ऑनलाइन गेम खेळताना 2 मुलांच्या आईवर झालं प्रेम, 2 वर्षानंतर अचानक 17 वर्षांच्या प्रियकराच्या घरी पोहोचली महिला
- Published by:Khushalkant Dusane
Last Updated:
17 वर्षांच्या मुलाला ऑनलाइन गेम खेळताना एका महिलेसोबत प्रेम झाले. 2 वर्षांपासून दोघांमध्ये ऑनलाईन बोलणे होत होते.
विकाश पाण्डेय, प्रतिनिधी
सीधी : सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे. त्यात विविध प्रकारच्या प्रेमकहाण्याही समोर येत असतात. सोशल मीडियावर झालेले प्रेम नंतर पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचल्याचंही तुम्ही वाचलं असेल, ऐकले असेल. यातच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
17 वर्षांच्या मुलाला ऑनलाइन गेम खेळताना एका महिलेसोबत प्रेम झाले. 2 वर्षांपासून दोघांमध्ये ऑनलाईन बोलणे होत होते. यातच आता दोन दिवसांपूर्वी ही महिला आपल्या दोन वर्षांच्या मुलाला घेऊन प्रियकराच्या घरी पोहोचली. यानंतर या घटनेनंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली. ही महिला उत्तराखंडची रहिवासी आहे. तिच्यासोबत तिचा मुलगासुद्धा होता. यानंतर ही घटना आता पोलिसांपर्यंत पोहोचली आहे.
advertisement
मध्यप्रदेशातील सीधी जिल्ह्यातून समोर आलेल्या या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ऑनलाइन गेम फ्री फायर हा गेम खेळताना खेळता खेळता एक अल्पवयीन मुलाला एका मुलाच्या आईसोबत प्रेम झाले. जेव्हा ही महिला थेट उत्तराखंड येथून तिच्या या प्रियकर मुलाच्या घरी पोहोचली तेव्हा या घटनेचा खुलासा झाला. या घटनेनंतर गावातही खळबळ उडाली आहे. यानंतर गावकऱ्यांनी तिचा प्रियकर आणि प्रेयसी महिला दोघांना समजावून परत पाठवले. या प्रकरणी अतिरिक्त पोलीस अधीक्षक (एएसपी) म्हणाले की, हे प्रकरण आता मिटले आहे.
advertisement
दोन वर्षांपासून सुरू होता संवाद -
view commentsऑनलाइन गेम खेळणाऱ्या मुलाचे फक्त 17 वर्ष आहे. जवळपास 2 वर्षे त्याचा संवाद हा या महिलेसोबत होत होता. सोमवारी या अल्पवयीन मुलाच्या घरी एकच गर्दी झाली. सिहावल पोलिसांनी अल्पवयीन तरुण आणि मुलाला घेऊन आलेल्या महिलेला चौकशीसाठी पोलिस चौकीत बोलावले. दोघांचे जबाब घेतल्यानंतर खुलासा करण्यात आला आणि 18 फेब्रुवारी रोजी सकाळी ही महिला गावातून निघून पडली. मुलगा अल्पवयीन असल्याने तो त्याच्या प्रेयसीला सोबत ठेवू शकला. या घटनेची संपूर्ण शहरात चर्चा होत आहे. मुलाची आणि महिलेची ओळख गोपनीय ठेवली जावी, असे आवाहन पोलिसांनी लोकांना केले आहे.
Location :
Sidhi,Madhya Pradesh
First Published :
February 20, 2024 4:38 PM IST
मराठी बातम्या/देश/
ऑनलाइन गेम खेळताना 2 मुलांच्या आईवर झालं प्रेम, 2 वर्षानंतर अचानक 17 वर्षांच्या प्रियकराच्या घरी पोहोचली महिला


