TRENDING:

Maruti चं अखेर ठरलं! मार्केटमध्ये करणार धमाका, आणतेय नवी Ertiga, फिचर्स लिक

Last Updated:

जर तुम्हाला नवीन फॅमिली कार खरेदी करायची असेल आणि जास्त खर्च करायचा नसेल, तर मारुती एर्टिगा हा एक उत्तम पर्याय आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
भारतातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकीने आजपर्यंत मध्यमवर्गीय फॅमिलीला डोळ्यासमोर ठेवून अनेक अशा कार लाँच केल्यात. पण आता मारुती सुझुकी प्रत्येकाची ऑल टाइम फेव्हरेट असलेल्या मारुती सुझुकी एर्टिगाचं नवीन व्हर्जन घेऊन येणार आहे. सध्या मार्केटमध्ये एर्टिगाने आपली जागा भक्कम अशी केली आहे.  ७ सीटर आणि मायलेजमध्येही उत्तम असलेली एर्टिगाची विक्रीही जोरदार आहे.
News18
News18
advertisement

मारुती एर्टिगा ही  भारतातील सर्वात मोठी आणि सर्वात आरामदायी 7-सीटर MPV पैकी एक आहे. ही MPV सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारच्या यादीत सतत आपले स्थान अव्वल ठेवते. गेल्या महिन्यात, या कारने एकूण 16,140 युनिट्सच्या विक्रीसह यादीत दुसरे स्थान मिळवले. मारुती एर्टिगा ही 7-सीटर इतकी लोकप्रिय का आहे?

advertisement

उत्तम फॅमिली कार

जर तुम्हाला नवीन फॅमिली कार खरेदी करायची असेल आणि जास्त खर्च करायचा नसेल, तर मारुती एर्टिगा हा एक उत्तम पर्याय आहे. परवडणाऱ्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, मारुती एर्टिगा मॉडेल सध्या १०.५४ लाख ते १५.७४ लाख रुपयांच्या दरम्यान आहे (ऑन-रोड, मुंबई). फिचर्सबद्दल बोलायचं झालं तर, या कारमध्ये ९-इंचाची इन्फोटेनमेंट टचस्क्रीन, रिअर एसी व्हेंट्स, ऑटोमॅटिक एसी, रंगीत TFT असलेलं इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, पॅडल शिफ्टर्स, क्रूझ कंट्रोल, ६-एअरबॅग्ज आणि बरेच काही फिचर्स दिले आहे. पॉवरट्रेनबद्दल बोलायचं झालं तर, यात १.५-लिटर पेट्रोल आणि सीएनजी इंजिन आहे, जे ५-स्पीड मॅन्युअल किंवा ६-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स पर्यायासह येतं.

advertisement

अपडेटेड एर्टिगा कशी असेल?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
महिलांनो व्यवसाय सुरू करायचाय? पुण्यात इथं मिळतंय मोफत मार्गदर्शन, Video
सर्व पहा

दरम्यान, मारुती आपली ही ७-सीटर एर्टिगा अपडेट करण्याचा प्लॅन करत आहे. कारण, सध्याचं मॉडेल हे जुनं दिसू लागलं आहे. इतर ७ सीटर गाड्यांनी मार्केटमध्ये आपलं वर्चस्व दाखवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे मारुतीने अपडेट करण्याचा निर्णय घेतला आहे.  नवीन अपडेटेड एर्टिगाामध्ये काही कॉस्मेटिक बदल आणि इलेक्ट्रिक सनरूफ, व्हेंटिलेटेड सीट्स, वायरलेस चार्जर, ९-इंच टचस्क्रीन आणि अधिक आरामदायी फिचर्सचा समावेश असू शकतो. पण, मारुती हे अपडेटेड मॉडेल कधी लाँच करणार याबद्दल अद्याप काही माहिती दिली नाही.

advertisement

मराठी बातम्या/ऑटो/
Maruti चं अखेर ठरलं! मार्केटमध्ये करणार धमाका, आणतेय नवी Ertiga, फिचर्स लिक
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल