लखनऊ : बोर्डाच्या परीक्षा आता सुरू झाल्या आहेत. बारावीचे विद्यार्थी दिवस-रात्र जागून अभ्यास करू लागले आहेत. असंख्य विद्यार्थ्यांनी यंदा टॉप करण्याचं ध्येय उराशी बाळगलंय. त्यामुळे आता आळस करायचा नाही, झोपायचं नाही, मन लावून अभ्यास करायचा ही एकमेव बाब त्यांच्या ध्यानीमनी आहे.
परीक्षा असो किंवा नसो, पण अनेकजणांना पुस्तक हातात घेतलं की झोप येते. हीच सवय कंट्रोल करण्यासाठी काही विद्यार्थी चहा, कॉफी पिऊन फ्रेश राहण्याचा प्रयत्न करत आहेत. तर काही विद्यार्थी डोळे फ्रेश ठेवण्यासाठी गुलाबपाण्याच्या वापर करतात. अनेक विद्यार्थी एनर्जी ड्रिंकही घेतात, ज्यामुळे थोडावेळ का होईना पण त्यांचं शरीर ऊर्जावान राहील. परंतु या सर्व प्रयोगांमुळे अभ्यास जरी झाला तरी आरोग्यावर विपरीत परिणाम होतात हे निश्चित. लक्षात घ्या दहावी, बारावीची परीक्षा कितीही कठीण असली तरी ही केवळ सुरूवात आहे. त्यामुळे अभ्यासात आरोग्य गमवू नका.
advertisement
Jain Monk Lifestyle : जैन साधू-साध्वी कधीच करत नाहीत अंघोळ; पण का? तरी त्याचं शरीर स्वच्छ कसं?
परीक्षेपूर्वी अभ्यास चोख हवा हे बरोबर आहे, मात्र केलेला अभ्यास परीक्षेत उतरवण्यासाठी शरिरात ताकद असायला हवी. विद्यार्थी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सुदृढ असायला हवे. चहा, कॉफीमध्ये कॅफेनचं प्रमाण अधिक असतं. त्यामुळे विद्यार्थ्यांचा ताण-तणाव वाढू शकतो. गुलाबपाणी डोळ्यांसाठी फायदेशीर असू शकतं, परंतु सतत त्याचा वापर केल्यास डोळ्यांमध्ये जळजळ होऊ शकते. एनर्जी ड्रिंकमध्ये कॅफेन आणि टॉरिनचं प्रमाण प्रचंड असतं, ज्याचा विद्यार्थ्यांच्या हृदयावर आणि मेंदूवर विपरीत परिणाम होऊ शकतो.
भारताला सुवर्णपदक मिळवून द्यायचंय, तरुणाने सोडली सैन्यदलातील नोकरी, आता सरकारकडे केली ही मागणी
डॉक्टर आदर्श त्रिपाठी सांगतात की, सतत जागून अभ्यास केल्याने, पुरेशी झोप न झाल्याने जो काही अभ्यास केलाय तोसुद्धा लक्षात राहण्यात अडचणी येतात. इतकंचं नाही, तर विद्यार्थ्यांची चिडचिड वाढते, त्यांना ताण येतो आणि परीक्षेची आणखी भीती वाटते. त्यामुळे नेहमीप्रमाणे परीक्षा काळात 8 तास शक्य नसेल, तर कमीत कमी 5 ते 6 तासांची झोप घेणं आवश्यक आहे. शिवाय पालकांनी मुलांना सकस आहार द्यावा. त्यांच्या आहारात फळं, भाज्यांचा समावेश असायला हवा. जास्त फॅट असलेले पदार्थ आणि जंक फूड त्यांना अजिबात देऊ नये, असा सल्ला डॉक्टरांनी दिला.
अभ्यास नेमका कधी करावा?
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थ्यांनी सगळा अभ्यास परीक्षा काळात करू नये. आधीपासून अभ्यासाला सुरूवात व्हायला हवी. परीक्षेदरम्यान फक्त उजळणी करावी. यामुळे विद्यार्थी तणावमुक्त राहतील. पालकांनी वेळोवेळी त्यांच्याशी संवाद साधायला हवा, ज्यामुळे त्यांच्या मनातल्या सर्व अडचणी कळतील आणि त्यांचं निरसन करता येईल. शिवाय फावल्या वेळेत विद्यार्थ्यांनी आपले छंद जोपासावे, आवडते खेळ खेळावे. ज्यामुळे त्यांचं मन फ्रेश राहील.
लेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनलला करा फॉलो…या लिंकवर क्लिक करा