एमजी कंपनीच्या कॉमेट या इलेक्ट्रिक कारची लोकप्रियता वाढली आहे. या कारची रेंज 230 किलोमीटर्स असून, तिची बॅटरीशिवायची किंमत फक्त 4.99 लाख रुपये आहे. या कारने स्वतःची अशी ओळख निर्माण केली आहे. अलीकडेच एमजी मोटर इंडिया या कंपनीने बॅटरी सबस्क्रिप्शन प्रोग्राम सुरू केला आहे. त्याअंतर्गत कॉमेट ईव्ही फक्त 4.99 लाख रुपयांच्या प्रारंभिक किमतीत घरी घेऊन जाता येईल. प्रति किलोमीटर बॅटरी रेंटल वेगळं द्यावं लागेल. म्हणजेच गाडी जितके किलोमीटर्स चालवली जाईल, तेवढंच शुल्क द्यावं लागेल. ज्या व्यक्ती कारने दररोज 50 ते 100 किलोमीटर्सचा प्रवास करतात, त्यांच्यासाठी कॉमेट ही एक चांगली इलेक्ट्रिक कार आहे. ज्यांच्याकडे मोठ्या बजेटची समस्या आहे; मात्र कार ही गरज आहे आणि दैनंदिन खर्चाची फारशी चिंता नाही, अशा व्यक्तींसाठी हा प्रोग्राम चांगला आहे.
advertisement
कॉमेट ईव्हीमध्ये 17.3 kWhची लिथियम आयन बॅटरी आहे. ती एकदा चार्ज केल्यानंतर गाडी 230 किलोमीटर्स अंतर जाऊ शकते. ही कार फुल चार्ज करण्यासाठी तब्बल सात तास लागतात. ही बाब मात्र निराशाजनक आहे. या कारमध्ये 10.25 इंच आकाराचा टचस्क्रीन देण्यात आला आहे. या कारची किंमत कमी आहे, आकारही लहान आहे; मात्र गाडीत चांगली जागा असून, पाच व्यक्ती यात सहज बसू शकतात.
आता पीएमव्ही EaS-E कारबद्दल जाणून घेऊ या.
भारतातल्या सर्वांत स्वस्त कार्सची यादी करायची झाली, तर त्यात पहिलं नाव पीएमव्ही EaS-E हेच येईल. मुंबईमधल्या पर्सनल मोबिलिटी व्हेईकल या स्टार्टअपने ही कार तयार केली आहे. ही मायक्रो इलेक्ट्रिक कार आहे. त्यात फक्त दोन व्यक्ती बसू शकतात. या कारची लांबी फक्त 2915 मिमी आहे. कंपनीचा असा दावा आहे, की सिंगल चार्जमध्ये ही कार 160 किलोमीटर्स अंतर जाईल. ही कार 15 अॅम्पिअरच्या सॉकेटद्वारेही चार्ज करणं शक्य आहे. चार तासांमध्ये ही कार पूर्ण चार्ज होऊ शकते.
ही एक कॉम्पॅक्ट कार असून, ती शहरातल्या ड्रायव्हिंगसाठी डिझाइन करण्यात आली आहे. ट्रॅफिकमध्येही ती सहज चालवणं शक्य आहे. रिमोट पार्किंग असिस्ट, एसी, पॉवर विंडो, टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टीम, स्विच कंट्रोल स्टीअरिंग, क्रूझ कंट्रोल, डिस्क ब्रेक, अॅलॉय व्हील्स आणि रिजनरेटिव्ह ब्रेकिंग सिस्टीम आदी फीचर्स त्यात आहेत.
अवघ्या 2000 रुपयांमध्ये ही कार बुक करणं शक्य आहे. पुढच्या वर्षी ही कार विक्रीसाठी उपलब्ध होईल. जानेवारी 2025मध्ये होणाऱ्या भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो 2025मध्ये ही कार दाखवली जाणार असून, त्यातली काही फीचर्स अपडेट केली जातील, अशी आशा आहे.