advertisement

डोळ्यांना सहन होत नाहीये... राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार पुन्हा इमोशनल, बारामतीत काय घडलं?

Last Updated:

शपथविधीसंदर्भात आम्हाला काहीही माहीत नाही, असे शरद पवार यांनी जाहीरपणे सांगून सुनेत्रा पवार यांच्याशी आपल्याशी कोणताही संवाद झालेला नसल्याचे सूचित केले.

रोहित पवार-अजित पवार
रोहित पवार-अजित पवार
मुंबई : अजित पवार यांच्या माघारी पक्षाचे नेतृत्व कोण करणार, याचे उत्तर त्यांच्या निधनानंतर अवघ्या ७२ तासांत महाराष्ट्राला मिळाले आहे. राष्ट्रवादीच्या सर्वच ज्येष्ठ नेत्यांनी वायू वेगाने सुनेत्रा पवार यांची गटनेतेपदी निवड करून वहिनींशिवाय दुसरे कुणीही नेतृत्व करणार नाही, याची यथोचित काळजी घेतली. दुसरीकडे मुंबईत या सगळ्या घडामोडी घडत असताना ज्येष्ठ नेते शरद पवार आणि त्यांच्या पक्षातल्या सुप्रिया सुळे, रोहित पवार, युगेंद्र पवार यांना अंधारात ठेवल्याचे सांगितले जाते. महत्वाचे म्हणजे आजच्या शपथविधीसंदर्भात आम्हाला काहीही माहीत नाही, असे शरद पवार यांनी जाहीरपणे सांगून सुनेत्रा पवार यांच्याशी आपल्याशी कोणताही संवाद झालेला नसल्याचे सूचित केले. या सगळ्या घडामोडींचे पडसाद बारामतीत देखील उमटत आहेत.
अजित पवार यांच्यावर प्रेम करणारी जनता, कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी अजित पवार यांना श्रद्धांजली देणारे मोठ मोठे फ्लेक्स बारामतीत लावले आहेत. अजित पवार यांचे राजबिंडे रूप असलेले फोटो लावून, त्यांची कार्यशैली त्यावर नमूद करून त्यांना आदरांजली वाहिली जात आहे. मात्र अजित पवार यांच्या नावासमोरील दिवंगत, स्वर्गीय अशी विशेषणे रोहित पवार यांना सैरभैर करून गेली आहेत.
advertisement

रोहित पवार भावनिक का झाले?

डोंगराएवढ्या दुःखापुढे आज पहिल्यांदाच ना पदाचे कौतुक आहे... ना आनंदाचा जल्लोष…! गळ्यात हार घातलेला मा. अजितदादांचा फोटो पाहणं डोळ्यांना सहन होत नाहीय. आज बारामतीत अभिनंदनाच्या जागी श्रद्धांजलीचे बॅनर आहेत, पण हे लावणाऱ्या आणि मा. अजितदादांवर अतीव प्रेम करणाऱ्या सर्वांना माझी हात जोडून विनंती आहे की, मा. अजितदादा हे आपल्यातच होते, आपल्यातच आहेत आणि त्यांच्या कामातून ते कायम आपल्यातच राहणार..! त्यामुळे मा. अजितदादांच्या नावापुढं स्वर्गीय शब्द लावण्याचे जसे धाडस माझ्यात नाही तसे आपणही करू नये, असे रोहित पवार यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.
advertisement

सुनेत्रा पवार यांची एकमताने गटनेतेपदी निवड

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर त्यांच्या जागा कोण घेणार, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अत्यंत वेगाने घडामोडी घडत आहेत. पक्षातील नेते आणि पदाधिकाऱ्यांच्या मागणीनुसार सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारण्यास होकार दिल्यानंतर आज संध्याकाळी पाच वाजता राजभवनात त्यांचा शपथविधी होईल. तत्पूर्वी विधान भवनात राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत त्यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली. ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांनी त्यांच्या गटनेतेपदाचा प्रस्ताव मांडला तर ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी या प्रस्तावाला अनुमोदन दिले.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
डोळ्यांना सहन होत नाहीये... राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार पुन्हा इमोशनल, बारामतीत काय घडलं?
Next Article
advertisement
अजितदादांचा विमान अपघात: हा निव्वळ दुर्दैव की व्यवस्थेने केलेला घात; बारामतीच्या रनवेवर त्या दिवशी नेमकं काय घडलं?
अजितदादांचा विमान अपघात: हा निव्वळ दुर्दैव की व्यवस्थेने केलेला घात
  • बारामती अपघात हा शेवटचा इशारा

  • विमान वाहतूक सुरक्षेचे 'ऑडिट' आता तरी होणार का?

  • अजित पवारांचा अंत आणि उडालेली सुरक्षा यंत्रणा

View All
advertisement