X-ray रेडिएशन मुळे शरीराला खरंच धोका आहे का?, अमेरिकेच्या शास्त्रज्ञाने दिली ही महत्त्वाची माहिती
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
रेडिओनिदान क्षेत्रात काम करणाऱ्या महिला कर्मचारी आपल्या मुलावर विपरीत परिणाम होईल अशी भीती त्यांना वाटते म्हणून गर्भवती असताना एक्स-रे काढण्याचे काम करत नाहीत.
ऋषभ चौरसिया, प्रतिनिधी
लखनऊ : क्ष-किरण (एक्स-रे) करताना किंवा काढताना रेडिएशनमुळे अनेक जण घाबरतात. मात्र, याबाबत काळजी करू नये. याबाबत अनेक संशोधनेही समोर आली आहेत. यामध्ये, पेल्विस आणि पोटाशिवाय इतर अवयवांमध्ये एक्स-रे रेडिएशनचे कोणतेही दीर्घकालीन दुष्परिणाम होत नाहीत. अमेरिकेतील जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठातील प्राध्यापक एम. महेश यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
लखनऊ येथील केजीएमयूच्या शताब्दी हॉस्पिटलमध्ये एमआरआय आणि सीटी स्कॅनमधील "नई सीमाओं की खोज" या विषयावर ऑनलाइन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी या कार्यशाळेला त्यांनी संबोधित केले.
advertisement
किंग जॉर्ज मेडिकल युनिव्हर्सिटीच्या रेडियोडायग्नोसिस विभाग आणि आयएसआरटीतर्फे दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेचे आयोजन सचिव प्राध्यापक दुर्गेश द्विवेदी म्हणाले की, प्राध्यापक महेश यांनी ऑनलाइन माध्यमातून यात सहभाग घेतला. त्यांनी एक्स-रे संबंधी अनेक गैरसमज दूर केले. तसेच नवीन तंत्रज्ञानाची माहिती दिली.
ही कार्यशाळा नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान आणि विज्ञानातील नवीनतम घडामोडी माहिती होण्यासाठी एक महत्त्वाचे व्यासपीठ ठरली. डॉ. दुर्गेश यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रोफेसर एम महेश यांनी एक्स-रे दरम्यान निर्माण होणाऱ्या रेडिएशनबद्दल अनेक अभ्यास केले आहेत. त्यांच्या मते, छातीचा एक्स-रे करताना निर्माण होणारे रेडिएशन सामान्य असते. तसेच यामुळे कोणत्याही अनुवांशिक रोगाचा धोका नाही किंवा त्याचे दूरगामी परिणामही होत नाहीत, असे म्हणाले.
advertisement
महिला कर्मचाऱ्यांना भिती -
view commentsयावेळी त्यांनी सांगितले की, रेडिओनिदान क्षेत्रात काम करणाऱ्या महिला कर्मचारी आपल्या मुलावर विपरीत परिणाम होईल अशी भीती त्यांना वाटते म्हणून गर्भवती असताना एक्स-रे काढण्याचे काम करत नाहीत. मात्र, असे काहीही नाही. सध्या अशा मशीन विकसित केली जात आहेत, ज्यामध्ये रेडिएशन सुरक्षित राहते. यासोबतच इतर अनेक तंत्रे आहेत ज्याद्वारे रेडिएशन टाळता येऊ शकते, अशी माहिती त्यांनी दिली.
Location :
Lucknow,Uttar Pradesh
First Published :
February 20, 2024 5:42 PM IST
मराठी बातम्या/हेल्थ/
X-ray रेडिएशन मुळे शरीराला खरंच धोका आहे का?, अमेरिकेच्या शास्त्रज्ञाने दिली ही महत्त्वाची माहिती


