TRENDING:

सावधान! आता 1 वर्षात 5 वेळा नियम तोडल्यास होईल वाईट परिणाम, गाडी चालवता येणार नाही 

Last Updated:

New Traffic Rule : नवीन मोटर वाहन नियमांनुसार, आता आरटीओ आणि जिल्हा परिवहन कार्यालयाला ही शक्ती दिली आहे की, ते वारंवार नियम तोडणाऱ्या चालकांच्या लायसेन्सवर निलंबनाची कारवाई सुरु करु शकतील. खरंतर असं केल्याने पाहिले लायसेन्स धारकाना आपली बाजू मांडण्याचा पूर्ण संधी दिली जाईल.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली : रस्ता सुरक्षा मजबूत करण्यासाठी आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी, रस्ते वाहतूक मंत्रालयाने एक मोठा निर्णय घेतलाय. आता, एखादा वाहनचालकाने वर्षभरात पाच किंवा त्याहून अधिक वेळा वाहतूक नियमांचे उल्लंघन केले तर त्याला तीन महिन्यांसाठी गाडी चालवण्यास बंदी घालता येईल. 1 जानेवारीपासून लागू झालेले हे नियम भारतीय रस्त्यांवर शिस्त आणण्याच्या दिशेने एक मजबूत पाऊल मानले जात आहे. सरकारचा स्पष्ट संदेश असा आहे की, नियम मोडल्याबद्दल दंड भरून वाहनचालक आता सुटू शकत नाहीत; त्याऐवजी, त्यांनी त्यांचा परवाना वाचवण्यासाठी प्रत्येक लहान किंवा मोठा नियम काटेकोरपणे पाळला पाहिजे.
न्यू ट्रॅफिक रुल्स
न्यू ट्रॅफिक रुल्स
advertisement

टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, नवीन मोटर वाहन नियमांनुसार, आता आरटीओ आणि जिल्हा परिवहन कार्यालयांना ही शक्ती दिली आहे की, ते वारंवार नियम तोडणाऱ्या चालकांच्या लायसेन्सवर निलंबनाची कारवाई सुरु करु शकतील.

खरंतर असं करण्यापूर्वी लायसेन्स धारकाला आपली बाजू मांडण्याची पूर्ण संधी दिली जाईल. अधिसूचनेमध्ये सांगितले आहे की, उल्लंघनाची गणना एक वर्षाच्या कालावधीच्या आत केली जाईल. चांगली बातमी अशी आहे की मागील वर्षातील उल्लंघने पुढील वर्षाच्या गणनेत जोडली जाणार नाहीत, म्हणजेच, उल्लंघनाची नोंद दरवर्षी आपोआप शून्य (Reset) मानली जाईल.

advertisement

Electric Car चालवत असाल तर या 5 गोष्टींकडे ठेवा लक्ष! झटपट वाढेल मायलेज

हेल्मेट आणि सीटबेल्ट न घालणे पडेल महागात

आतापर्यंत, ड्रायव्हिंग लायसन्स निलंबित करण्याची प्रोसेस प्रामुख्याने 24 गंभीर गुन्ह्यांपर्यंत मर्यादित होती, ज्यात वाहन चोरी, अपहरण, प्रवाशांवर हल्ला, ओव्हरलोडिंग आणि अतिवेग यांचा समावेश होता. तसंच, नवीन तरतुदीने त्याची व्याप्ती लक्षणीयरीत्या वाढवली आहे.

advertisement

एखाद्या चालकाने रेड लाइट जंप केली, हेल्मेट घालत नाही किंवा वर्षातून पाच वेळा सीट बेल्ट लावत नाही, तर त्याला "सवयीचे गुन्हेगार" म्हणून वर्गीकृत केले जाऊ शकते आणि त्याचा परवाना रद्द केला जाऊ शकतो. सरकारचा असा विश्वास आहे की या किरकोळ चुकांमुळे अनेकदा मोठे रस्ते अपघात होतात आणि सार्वजनिक धोका निर्माण होतो.

advertisement

डेली अप-डाउसाठी हे 5 स्वस्त Electric Scooter बेस्ट! किंमत फक्त ₹89,999पासून सुरु

निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह 

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
डाळींबाच्या दरात मोठी उलथापालथ, शेवगा आणि कांद्याला काय मिळाला भाव? इथं चेक करा
सर्व पहा

या नवीन कायद्यावर विशेषज्ञांमध्ये वाद सुरु झाला आहे. काही जानकार मानतात की, हा नियम रस्त्यांवर नियम आणण्यासाठी खुप गरजेचा आहे. दिल्लीचे माजी उप परिहवन आयुक्त अनिल छिकारा यांच्यानुसार पाच उल्लंघनांची मर्यादा नाही. पण आव्हान हे लागू करण्यात आहे. नेहमीच खतरनाक ड्रायव्हिंग करणारे सीसीटीव्ही आणि संशोधनाला खुप कठोर आणि वैचारिकरित्या त्रुटिपूर्ण सांगितले आहे. त्यांचा असा युक्तिवाद आहे की, मजबूत तांत्रिक पायाभूत सुविधांशिवाय, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे रेकॉर्ड केलेल्या चलनांना न्यायालयात आव्हान देणे सोपे जाईल.

advertisement

मराठी बातम्या/ऑटो/
सावधान! आता 1 वर्षात 5 वेळा नियम तोडल्यास होईल वाईट परिणाम, गाडी चालवता येणार नाही 
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल