TRENDING:

Ajab Gajab : नोकरी असावी तर अशी! फक्त हसून आणि रडून मिळणार पैसे, तुम्ही ही बनवू शकता करिअर

Last Updated:

जगभरात विचित्र नोकऱ्यांची कमतरता नाही. काही करिअर ऑप्शन असे आहेत, ज्यांच्याविषयी तुम्ही कदाचित कधी ऐकलं देखील नसेल.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : जगातली प्रत्येक व्यक्ती काही ना काही काम करत आहे. कोण घर सांभाळत आहे, तर कोण नोकरी किंवा व्यवसाय करत आहे. गेल्या काही वर्षांत नोकरीचा पॅटर्न बदलला आहे. लोक कौशल्याच्या जोरावर दर महिन्याला लाखो रुपयेदेखील सहज कमावत आहेत. सोशल मीडियाच्या जमान्यात लोकांना आपलं कौशल्य दाखवण्यासाठी चांगला प्लॅटफॉर्म मिळाला आहे. काही व्यक्ती दुसऱ्या व्यक्तींना हसवण्याचं, रडवण्याचं काम करत आहेत किंवा त्यांच्यासोबत हसून, रडून पैसे कमावत आहेत.
प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
advertisement

जगभरात विचित्र नोकऱ्यांची कमतरता नाही. काही करिअर ऑप्शन असे आहेत, ज्यांच्याविषयी तुम्ही कदाचित कधी ऐकलं देखील नसेल. एकीकडे भारतात कॉमिक क्रिएटर्स, कॉमेडी व्लॉगर्सला चांगली मागणी आहे, तर परदेशात फ्युनेरल डायरेक्टर अर्थात रडणाऱ्या किंवा उदास दिसणाऱ्या लोकांना मागणी वाढत आहे. कोणत्याही परिस्थितीत हसणं, हसवणं किंवा रडणं, रडवणं सोपं नसतं. त्यामुळे या विचित्र क्षेत्रात करिअर कसं करायचं ते सविस्तर जाणून घेऊ या.

advertisement

हसून किंवा रडून, फक्त कमवा पैसा

इंजिनीअर, डॉक्टर, प्राध्यापक, लेखक, बँकर अशा पारंपरिक नोकऱ्या करणाऱ्या व्यक्ती अशा विचित्र जॉबचा विचारदेखील करू शकत नाहीत. फूड टेस्टिंग जॉब, रिव्ह्यू वर्क अशी कामंदेखील आता जुनी झाली आहेत. विचित्र नोकऱ्यांच्या क्षेत्रात कोणत्या नोकऱ्या ट्रेंडिंगला आहेत ते पाहू या.

हसण्यासाठी पैसे देणाऱ्या नोकऱ्या

जर तुम्हाला हसायला आणि हसवायला आवडत असेल, तुम्ही हजरजबाबी असाल आणि विनोदनिर्मिती करून लोकांच्या चेहऱ्यावर हास्य आणू शकत असाल, तर हे जॉब्ज तुमच्यासाठी सर्वोत्तम आहेत.

advertisement

1. लाफ्टर थेरपिस्ट - लाफ्टर थेरपीमध्ये लोकांना हसवण्यावर लक्ष केंद्रित केलं जातं.

2. कॉमेडियन - कॉमेडियन विनोद आणि हावभावांच्या मदतीने लोकांना हसवतात.

3. हास्य अभिनेता - हास्य अभिनेता चित्रपट किंवा टीव्ही शोमध्ये विनोदी भूमिका करतात.

4. स्टँडअप कॉमेडियन - स्टँडअप कॉमेडियन व्यासपीठावरून लोकांना हसवतात. ते ऑन द स्पॉट विनोद करण्यात एक्स्पर्ट असतात.

advertisement

5. इम्प्रूव्ह कॉमेडियन - इम्प्रूव्ह कॉमेडियन हे परिस्थितीच्या आधारे विनोदनिर्मिती करतात.

रडण्यासाठी पैसे देणाऱ्या नोकऱ्या

काही लोकांना त्यांच्या भावना सहजपणे व्यक्त करता येत नाही. अशा स्थितीत रडण्यात एक्स्पर्ट असलेल्या व्यक्ती त्यांना मदत करू शकतात.

1. अभिनेता किंवा अभिनेत्री : अभिनेता किंवा अभिनेत्री चित्रपट, टीव्ही शोमध्ये भावनात्मक दृश्यांमध्ये रडत लोकांना आपल्या अभिनयाच्या माध्यमातून प्रभावित करतात.

advertisement

2. थेरपिस्ट : थेरपिस्ट लोकांना त्यांच्या भावना समजण्यासाठी आणि त्या व्यक्त करण्यासाठी मदत करतात.

3. मोर्निंग कौन्सिलर : हे समुपदेशक लोकांना त्यांच्या वैयक्तिक नुकसानानंतर मदत करतात.

4. अ‍ॅक्टिंग कोच : अ‍ॅक्टिंग कोच हे अभिनेते, अभिनेत्रींना भावनात्मक दृश्यांमध्ये कसं रडायचं याचं प्रशिक्षण देतात.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
45 वर्षांपासून जपलीये तिच चव, सोलापुरातील फेमस शिक कढई, एकदा खाल तर पुन्हा याल
सर्व पहा

5. फ्युनेरल डायरेक्टर : फ्युनेरल डायरेक्ट अंत्यसंस्कारावेळी शोक व्यक्त करण्याचं काम करतात.

मराठी बातम्या/करिअर/
Ajab Gajab : नोकरी असावी तर अशी! फक्त हसून आणि रडून मिळणार पैसे, तुम्ही ही बनवू शकता करिअर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल