उदयपुर : सध्या सोशल मीडियाच्या काळात प्रत्येक जण मोबाईलवर वेळ घालवत आहे. असे असताना एका मुलीने सोशल मीडियावर वेळ न घालवता नीट (NEET) या अत्यंत कठीण परिक्षेत तब्बल पैकीच्या पैकी गुण मिळवले आहेत. तिच्या या यशानंतर लोकल18 च्या टीमशी बोलताना तिने आपल्या यशाचं रहस्य काय आहे, ते सांगितलं.
एनटीए म्हणजे नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून मंगळवारी सायंकाळी नीट परीक्षेचा निकाल जाहीर झाला. यामध्ये उदयपूर येथील एमडीएस स्कूलची विद्यार्थिनी ईशा कोठारी हिने देशात पहिली रँक मिळवली आहे. तिने या अत्यंत कठीण परिक्षेत 720 पैकी 720 म्हणजे पैकीच्या पैकी गुण मिळवले आहेत. देशातील अत्यंत प्रतिष्ठित अशा एम्स दिल्ली येथून वैद्यकीय शिक्षण घेऊन देशातील प्रतिष्ठित डॉक्टर बनून मला उदयपूरचे नाव देशात आणि जगात मोठे करायचे आहे, असे म्हणाली.
advertisement
तिच्या यशाच्या रहस्याबद्दल बोलताना तिने सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे स्मार्टफोन आणि सोशल मीडियापासून दूर राहणे, हे सांगितले. यश मिळवण्यासाठी डिजिटलच्या या जगात सोशल मीडियापासून दूर राहणे आवश्यक आहे. कारण, सोशल मीडियावर प्रत्येक तासाला असा कुठला तरी मेसेज किंवा माहिती मिळते की ज्यामुळे तब्बल 1-2 तास तुमचे लक्ष विचलित होते आणि तुमच्या अभ्यासाचे नुकसान होते.
अभ्यासासाठी सोशल मीडियापासून दूर राहणे आवश्यक -
प्रत्येक दिवशी वाया जाणाऱ्या या 2 तासांची भरपाई करणे शक्य नाही. दृढ संकल्पाने सोशल मीडियापासून दूर राहून अभ्यासावर फोक केला आणि प्रत्येक दिवस 8 तास अभ्यास केला. तिची आई हंसा कोठारी आणि वडील सुधीर कोठारी यांनी तिचे मनोबल वाढवल्याचे तिने सांगितले. तिची आई गृहिणी तर वडील प्लायवूडचा व्यवसाय करतात. तसेच भावाने पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे. तसेच तोसुद्धा प्लायवूडचा व्यवसाय करतो. इशाला दहावीला 97.63 तर बारावीला 95.80 टक्के गुण होते. यानंतर आता तिने नीट या कठीण परिक्षेतही 720 पैकी 720 गुण मिळवत देशात पहिला क्रमांक मिळवला आहे.
वाघांचं भारतातील सर्वात मोठं कुटूंब, 1-2 दोन नव्हे राहतात तब्बल इतके सदस्य, अनोखी गोष्ट
तिने रेडिएंट ॲकॅडमी येथून कोचिंग घेतले. तिच्या या यशामध्ये एमडीएसचे संचालक डॉ. शैलेंद्र सोमानी, सहयोगी शैक्षणिक प्रधान संचालक कमल पटसारिया, रेडियंट ॲकॅडमीचे संचालक आणि वैद्यकीय विभागाचे प्रमुख जंबू जैन यांनी भूमिका बजावली.