CC म्हणजे काय?
‘CC’ म्हणजे क्युबिक सेंटीमीटर (Cubic Centimeter). हे तुमच्या गाडीच्या इंजिनातल्या सिलेंडर्समधून एकाच वेळी फ्युएल आणि हवेमधून किती जागा व्यापली जाते हे दाखवतं.
उदाहरणार्थ, जर एखाद्या गाडीचं इंजिन 1390 CC असलं, तर त्याला आपण सरळ 1.4 लीटर इंजिन असंही म्हणू शकतो. म्हणजेच, 1000 CC = 1.0 लीटर.
मोठं इंजिन म्हणजे जास्त ताकद?
advertisement
सामान्यतः मोठ्या सीसी असलेलं इंजिन जास्त पॉवर निर्माण करतं, कारण त्यात जास्त फ्युएल आणि हवा वापरली जाते. त्यामुळे कारला अधिक वेग आणि जोर मिळतो.
उदाहरणार्थ, 2.0 लीटर इंजिन असलेली गाडी 1.2 लीटर गाडीपेक्षा जास्त ताकदवान असते, पण त्याच वेळी तिचा इंधन वापरही जास्त असतो.
आजकाल अनेक कार्समध्ये टर्बोचार्ज्ड इंजिन वापरलं जातं, ज्यामुळे छोट्या इंजिनातूनही जास्त पॉवर मिळवता येते. त्यामुळे, पूर्वी ज्या गाड्यांना मोठं इंजिन लागायचं, त्या आता छोट्या पण टर्बोचार्ज्ड इंजिनसह उपलब्ध आहेत.
BHP म्हणजे काय?
इंजिनातून निर्माण होणाऱ्या ताकदीला BHP (Brake Horsepower) असं म्हणतात. यामुळे तुम्हाला गाडीची अंतिम कार्यक्षमता कळण्यास मदत करतं.
पण हे लक्षात ठेवा की जितकं जास्त CC गाडीमध्ये तितकी जास्त पावर, तितकंच जास्त इंधनाचा वापर.