किती दिवस बसमध्ये धक्के खात ऑफिसला जाणार? दिवाळीत घ्या सगळ्यात स्वस्त Bike, मायलेजही 80 किमी!
- Published by:Sachin S
Last Updated:
तुम्ही जर ऑफिसला जाण्यासाठी एखादी बाईक विकत घेण्याचा प्लॅन करत असाल आताच ती संधी आहे. कारण, १०० सीसी सेगमेंटमध्ये बाईकच्या किंमती चांगल्याच कमी झाल्या आहे.
जीएसटीच्या दरात कपात झाल्यानंतर सगळीकडे स्वस्ताईची लाट आली आहे. वाहन खरेदीसाठी शोरूमला प्रचंड गर्दी आहे. कार आणि दुचाकी, स्कुटर खरेदीसाठी लोकांची झुंबड उडाली आहे. तुम्ही जर ऑफिसला जाण्यासाठी एखादी बाईक विकत घेण्याचा प्लॅन करत असाल आताच ती संधी आहे. कारण, १०० सीसी सेगमेंटमध्ये बाईकच्या किंमती चांगल्याच कमी झाल्या आहे. अवघ्या ५५ हजारांमध्ये तुम्ही ७० किमी मायलेज देणारी बाईक खरेदी करू शकता.
advertisement
advertisement
advertisement
Bajaj Platina 100: भारतातील सर्वात मोठी दुचाकी उत्पादक कंपनी बजाज यामध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. बजाजची Bajaj Platina 100 ही मायलेजच्या बाबतीत किंग आहे. या बाईकचं मायलेज हे तब्बल ७५ ते ८० किमी एका लिटरमध्ये मिळतंय या बाईक किंमत 63,000 पासून सुरू होते. ही बाईक तिच्या उत्कृष्ट मायलेजसाठी खूप प्रसिद्ध आहे. काही रिपोर्ट्सनुसार ती 80 kmpl पर्यंत मायलेज देते. या बाईकमध्ये आरामदायक सीटिंग, DTS-i इंजिन, 'ComforTec' तंत्रज्ञान जे खडबडीत रस्त्यांवरही आरामदायी रायडिंग देतं.
advertisement
advertisement
advertisement