स्टाफ सिलेक्शन कमिशनकडून एसएससी जीडी अंतर्गत एकूण 3337 कॉन्स्टेबलची पदं भरली जाणार आहेत. ऑनलाईन अर्ज करणाऱ्या उमेदवारांची सर्व प्रथम संगणकावर परीक्षा होईल, त्यानंतर शारीरीक चाचणी होणार आहे. या दोन परीक्षेनंतर मेरिटच्या आधारे उमेदवाराची निवड केली जाईल. तुम्हाला जर या पदासाठी अर्ज करायचा असेल तर तुम्ही कुठल्याही मान्यता प्राप्त बोर्डामधून दहावीची परीक्षा पास झालेले असणं आवश्यक आहे. तसेच या पदासाठी जे शारीरीक मापदंड ठरवून देण्यात आले आहेत, त्याची पूर्तता तुम्ही करणं आवश्यक आहे.
advertisement
तुमची एसएससी जीडी अंतर्गत कॉन्स्टेबलच्या पदासाठी निवड झाली तर तुम्हाला 21,700 रुपये ते 69,100 रुपयांपर्यंत पगार मिळू शकतो. तुम्ही एसएसीच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन फॉर्म भरण्यानंतर परीक्षेची तारीख घोषीत करण्यात येईल. परीक्षेचा कालावधी एक तासाचा असणार आहे. ही परीक्षा संगणकावर होईल. तुम्हाला तिथे जनरल नॉलेजवर आधारित वस्तूनिष्ठ प्रश्न विचारले जातील. यामध्ये ज्यांचं सिलेक्शन होईल त्यांची शारीरीक चाचणी होईल, यामधून मेरिटच्या आधारावर उमेदवाराची निवड होईल.