Job News: ठाण्याच्या कळवा रुग्णालयात 293 पदांसाठी भरती; थेट मुलाखतीवर मिळणार संधी
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Thane News: तब्बल 293 पदांसाठी थेट मुलाखती या भरती प्रक्रियेदरम्यान होणार आहेत. विविध पदे कंत्राटी पद्धतीने भरली जाणार आहेत. या भरतीप्रक्रियेमुळे ठाणे पालिकेच्या आरोग्य यंत्रणेला बळ मिळणार असून..
मुंबई : ठाणे महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे कायमस्वरुपी 880 पदे भरणे आवश्यक आहे. परंतु, रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून, कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय आणि राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयातील विविध पदांसाठी कंत्राटी भरतीप्रक्रिया राबवण्यात येत आहे. तब्बल 293 पदांसाठी थेट मुलाखती या भरती प्रक्रियेदरम्यान होणार आहेत. विविध पदे कंत्राटी पद्धतीने भरली जाणार आहेत. या भरतीप्रक्रियेमुळे ठाणे पालिकेच्या आरोग्य यंत्रणेला बळ मिळणार असून अपुऱ्या सोयीसुविधांमुळे पालिका रुग्णालयातील रुग्णांची गैरसोयही कमी होण्यास मदत होईल.
कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात एकाच रात्रीत 18 रुग्णांचे अचानक मृत्यू झाले. त्यामुळे पालिकेच्या आरोग्य विभागातील त्रुटींबाबत टीका करण्यात आली. या घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रुग्णालयाला भेट देऊन या गंभीर घटनेची समितीमार्फत सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले होते. मात्र, कळवा रुग्णालयातील यंत्रणेवर येणारा ताण लक्षात घेऊन 293 पदांसाठी भरतीप्रक्रिया करण्याचा निर्णय ठाणे पालिका प्रशासनाने घेतला आहे. कंत्राटी पद्धतीने एकत्रित वेतनावर 6 महिने (179 दिवस) कालावधीसाठी भरती केली जाणार आहे. या भरती प्रक्रियेची ठाणे पालिका प्रशासनाने जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
advertisement
कोणती पदे भरणार?
स्त्रीरोग तज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, फिजियोथेरपिस्ट, आरोग्य निरीक्षक, बालरोग तज्ञ, शल्य चिकिस्तक, डायटेशियन, बायोमेडिकल इंजिनीअर, ऑक्युपेशनल थेरपिस्ट, स्पिच थेरिपिस्ट, पब्लिक हेल्थ नर्स, सायकॅट्रिक कौन्सिलर, वैद्यकीय समाजसेवक अधीक्षक, मानसोपचारतज्ज्ञ, सोशल वर्कर, दंत हायजिनिस्ट, इलेक्ट्रिशियन, ब्लड बँक टेक्निकल सुपरवायझर, डेप्युटी लायब्रेरियन, लायब्ररी असिस्टंट, क्युरेटर ऑफ म्युझियम, आर्टिस्ट, फोटोग्राफर, फिजिशियन, भूलतज्ज्ञ, नेत्र शल्य चिकित्सक, मेडिकल रेकॉर्ड कीपर, औषध निर्माण अधिकारी.
advertisement
वयोमर्यादा -
या भरतीसाठी वयोमर्यादा निश्चित केली असून खुल्या गटासाठी 38 वर्षे व मागासवर्गीय उमेदवारांसाठी 43 वर्षे वयोमर्यादा राहणार आहे. शैक्षणिक अहर्ता व अनुभवाची पूर्तता करणारे उमेदवार मुलाखत फेरीसाठी पात्र ठरतील.
26 फेब्रुवारी ते 01 मार्चपर्यंत भरती प्रक्रिया सुरू राहणार आहे. यामध्ये विविध पदांसाठी प्रत्येक दिवस मुलाखत फेरीसाठी नेमून दिला आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांनी पाचपाखाडी येथील ठाणे पालिका मुख्यालयाच्या तिसऱ्या मजल्यावर नमूद पदाच्या व संबंधित संवर्गासाठी दिलेल्या दिवशीच उपस्थित राहावे, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
February 20, 2024 3:30 PM IST
मराठी बातम्या/ठाणे/
Job News: ठाण्याच्या कळवा रुग्णालयात 293 पदांसाठी भरती; थेट मुलाखतीवर मिळणार संधी


