मर्सिडीज-बेंझ रिसर्च अँड डेव्हलपमेंट इंडिया
भारतासाठी विशेषतः डिझाइन केलेली AMG G 63 कलेक्टर एडिशन मर्सिडीज-बेंझ रिसर्च अँड डेव्हलपमेंट इंडिया (MBRDI) च्या सहकार्याने तयार करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, AMG G 63 एडिशनमध्ये ग्राहकाच्या नावासह वैयक्तिकृत 'ऑर्डर टू मेड' ग्रॅब हँडल आहे.
‘कलेक्टर एडिशन’ ब्रँडिंग या स्पेशल एडिशन एसयूव्हीमध्ये स्पेअर व्हील कव्हर आहे ज्यामध्ये “वन ऑफ थर्टी” असलेले एडिशन-स्पेसिफिक लोगो प्लेट इन्सर्ट आहे, २२-इंच टेक गोल्ड क्रॉस-फोर्ज्ड व्हील्स आणि एम्बेडेड इन्सिग्निया आणि ‘कलेक्टर एडिशन’ ब्रँडिंगसह एक विशिष्ट बाह्य संरक्षक पट्टी आहे. ही स्पेशल एडिशन दोन खास रंग पर्यायांमध्ये येते - MANUFAKTUR मिड ग्रीन मॅग्नो आणि MANUFAKTUR रेड मॅग्नो.
advertisement
इंजिन आणि पॉवर
मर्सिडीज-बेंझ AMG G 63 कलेक्टर एडिशनमध्ये कॅटालाना बेज/ब्लॅकमध्ये MANUFAKTUR टू-टोन नप्पा लेदर आहे, जो ओपन-पोअर वॉलनट वुड ट्रिमने पूर्ण झाला आहे. खास फिचर्समध्ये मर्सिडीज-बेंझ AMG G 63 कलेक्टर एडिशनमध्ये ४.०L, ट्विन-टर्बो V8 इंजिनसह ४८V माइल्ड-हायब्रिड दिलं आहे. हे कॉन्फिगरेशन ५८५bhp आणि ८५०Nm ची कमाल पॉवर देते, जे पॅडल शिफ्टर्ससह ९-स्पीड DCT ऑटोमॅटिक गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. ४मॅटिक सिस्टमद्वारे सर्व फोर व्हील ड्राईव्ह दिले आहे. AMG G 63 फक्त ४.४ सेकंदात ० ते 100kmph किमी प्रतितास वेग वाढवू शकते.