TRENDING:

आज शेवटचा दिवस! SBI मध्ये 5,280 पदांसाठी करा अर्ज, पात्रता पदवी, मोठ्या पगाराची सुवर्णसंधी

Last Updated:

Job opportunity: आज 17 डिसेंबर ही या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. SBI च्या या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारा कोणताही उमेदवार SBI च्या अधिकृत वेबसाइट sbi.co.in वर जाऊन अर्ज करू शकतो.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई, 17 डिसेंबर : देशातील सर्वात मोठ्या बँकेत सरकारी नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने सर्कल बेस्ड ऑफिसरच्या पदांसाठी भरतीसाठी रिक्त जागा प्रसिद्ध केल्या आहेत. आज 17 डिसेंबर ही या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. SBI च्या या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारा कोणताही उमेदवार SBI च्या अधिकृत वेबसाइट sbi.co.in वर जाऊन अर्ज करू शकतो. या पदांसाठी 22 नोव्हेंबरपासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली होती.
News18
News18
advertisement

SBI च्या या भरतीतून एकूण 5,280 पदे भरली जातील. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख वाढवण्यात आली होती. तुम्हीही या पदांवर नोकरी मिळविण्याची तयारी करत असाल तर खाली दिलेले मुद्दे काळजीपूर्वक वाचा.

फॉर्म भरण्यासाठी आवश्यक पात्रता -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवीधर असले पाहिजेत.

advertisement

SBI मध्ये अर्ज करण्यासाठी भरावे लागणार शुल्क -

SBI CBO 2023 साठी अर्ज करणार्‍या सामान्य श्रेणीतील (ओपन) उमेदवारांना अर्ज फी म्हणून 750 रुपये भरावे लागतील. PwD, SC किंवा ST श्रेणीतील कोणत्याही उमेदवाराला कोणतेही अर्ज शुल्क भरावे लागणार नाही.

ITI आणि 10 वी पाससाठी IOCL मध्ये नोकरीची संधी; 1 हजार 820 पदांसाठी बंपर भरती

advertisement

या वयोमर्यादा असलेल्या लोकांनी अर्ज करावा -

जे उमेदवार या पदांसाठी अर्ज करत आहेत, त्यांचे वय 31.10.2023 रोजी 21 वर्षांपेक्षा कमी आणि 30 वर्षांपेक्षा जास्त नसावे. उमेदवाराचा जन्म 31.10.2002 नंतर आणि 01.11.1993 पूर्वी झालेला नसावा.

सरकारी नोकरीच्या शोधात आहात? मग इथं अर्ज कराच, अजून डेडलाईन गेली नाही!

निवड झाल्यावर मिळणार वेतन -

advertisement

या पदांसाठी निवडलेल्या उमेदवारांचे मूळ वेतन 36000-1490/7-46430-1740/2 वेतनश्रेणी अंतर्गत 36,000 रुपये असेल. यानंतर, दोन एडवांस्ड इंक्रीमेंटनंतर, तुम्हाला कनिष्ठ व्यवस्थापन ग्रेड स्केल-I अंतर्गत 49910-1990/7-63840 रुपये मिळतील. याशिवाय मॅनेजमेंट डीए, एचआरए/लीज रेंटल, सीसीए, मेडिकलसाठी देखील पात्र असतील. याशिवाय वेळोवेळी लागू होणाऱ्या नियमांनुसार इतर भत्ते आणि सुविधाही दिल्या जातील.

मराठी बातम्या/करिअर/
आज शेवटचा दिवस! SBI मध्ये 5,280 पदांसाठी करा अर्ज, पात्रता पदवी, मोठ्या पगाराची सुवर्णसंधी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल