पेट्रोल वाहनांवरील कर
महाराष्ट्र सरकारच्या नवीन कर धोरणांत आता वाहनांवरील कर हे त्यांच्या किमतीच्या आधारे निश्चित करण्यात आले आहेत. त्यानुसार 10 लाख रुपयांपर्यंतच्या वाहनांना 11 टक्के, 10 ते 20 लाखांपर्यंत 12 टक्के आणि 20 लाखांपेक्षा जास्त किमतीच्या वाहनांवर 13 टक्के कर भरावा लागेल.
ST Fare: लालपरीचा प्रवास आजपासून स्वस्त, आता फुल तिकीट वाल्यांना सवलत, काय आहे नवी योजना?
advertisement
डिझेल वाहनांवरील कर
सध्या डिझेलवर चालणाऱ्या 10 लाख रुपयांपेक्षा कमी किमतीच्या वाहनांना 13 टक्के कर आकारला जातो. 10 ते 20 लाख रुपयांपर्यंतच्या वाहनांसाठी 14 टक्के आणि 20 लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या वाहनांसाठी 15 टक्के कर आकारला जातो. आता यामध्ये 1 टक्क्याने वाढ होणार आहे.
सीएनजी वाहनांवरील कर
नव्या कररचनेत सीएनजी आणि एलएनजी वाहनांना देखील 1 टक्के करवाढ करण्यात आलीये. सध्या 10 लाख रुपयांपर्यंतच्या सीएनजी वाहनांवर 7 टक्के कर आकारला जातो. त्यानुसार 10 लाख रुपयांची सीएनजी कार घेतल्यास सध्याचा कर 70 हजार रुपये होतो. नवीन कररचनेत आता 80 हजार रुपये मोजावे लागणार आहेत. तसेच 20 लाख रुपयांपर्यंतच्या सीएनजी वाहनांचा सध्याचा कर 1.4 लाख रुपयांवरून 1.6 लाख रुपये होईल. 10 लाख ते 20 लाख रुपये किमतीच्या वाहनांसाठी 12 टक्के आणि 20 लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या वाहनांसाठी 13 टक्के कर आकारला जातो.
दरम्यान, कंपनीच्या नावाखाली आयात केलेल्या किंवा नोंदणीकृत पेट्रोल आणि डिझेल दोन्ही वाहनांवर 20 टक्के कर आकारणी केली जाते.