10वी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरी
तुम्ही जर 10 वी पास असाल आणि सरकारी नोकरी शोधत असाल, तर नॅशनल बँक फॉर अॅग्रीकल्चर अँड रूरल डेव्हलपमेंट (NABARD) या संस्थेने एक सुवर्णसंधी आणली आहे. नाबार्ड ऑफिस अटेंडंट पदासाठी 108 जागा भरणार आहे. यासाठी त्यांनी अर्ज मागवले आहेत. ही भरती प्रक्रिया उद्या, 2 ऑक्टोबर 2024 पासून सुरू होईल आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑक्टोबर 2024 ही आहे. पात्र उमेदवार नाबार्डच्या www.nabard.org या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात.
advertisement
शैक्षणिक पात्रता
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी 10वी उत्तीर्ण केलेली असावी.
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचं वय 1 ऑक्टोबर 2024 पर्यंत किमान 18 वर्षं आणि कमाल 30 वर्षं असावं. राखीव वर्गातल्या उमेदवारांना वयोमर्यादेत सवलत दिली जाईल.
उमेदवारांची निवड करण्याची प्रक्रिया आणि पगार
ज्या उमेदवारांची ऑफिस अटेंडंट पदासाठी निवड होईल, त्यांना दर महिन्याला 35,000 रुपये पगार मिळेल. निवड प्रक्रियेची सगळी माहिती आणि इतर तपशील 2 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध होणाऱ्या अधिकृत नोटिफिकेशनमध्ये दिले जातील.
अर्ज कसा करायचा?
या पदांसाठी इच्छुक असलेले उमेदवार 2 ऑक्टोबरपासून नाबार्डच्या वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑक्टोबर 2024 ही आहे. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्यांसाठी ही एक चांगली संधी आहे. 10वी पास उमेदवारांना चांगल्या पगाराची सरकारी नोकरी मिळू शकते. नोटिफिकेशनमध्ये पात्रता तपासून उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात.