Tata Sierra लाँच झाल्यापासून दररोज नव नवीन माहिती समोर येत आहे. टाटा मोटर्सने Tata Sierra ची स्पीड टेस्ट केली. टाटाने Tata Sierra साठी ३ वेगवेगळ्या प्रकारचे इंजिन आणले आहे. यामध्ये एक 1.5-लीटर हायपरियन T-GDi टर्बो-पेट्रोल इंजिन दिलं आहे जे ऑटोमॅटिक टॉर्क कनव्हर्टरसह येतोय. तर दुसरं इंजिन हे 1.5-लिटर रेवोट्रॉन नॅचुरली एस्पिरेटेड पेट्रोल मोटर इंजिन आहे जे म्यॅनुअल आणि DCA (डुअल क्लच ऑटोमॅटिक) दोन पर्याय दिले आहे. या शिवाय 1.5-लिटर क्रायोजेट डिझेल इंजिन दिलं आहे.
advertisement
1.5-लीटर हायपरियन T-GDi टर्बो-पेट्रोल इंजिनवर Tata Sierra ची स्पीड टेस्ट घेण्यात आली. Tata Sierra च्या स्पीड मिटरमध्ये २४० पर्यंत मर्यादा दिली आहे. पण, Tata Sierra ने तब्बल 222 किमी हा स्पीड गाठून दाखवला. टाटा नेहमी आपल्या गाड्यांमध्ये वेगवेगळे प्रयोग करत असतो. पण हा प्रयोग अभूतपूर्व असाच होता.
21 हजार रुपयांमध्ये प्री बुकिंग
Tata Sierra अलीकडेच किंमत जाहीर केली आहे. सुरवातीचं स्मार्ट + स्टार्ट मॉडेल हे अवघ्या 11.49 लाख रुपये एक्स शोरूम मुंबई या किंमतीत उपलब्ध आहे. हीच मुळ किंमत असणार आहे. यात स्मार्ट + स्टार्ट व्हेरियंटमध्ये फ्लश डोअर, पुश स्टार्ट बटन आणि मागे लाँच डिएरल दिले आहे. दुसरं व्हेरिएंट हे pure starts असणार आहे, ज्याची किंमत १२.९९ लाख इतकी आहे.
यामध्ये सियाराला सनरूफ सुद्धा दिलं आहे. Tata Sierra चं टॉप मॉडेस हे १५.९९ लाखांपासून सुरू होईल तर १८.४९ लाखांपर्यंत आहे. Tata Sierra 2025 चं प्री बुकिंग सुरू झालं आहे, २१ हजारांमध्ये तुम्ही ही गाडी बूक करू शकतात. टाटाच्या अधिकृत डिलरशीप आणि ऑनलाईन सुरू होणार आहे. तर tata sierra ची डिलिव्हरी ही जानेवारी २०२६ पासून सुरू होणार आहे.
