कपाशीच्या दरात घसरण
कृषी मार्केट वेबसाईटवरील सायंकाळी 6.30 वाजताच्या रिपोर्टनुसार, राज्यातील कृषी बाजार समित्यांमध्ये आज कपाशीची एकूण 16 हजार 774 क्विंटल आवक नोंदवण्यात आली. यामध्ये वर्धा बाजारात 6 हजार 500 क्विंटल कपाशीची सर्वाधिक आवक झाली. वर्धा बाजारात कपाशीला किमान 7 हजार 500 ते कमाल 8 हजार 145 रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळाला. दरम्यान, बुलढाणा बाजारात कपाशीला 8 हजार 200 रुपये प्रतिक्विंटल असा आजचा सर्वाधिक बाजारभाव मिळाल्याची नोंद आहे. मात्र, शुक्रवारीच्या तुलनेत आज कपाशीच्या दरात घट झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
advertisement
महाराष्ट्रासाठी पुढील 24 तास धोक्याचे, डबल संकट येतंय, हवामान विभागाचा अलर्ट
कांद्याच्या दरात वाढ
आज कांद्याची राज्यभरात 3 लाख 36 हजार 686 क्विंटल इतकी मोठी आवक झाली. यामध्ये अहिल्यानगर बाजारात 1 लाख 24 हजार 919 क्विंटल लाल कांद्याची सर्वाधिक आवक नोंदवण्यात आली. या बाजारात कांद्याला किमान 260 ते कमाल 1 हजार 345 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. तर अमरावती बाजारात कांद्याला 2 हजार 600 रुपये प्रतिक्विंटल असा आजचा सर्वाधिक दर मिळाल्याचे समोर आले. मात्र, शुक्रवारी नोंदवलेल्या उच्चांकी दरांच्या तुलनेत आज कांद्याच्या दरात मर्यादित वाढ झाल्याचे चित्र आहे.
सोयाबीनच्या दरात घसरण
राज्यातील बाजारांत सोयाबीनची एकूण 31 हजार 297 क्विंटल आवक झाली. अकोला बाजारात 5 हजार 541 क्विंटल सोयाबीनची आवक नोंदवली गेली असून, येथे सोयाबीनला किमान 5 हजार 333 ते कमाल 5 हजार 660 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. विशेष म्हणजे, नागपूर बाजारात लोकल सोयाबीनला 5 हजार 912 रुपये प्रतिक्विंटल असा आजचा सर्वाधिक बाजारभाव मिळाला. मात्र, शुक्रवारीच्या तुलनेत आज सोयाबीनच्या दरात घट झाल्याचे दिसून आले आहे.
तुरीच्या दरातही आज नरमाई
राज्यात तुरीची एकूण 39 हजार 606 क्विंटल आवक नोंदवण्यात आली. यामध्ये जालना बाजारात 8 हजार 582 क्विंटल पांढऱ्या तुरीची सर्वाधिक आवक झाली. या बाजारात तुरीला किमान 6 हजार 650 ते कमाल 7 हजार 745 रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळाला. दरम्यान, चंद्रपूर बाजारात तुरीला 9 हजार 030 रुपये प्रतिक्विंटल असा सर्वाधिक बाजारभाव मिळाल्याची माहिती आहे. मात्र, शुक्रवारीच्या तुलनेत आज तुरीच्या दरातही घट झाल्याचे स्पष्ट झाले आहे.





