चेतन जैन यांच्या मार्गदर्शनाखाली स्टडी स्मार्टने गेल्या 14-15 वर्षांमध्ये सुमारे 6,000 विद्यार्थ्यांना यूके, यूएसए, आयर्लंड, ऑस्ट्रेलिया, जर्मनी आणि दुबईसारख्या देशांमध्ये शिक्षणासाठी पाठवले आहे. प्रारंभी दोन लोकांपासून सुरू झालेल्या या संस्थेत आता 70 सदस्यांची टीम कार्यरत आहे.
स्टडी स्मार्ट विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रोफाइल, करिअर उद्दिष्टे, आणि आर्थिक स्थिती समजून घेत, त्यांना योग्य देश, विद्यापीठ, आणि अभ्यासक्रम निवडण्यात मदत करते. विशेष म्हणजे, या सल्लागार सेवेसाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. याशिवाय, व्हिसा प्रक्रियेमध्ये मदत, शिष्यवृत्ती मिळवून देणे आणि आवश्यकतेनुसार कर्जाची सोय करणे या सुविधा विनामूल्य पुरवल्या जातात.
advertisement
चेतन जैन सांगतात की, "विद्यार्थ्यांकडून कोणतेही शुल्क न घेता थेट युनिव्हर्सिटीला फी जमा केली जाते. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासात कोणतीही आर्थिक अडचण येऊ नये याची काळजी घेतली जाते." याशिवाय, स्टडी स्मार्टने वर्षभरात चार ते पाच ग्लोबल एज्युकेशन फेअर आयोजित करून विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती आणि आर्थिक मदतीबद्दल मार्गदर्शनही दिले आहे.