Mahindra करणार लवकरच मोठा धमाका, आणतेय फॅमिलीसाठी खास 7 सीटर SUV

Last Updated:

ही इलेक्ट्रिक SUV येत्या काही महिन्यांत लाँच होणार आहे. ही SUV 2025 च्या अखेरीस लाँच केली जाईल.

News18
News18
भारतात मागील काही दिवसांपासून महिंद्र अँड महिंद्रा मोटर्सने एसयूव्ही आणि इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये एकापेक्षा एक गाड्या लाँच करून धुरळा उडवून दिला. अलीकडे व्हिजन T अंतर्गत भविष्यातील कन्सेप्ट कारची झलकही दाखवली आहे. आता महिंद्रा अँड महिंद्रा नवीन XEV 7e SUV सह त्यांच्या इलेक्ट्रिक SUV श्रेणीचा विस्तार करणार आहे.  ही इलेक्ट्रिक SUV येत्या काही महिन्यांत लाँच होणार आहे. ही SUV 2025 च्या अखेरीस लाँच केली जाईल. महिंद्रा XEV 7e ही मूलतः XEV 9e कूप SUV ची 7-सीटर व्हेरियंट आहे. जे लोक आपल्या फॅमिलीसाठी 7 सीटर EV विकत घेण्याचा प्लॅन करत आहे, ही त्यांच्यासाठी बेस्ट ऑप्शन असणार आहे.
अलीकडे, XEV 7e SUV ची चाचणी महिंद्राकडून सुरू झाली आहे. या कारचे काही फोटो व्हायरल झाले आहे. XEV 7e SUV ही पूर्णपणे झाकलेली होती, पण या XEV 7e SUV मध्ये मल्टी-स्पोक अलॉय व्हील्स, फ्लॅश-टाइप डोअर हँडल, टर्न इंडिकेटरसह इंटिग्रेटेड ORVM, किंचित उंचावलेले व्हील आर्च, पॅनोरॅमिक सनरूफ आणि एक लहान मागील स्पॉयलर असं अनेक डिझाइन पार्ट पाहण्यास मिळाले. एकूण हे  डिझाइन पाहून ही गाडी XEV 9e सारखीच असण्याची शक्यता आहे. पण   XEV 7e ही आधीच्या गाड्यांपेक्षा वेगळी असणार आहे.
advertisement
XEV 7e पॉवरट्रेन
महिंद्रा XEV 7e मध्ये कदाचित XEV 9e मध्ये जो 59kWh आणि 79kWh LFP बॅटरी पॅक आहे, तोच असणार आहे. लहान बॅटरी पॅकमध्ये 286bhp मोटर आहे आणि ती 542km ड्रायव्हिंग रेंज देऊ शकते, तर 231bhp मोटरसह मोठा बॅटरी पॅक 656km रेंज देतो. XEV 7e ची रेंज XEV 9e सारखीच असण्याची शक्यता आहे.
advertisement
XEV 7e मध्ये फिचर्स काय?
XEV 7e चे फक्त फोटो समोर आले आहे, त्यामुळे आतली इंटीरियर कसं असेल हे अद्याप समोर आलं नाही. पण, महिंद्रा XEV 7e मध्ये XEV 9e सारखेच केबिन लेआउट असण्याची शक्यता आहे, ज्यामध्ये तिसऱ्या रांगेत सीट्स जोडल्या जातो. XEV 7e ही नवीन महिंद्रा ईव्ही ट्रिपल स्क्रीन सेटअप, दुसऱ्या रांगेसाठी कॅप्टन खुर्च्या, टू-स्पोक स्टीअरिंग व्हील, ड्युअल झोन क्लायमेट कंट्रोल सिस्टम, ऑटो डिमिंग IRVM, ऑगमेंटेड रिअॅलिटी HUD, फ्रंट व्हेंटिलेटेड सीट्स, ऑटो लेन चार्ज आणि लेन कीप असिस्ट, सीट्सच्या प्रत्येक रांगेसाठी वायरलेस स्मार्टफोन चार्जर, लाईव्ह रेकॉर्डिंगसह 360-डिग्री कॅमेरे, अ‍ॅडॉप्टिव्ह क्रूझ कंट्रोल, लेव्हल-2 ADAS (ऑटोनॉमस ड्रायव्हिंग असिस्टन्स सिस्टम), फ्रंट आणि रियर क्रॉस ट्रॅफिक अलर्ट आणि इतर अनेक उत्तम फिचर्स असण्याची शक्यता आहे.
view comments
मराठी बातम्या/ऑटो/
Mahindra करणार लवकरच मोठा धमाका, आणतेय फॅमिलीसाठी खास 7 सीटर SUV
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement