीएनजी व्हेरिएंटमध्ये फक्त 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन आहे. हे पॉवरट्रेन सेटअप शहर आणि महामार्गाच्या परिस्थितीत सुरळीत आणि कार्यक्षम कामगिरी प्रदान करते. मारुती एर्टिगा प्रामुख्याने टोयोटा रुमियन आणि रेनॉल्ट ट्रायबर सारख्या 7-सीटर वाहनांशी स्पर्धा करते.