Central Govt Job : सरकारी नोकरीच्या शोधात आहात? मग इथं अर्ज कराच, अजून डेडलाईन गेली नाही!
- Published by:sachin Salve
- trending desk
Last Updated:
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचं वय 18 ते 27 वर्षांदरम्यान असावं. तसेच शासकीय नियमांनुसार वयोमर्यादेत सूट दिली जाईल.
मुंबई, 16 डिसेंबर : आपल्याला सरकारी नोकरी मिळावी अशी प्रत्येक युवक-युवतीची इच्छा असते. अणुऊर्जा विभाग अर्थात डीएईमध्ये सरकारी नोकरी मिळवी अशा इच्छुक उमेदवारांसाठी एक चांगली संधी आहे. डीएईमध्ये कनिष्ठ खरेदी सहाय्यक/कनिष्ठ स्टोअरकीपरसह विविध गट क पदांवर काम करू इच्छिणारे कोणीही व्यक्ती डीएईच्या dae.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात. या पद भरतीसाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. ही पदं खरेदी आणि भांडार संचालनालय अर्थात डीपीएस, मुंबई आणि त्यांच्या देशभरातील इतर प्रादेशिक युनिटमध्ये भरली जाणार आहेत.
या भरती मोहिमेअंतर्गत एकूण 62 पदं भरायची आहेत. त्यापैकी 45 पदं ही स्टोअरकीपर आणि 17 पदं कनिष्ठ खरेदी सहाय्यकाची आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार या पदांसाठी 31 डिसेंबर 2023 रोजी किंवा त्या पूर्वी ऑनलाइन अर्ज करू शकतात. या पदांसाठी निवड उमेदवारांच्या लेखी परीक्षेतील गुणांच्या आधारे केली जाईल. ही परीक्षा जानेवारी 2024 च्या तिसऱ्या आठवड्यात घेतली जाईल.
advertisement
या पदांसाठी होणार भरती प्रक्रिया
ज्युनिअर पर्चेस असिस्टंट अर्थात कनिष्ठ खरेदी सहाय्यक - 17
ज्युनिअर स्टोअर कीपर - 45
अणुऊर्जा विभागात काम करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता
इच्छुक उमेदवार 60 टक्के गुणांसह विज्ञान पदवीधर किंवा 60 टक्के गुणांसह वाणिज्य पदवीधर असावा अथवा उमेदवाराकडे शासकीय मान्यताप्राप्त विद्यापीठे/ संस्थांमधून 60 टक्के गुणांसह मॅकेनिकल इंजिनीअर/ इलेक्ट्रिकल इंजिनीअर/ इलेक्ट्रॉनिक्स/ कम्प्युटर सायन्समध्ये डिप्लोमा केलेला असावा.
advertisement
अशी आहे वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचं वय 18 ते 27 वर्षांदरम्यान असावं. तसेच शासकीय नियमांनुसार वयोमर्यादेत सूट दिली जाईल.
डीएईमध्ये या पदांसाठी मिळणार इतकं वेतन
ज्या उमेदवारांची या पदासाठी निवड होईल, त्यांना वेतनाच्या लेव्हल 4 नुसार 25,500 ते 81,100 रुपये वेतन दिलं जाईल.
असा करा अर्ज
अर्ज करणाऱ्यासाठी उमेदवारांनी सर्वप्रथम dae.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जावं.
advertisement
होमपेजवरील DAE Recruitment 2023 या लिंकवर क्लिक करावं.
यासाठी तुमच्याकडे वैध ई-मेल आयडी आणि मोबाइल क्रमांक असावा.
त्यानंतर अर्जात तुमची तपशीलवार माहिती भरावी.
आवश्यक सर्व डॉक्युमेंट्स अपलोड करावेत.
त्यानंतर भविष्यातील संदर्भासाठी त्याची प्रिंटआउट काढून ती जवळ ठेवावी.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 16, 2023 9:00 PM IST
मराठी बातम्या/करिअर/
Central Govt Job : सरकारी नोकरीच्या शोधात आहात? मग इथं अर्ज कराच, अजून डेडलाईन गेली नाही!