उमेदवार सीबीआयच्या या भरतीच्या माध्यमातून 15 मार्चपर्यंत किंवा त्यापूर्वी अप्लाय करु शकतात. या पदांवर अर्ज करण्यासाठी उमेदवारांजवळ एलएलबीची डिग्री असायला हवी. तुम्हीही सीबीआयमध्ये या पदांवर नोकरी करु इच्छित असाल तर खाली दिलेल्या गोष्टी लक्षपूर्वक वाचा. ज्या उमेदवारांची निवड या पदांसाठी होते, त्यांना 3 वर्षाच्या कालावधीसाठी नियुक्त केलं जाईल.
Indian Navy Recruitment : 'या' पदवीधरांना मिळेल नौदलात ऑफिसर होण्याची संधी; असा करा अर्ज
advertisement
सीबीआयमध्ये नोकरी मिळवण्याची योग्यता
ज्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे. त्यांच्याजवळ कोणत्याही मान्यता प्राप्त संस्थानातून एलएलबीची डिग्री असायला हवी. यासोबतच उमेदवारांजवळ बार काउंसिलमध्ये विकलीच्या रुपात नामांकन सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. यासोबतच सीबीआय भरती 2024 साठी योग्य होण्यासाठी उमेदवारांजवळ उच्च न्यायालयात गुन्हेगारी खटले हाताळण्याचा बीएआरमध्ये अनुभव असायला हवा.
सीबीआयसाठी असा करा अर्ज
सीबीआय भरती 2024 साठी आवश्यक योगता आणि अनुभव असणारे उमेदवार अधिकृत वेबसाइटच्या माध्यमातून ऑनलाइन अर्ज करु शकतात.
Job News: ठाण्याच्या कळवा रुग्णालयात 293 पदांसाठी भरती; थेट मुलाखतीवर मिळणार संधी
येथे पाहा अप्लाय करण्याची लिंक आणि नोटिफिकेशन
CBI Recruitment 2024 साठी अर्ज करण्याची लिंक
CBI Recruitment 2024 Notification
अशी होईल निवड
उमेदवारांनी अर्ज फॉर्म ऑनलाइन लिंकच्या माध्यमातून भरला पाहिजे. ऑफलाइन आणि अखेरच्या तारखेनंतर मिळालेल्या अर्जांवर विचार केला जाणार नाही. केवळ शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांनाच सीबीआयद्वारे इंटरॅक्शनसाठी बोलवलं जाईल.
