आल्याच्या आवकेत घट
राज्याच्या मार्केटमध्ये आज एकूण 804 क्विंटल आल्याची आवक झाली. यापैकी नागपूर मार्केटमध्ये सर्वाधिक 363 क्विंटल आल्याची आवक झाली. त्यास प्रतीनुसार 4857 ते 7190 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे सर्वाधिक बाजारभाव मिळाला. तसेच सातारा मार्केटमध्ये आवक झालेल्या 7 क्विंटल आल्यास 1350 रुपये सर्वात कमी बाजारभाव मिळाला.
कापसाच्या दरात मोठी उलथापालथ, सोयाबीन आणि तुरीला काय मिळाला भाव? Video
advertisement
हळदीला उच्चांकी भाव
राज्याच्या मार्केटमध्ये केवळ 9 क्विंटल राजापूरी हळदीची आवक नांदेड मार्केटमध्ये झाली. त्यास प्रतीनुसार 9000 ते 13711 रुपये दरम्यान बाजारभाव मिळाला.
डाळिंबाच्या दरात चढ-उतार
आज राज्याच्या मार्केटमध्ये 280 क्विंटल डाळिंबाची एकूण आवक झाली. यापैकी सोलापूर मार्केटमध्ये 78 क्विंटल सर्वाधिक आवक राहिली. त्यास प्रतीनुसार 5000 ते 15400 रुपये दरम्यान दर मिळाला. तसेच नाशिक मार्केटमध्ये आवक झालेल्या 16 क्विंटल डाळिंबास 5000 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे सर्वात कमी बाजारभाव मिळाला.





