येणाऱ्या दिवसात तुम्हाला एक स्वस्त 7-सीटर खरेदी करायची असेल आणि Renault Triber व Nissan Gravite मधून एक निवडायची आहे पण समजत नसेल. तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. आज आपण रेनॉल्ट ट्रायबर आणि रिब्रँडेड ग्रॅव्हाइट म्हणून विकल्या जाणाऱ्या एमपीव्हीमधील डिझाइन, इंटीरियर, फीचर्स, सेफ्टी, इंजिन आणि कामगिरीच्या बाबतीत फरक समजून घेऊ.
advertisement
किंमतीत किती फरक?
निसान ग्रेवाइटची एक्स-शोरुम किंमत 5.65 लाखांपासून सुरु होऊन 8.93 लाख (टेकना लॉन्च एडिशन एएमटी) पर्यंत जाते. मुख्य व्हेरिएंटमध्ये विसिया (₹5.65 लाख), असेन्टा (₹6.59 लाख), एन-कनेक्टा (₹7.20 लाख एमटी/₹7.80 लाख एएमटी) आणि टेकना (₹7.91 लाख एमटी/₹8.49 लाख एएमटी) चा समावेश आहे.
किती दिवस बसचे धक्के खाणार? 39 हजारांमध्ये घरी आणा Bike, भारतातल्या टॉप स्वस्त 5 बाईक्स
रेनो ट्रायबरची किंमत 5.76 लाख ते 8.60 लाख रुपये (इमोशन) पर्यंत आहे. ट्रायबरमध्ये एएमटी पर्याय मुख्यतः टॉप व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. ग्रेव्हाइट बेस व्हेरिएंटमध्ये 11,000 रुपये स्वस्त आहे. मात्र टॉप अँड मध्ये 33,000 रुपये महाग आहे. उत्तर प्रदेशसारख्या राज्यांमध्ये ऑन-रोड किंमत ग्रेव्हाइटसाठी 6.5 लाख ते 10.5 लाख आणि ट्रायबरसाठी 6.6 लाख ते 9.8 लाखांच्या आसपास राहण्याची अपेक्षा आहे. ग्रेव्हाइटवर पहिल्या 1,001 यूनिट्ससाठी विशेष इंट्रोडक्टरी प्रायसिंग आहे आणि दीर्घ वॉरंटीचा ऑफरही उपलब्ध आहे.
डिझाइन तुलना
दोन्ही कारची लांबी अंदाजे 3990 मिमी, रुंदी 1735 मिमी, उंची 1644 मिमी, व्हीलबेस 2636 मिमी आहे आणि त्यांचा ग्राउंड क्लीयरन्स 182 मिमी आहे. तिसरी रांग काढून टाकल्याने बूट स्पेस 625 लिटरपर्यंत वाढते. ग्रॅव्हाइटचा पुढचा भाग अधिक ठळक आणि अधिक एसयूव्हीसारखा आहे, ज्यामध्ये मोठा हनीकॉम्ब-पॅटर्न ग्रिल, स्मोक्ड एलईडी हेडलॅम्प, सी-आकाराचा लाल अॅक्सेंट बंपर आणि क्रिस्टल-एज एलईडी टेललाइट्स आहेत.
Tata आता करणार मोठा धमाका, आता पेट्रोल भरण्याचं टेन्शन दूर; आणतेय नवी EV SUV; रेंज...
साइड प्रोफाइलमध्ये फंक्शनल रुफ रेल्स (50 किलो लोड क्षमता) आणि 15 इंच ड्यूअल-टोन अलॉय व्हील्स आहेत. उपलब्ध कलर्समध्ये फॉरेस्ट ग्रीन, ओनिक्स ब्लॅक आणि ब्लेड सिल्व्हर आहेत. ट्रायबरचा डिझाइन स्लीकर आणि फॅमिली ओरिएंटेड आहे. ज्यामध्ये रेनोचा डायमंड ग्रिल, एलईडी डीआरएल आणि ड्यूअल-टोन बॉडी कलर्सचा समावेशआहे. ग्रेव्हाइट थोडी जास्त प्रीमियम आणि आकर्षक दिसते. तर ट्रायबर सिंपल आणि व्यावहारिक दिसते.
