विजय फळणीकर यांनी सांगितलं की, त्यांचा मुलगा वैभव फळणीकर याचं कर्करोगाने (कॅन्सर) या आजाराने निधन झालं. या दुःखातून सावण्यासाठी त्यांनी ‘आपलं घर’ ही संस्था सुरू केली. या संस्थेच्या माध्यमातून अनाथ मुलांचा सांभाळ केला जातो. तसेच या मुलांना आजी-आजोबांचं प्रेम मिळावं म्हणून वृद्धाश्रमही सुरू करण्यात आलं. याच अंतर्गत कौशल्या कराड धर्मादाय रुग्णालयासारख्या मल्टी स्पेशालिटी रुग्णालयातून आणि मोबाईल क्लिनिकच्या माध्यमातून गरजूंपर्यंत आरोग्य सेवा पुरवली जाते.
advertisement
AI च्या बेसवर बनवलं जगातलं सर्वात लहान हवामान केंद्र,16 वर्षाच्या हितेनची कमाल, कसं करतो काम? Video
मल्टी-स्पेशालिटी सुविधा पण माफक दरात
या हॉस्पिटलमध्ये अनेक आजारांवर उपचाराची सुविधा आहे. एंडोस्कोपी, सोनोग्राफी, कलर डॉपलर, डिजिटल एक्स-रे यांसह कॅन्सरसारख्या गंभीर आजारांवरील उपचारही येथे केले जातात. अनेक सेवा माफक दरात किंवा विनामूल्य उपलब्ध करून दिल्या जातात. पेशंटच्या नातेवाईकांसाठी फक्त 10 रुपयांत जेवणाची सोयही आहे. विशेष म्हणजे, शासनाची कोणतीही मदत न घेता हे हॉस्पिटल पूर्णपणे सेवाभावाने सुरू आहे. हे रुग्णालय पुण्यातील सिंहगडाच्या पायथ्याशी डोणजे येथे आहे.
फिरते दवाखाने 16 गावं अनिमिया-मुक्त
खेडोपाड्यातील ज्यांना हॉस्पिटलपर्यंत येणे शक्य नाही, त्यांच्यासाठी दोन फिरते दवाखाने 16 गावांमध्ये फिरतात. तेथे मोफत तपासणी, मोफत औषधोपचार दिले जातात. पुढील उपचारांची गरज असल्यास त्या रुग्णाला हॉस्पिटलमध्ये आणले जाते. अनिमिया निर्मूलनासाठी विशेष मोहीम राबवून संपूर्ण 16 गावं अनिमिया-मुक्त करण्यात आली आहेत. सेवाभावाने चालणाऱ्या या रुग्णालयाला नेपाळ, अमेरिका आणि भारतातील अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.





