Volvo XC60 मध्ये नवीन ग्रील आणि नवीन डायगोन्ल स्लॅट दिले आहे. ज्यामुळे ही Volvo XC60 आणखी आकर्षक आणि दमदार दिसते. या Volvo XC60 मध्ये नवीन बंपर आणि अलॉय व्हिल्स दिले आहे. या शिवाय रिअर टेल-लाइट्सच्या डिझाइनमध्ये स्मोक्ड टच दिला आहे. त्यामुळे ही एसयूव्ही आणखी प्रीमियम दिसतेय. या Volvo XC60मध्ये 11.2‑इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम दिली आहे. सोबतच गुगल बेस्ड मोठी स्क्रॅीन दिली आहे.
advertisement
Volvo XC60 Facelift चे फिचर्स
Volvo XC60 मध्ये 12.3 इंचाचा डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, नॅप्पा लेदर अपहोल्स्ट्री आणि मसाजिंग फ्रंट सीट्स सारखे फिचर्स दिले आहे. ही एसयूव्ही दोन रंगात उपलब्ध आहे. Forest Lake आमि Mulberry Red या दोन रंगाचा पर्याय दिला आहे. आधीच्या एसयूव्ही प्रमाणे Crystal White, Onyx Black, Denim Blue, Bright Dusk आणि Vapour Grey सारखे पर्यायही दिले आहे.
इंजिनमध्ये कोणतेच बदल नाही
दरम्यान, Volvo XC60 Facelift च्या पावरट्रेनमध्ये कोणतेही बदल केलेले नाही. आधीच्या एसयूव्ही प्रमाणेच 2.0‑लीटर 48V माइल्ड‑हाइब्रिड टर्बो‑पेट्रोल इंजिन दिलं आहे. जे 247‑250bhp ची पॉवर आणि 360Nm टॉर्क जेनरेट करतो.यासह ही एसयूव्ही AWD सिस्टम, 8‑स्पीड ऑटोमॅटिक गियरबॉक्ससह आहे. कारमध्ये 48V माइल्ड हायब्रिड सिस्टम दिला आहे. ज्यामुळे जास्तीचं मायलेज आणि इंजिनला आणखी ताकद देते. या एसयूव्ही मार्केटमध्ये थेट Mercedes GLC, BMW X3 आणि Audi Q5 सारख्या आलिशान कारसोबत टक्कर आहे.