इंटीरियरची तुलना
दोन्हीमध्ये 5+2 मॉड्यूलर सीटिंग आहेत, दुसरी रांग स्लाइड, रिक्लाइन आणि फोल्ड-अँड-टम्बल आहे. तिसरी रांग काढता येण्याजोगी आहे (50:50 स्प्लिट). 100 हून अधिक सीटिंग कॉन्फिगरेशन उपलब्ध आहेत. ग्रॅव्हाइटमध्ये ड्युअल-टोन सुएड आणि लेदरेट अपहोल्स्ट्री, अँबियंट लाइटिंग, नेक कुशन आणि प्रीमियम फिनिश आहेत.
डॅशबोर्ड लेआउट प्री-फेसलिफ्ट ट्रायबरने इंस्पायर्ड आहे. मात्र चांगल्या स्टिचिंग आणि मटेरियल क्वालिटीसह ते खुप चांगले झाले आहे. ट्रायबरमध्ये ब्लॅक-ग्रे वीवेन फॅब्रिक, कूल्ड ग्लोवबॉक्स आणि प्रॅक्टिकल स्टोरेज स्पेस (31 लिटरपर्यंत) आहे. दोन्हीमध्ये इंडिपेंडेंट रियर एसी (सेकंडआणि थर्ड रो वेंट्स) मि व्हेरिएंटमध्ये स्टँडर्ड आहेत.
फीचर्सची तुलना
कॉमन फीचर्समध्ये 8 इंच फ्लोटिंग टचस्क्रिन (वायरलेस एँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कारप्ले), 7 इंच टीएफटी डिजिटल क्लस्टर (टॉप व्हेरिएंट) स्टीअरिंग-माउंटेड कंट्रोल्स, पुश-बटण स्टार्ट, क्रूझ कंट्रोल, ऑटो हेडलॅम्प, रिअर कॅमेरा, फ्रंट पार्किंग सेन्सर्स आणि रिअर डिफॉगर या फीचर्सचा समावेश आहे. ग्रॅव्हाइटमध्ये जेबीएल प्रीमियम ऑडिओ, ड्युअल-चॅनेल डॅशकॅम, केबिन एअर प्युरिफायर आणि अॅम्बियंट लाइटिंग देखील आहे. ट्रायबरमध्ये देखील चांगली वैशिष्ट्ये आहेत, परंतु ग्रॅव्हाइट टॉप व्हेरिएंटमध्ये अधिक लक्झरी अॅड-ऑन्स देते.
सेफ्टीची तुलना
दोन्हीमध्ये 6 एयरबॅग्स (फ्रंट, साइड आणि कर्टन) , एबीएस विद ईबीडी, ईएसपी, ट्रॅक्शन कंट्रोल, हिल स्टार्ट असिस्ट, टीपीएमएस, आयएसओफिक्स आणि स्पीड अलर्ट स्टँडर्ड आहे. 30 हून जास्त अॅक्टिव्ह आणि पॅसिव्ह सेफ्टी फीचर्स उपलब्ध आहेत. ट्रायबरचा जुना ग्लोब एनसीएपी रेटिंग 4-स्टार होता. तर नवीन टेस्ट रिझल्ट वेगळा असू शकतो. ग्रेवाइटचा टेस्ट सध्या पेंडिंग आहे. मात्र समान फ्लॅटफॉर्ममुळे सेफ्टी लेव्हल जवळपास बरोबरीची आहे.
इंजिन आणि मायलेज
दोन्ही एकाच 999 सीसी, 3-सिलेंडर, नैसर्गिकरित्या एस्पिरेटेड पेट्रोल इंजिनद्वारे समर्थित आहेत, जे 72 पीएस पॉवर आणि 96 एनएम टॉर्क निर्माण करतात. ट्रान्समिशन पर्यायांमध्ये 5-स्पीड मॅन्युअल किंवा एएमटी (ग्रॅव्हाइटवर इझी-शिफ्ट) समाविष्ट आहे. एमटी व्हेरिएंटमध्ये सीएनजी रेट्रोफिट देखील उपलब्ध आहे. एआरएआयच्या मते, ग्रॅव्हाइटची इंधन बचत सुमारे 19.3-19.6 किमी/ली आहे, तर ट्रायबरची इंधन बचत सुमारे 18-20 किमी/ली आहे.
फायनल वर्डिक्ट : निसान ग्रेवाइट आणि रेनो ट्रायबर दोन्ही बजेट 7-सीटर सेगमेंटमध्ये एकमेकींना टक्कर देतात. खरंतर मार्केट आणि रीसेल व्हॅल्यू Renault Triber ची चांगली आहे. रेनॉल्टने बाजारात बराच काळ स्वतःचे स्थान निर्माण केले असल्याने, विक्री आणि सेवेच्या बाबतीतही तिला उच्च स्थान मिळाले पाहिजे.
