Indian Navy Recruitment : 'या' पदवीधरांना मिळेल नौदलात ऑफिसर होण्याची संधी; असा करा अर्ज
- Published by:News18 Marathi
- trending desk
Last Updated:
भारतीय नौदलामध्ये ऑफिसर होण्याचं स्वप्न बघणाऱ्या युवकांसाठी सुवर्णसंधी चालून आली आहे. नौदलाच्या शॉर्ट सर्व्हिस कमीशन ऑफिसर्स भरती2024साठी पत्रक जारी करण्यात आलं आहे.
मुंबई : भारतीय नौदलामध्ये ऑफिसर होण्याचं स्वप्न बघणाऱ्या युवकांसाठी सुवर्णसंधी चालून आली आहे. नौदलाच्या शॉर्ट सर्व्हिस कमीशन ऑफिसर्स भरती2024साठी पत्रक जारी करण्यात आलं आहे. याच्या माध्यमातून नौदलामध्ये ऑफिसर्सच्या254रिक्त पदांची भरती होणार आहे. यासाठी बीटेक/बीई उत्तीर्ण झालेले किंवा शेवटच्या वर्षात शिकणारे विद्यार्थी अर्ज करू शकतात. येत्या24फेब्रुवारी पासून अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. यासाठी उमेदवार अविवाहित असणं आवश्यक आहे.
advertisement
नौदलाकडून जारी करण्यात आलेल्या शॉर्ट नोटिफिकेशननुसार जानेवारी2025(ST 2025)अभ्यासक्रमासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख10मार्च2024आहे. या संदर्भातले अर्जhttps://www.joinindiannavy. gov.inया ठिकाणी नौदलाच्या वेबसाईटवर जाऊन भरावे लागतील.
या शाखांमध्येही होईल अधिकारीभरती
एसएससी ऑफिसर्सची भरती नौदलाच्या अनेक शाखा/केडरमध्ये होईल. ते पुढीलप्रमाणे असेल.
advertisement
एक्झिक्युटिव्ह ब्रँच -1. जनरल ब्रँच2.वैमानिक3.नौदल एअर ऑपरेशनल ऑफिसर4.एअर ट्रॅफिक कंट्रोलर5.लॉजिस्टिक्स6.नौदल अर्मामेंट अंस्पेट्रोटेक (NAIC)
शैक्षणिक शाखा –1. शैक्षणिक तांत्रिक शाखा.2.अभियांत्रिकी शाखा (जनरल सर्व्हिस),3.इलेक्ट्रिकल शाखा (जनरल सर्व्हिस)4.नौदल कन्स्ट्रक्टर
शैक्षणिक आर्हता
अर्ज करणारा उमेदवार हा त्याच्या संबंधित शाखेत कमीतकमी60टक्के गुणांसह बीई किंवा बीटेक उत्तीर्ण असावा. जनरल सर्व्हिस,वैमानिक,नौदल ऑपरेशन्स अधिकारी,एअर ट्रॅफिक कंट्रोलर शाखा/केडर यासाठी कोणत्याही अभियांत्रिकी शाखेचा पदवीधर उमेदवार चालेल. लॉजिस्टिक्ससाठी एमबीए पदवी आवश्यक आहे. तर,शैक्षणिक शाखेसाठी एमटेक/एमएस्सी ही आर्हता आवश्यक आहे.
advertisement
वयोमर्यादा
नौदलाच्या एसएससी अधिकारीभरतीसाठी उमेदवाराचा जन्म2जानेवारी2000ते1जुलै2005च्या दरम्यान झालेला असावा.
कशी असेल निवड प्रक्रिया?
-अर्ज दाखल केल्यानंतर उमेदवारांना त्यांच्या पात्र पदवीमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे शॉर्टलिस्ट केलं जाईल.
-यानंतर शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना एसएसबी इंटरव्ह्यू द्यावा लागेल.
-एसएसबी इंटरव्ह्यू ज्या प्रकारे झाला असेल,त्यावर आधारित गुणवत्ता यादीनुसार अंतिम निवड केली जाईल.
प्रशिक्षण
अंतिम निवड झाल्यानंतर उमेदवारांना सब-लेफ्टनंट म्हणून प्रशिक्षण घ्यावं लागेल. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतरNAICमध्ये तीन वर्ष आणि अन्य शाखांमध्ये दोन वर्ष प्रोबेशनवर नोकरी करावी लागेल. त्यानंतर कायमस्वरूपावर नियुक्ती केली जाईल.
advertisement
किती मिळणार वेतन?
सब-लेफ्टनंट या पदावर रुजू झाल्यानंतर मूळ वेतन दरमहा56,100रुपये इतकं असेल. याबरोबर अन्य भत्ते मिळतील, असं या पत्रकात नमूद केलं आहे. अर्ज करणाऱ्यांनी वेबसाईटवर संपूर्ण माहिती वाचूनच अर्ज करावा.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
February 21, 2024 6:01 AM IST
मराठी बातम्या/करिअर/
Indian Navy Recruitment : 'या' पदवीधरांना मिळेल नौदलात ऑफिसर होण्याची संधी; असा करा अर्ज


