Noise Pollution : पाऊसामुळे आवाज गायब? विसर्जन मिरवणुकीत यंदा डेसिबल चेक ठप्प

Last Updated:

Noise Pollution On Ganpati Visarjan : विसर्जनावेळी संपूर्ण राज्यामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली होती. वरूण राजाच्या एन्ट्रीमुळे विसर्जन मिरवणूकीवेळी डीजेच्या आणि ढोल ताशांच्या आवाजांच्या पातळीची मोजणी करणं शक्य झालं नाही.

News18
News18
नुकतंच आपण सर्वांनी लाडक्या गणरायाला निरोप दिला. मिरवणूकीवेळी डीजेच्या तालावर आणि ढोल ताशाच्या गजरात सर्वच गणेश भक्तांनी ताल धरला. मनमुराद नाचत मिरवणूकीची शान वाढवली. आणि त्यावेळी हजेरी होती, वरूण राजाची. विसर्जनावेळी संपूर्ण राज्यामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली होती. वरूण राजाच्या एन्ट्रीमुळे विसर्जन मिरवणूकीवेळी डीजेच्या आणि ढोल ताशांच्या आवाजांच्या पातळीची मोजणी करणं शक्य झालं नाही. मुंबईमध्ये दरवर्षी प्रत्येक विसर्जनावेळी आवाज फाऊंडेशन गणेश विसर्जनादरम्यानच्या मिरवणुकीच्या आवाजाचा अहवाल सादर करत असते. परंतू यावर्षी पावसामुळे गणेश विसर्जन मिरवणुकांदरम्यान होणार्‍या वाद्यांच्या आवाजाच्या पातळीची मोजणी करणे शक्य झाले नाही.
या वर्षी आवाज फाऊंडेशनला गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यानच्या डीजेच्या आणि ढोल ताशांच्या आवाजांच्या पातळीचा अहवाल सादर करता येणार नाही. आवाजामुळे वयोवृद्धांना आणि लहान मुलांना फार प्रोब्लेम होतो. गणेशोत्सवात आवाजाची पातळी जास्त प्रमाणावर असते. 70 डेसिबल पेक्षा अधिक असलेल्या आवाजामुळे मनुष्याचा आरोग्याला मोठ्या प्रमाणावर हानी होते. या आवाजामुळे बहिरेपणा, रक्तदाब, हृदयरोग अशा विविध आजारांचा सामना नागरिकांना करावा लागतो. गणेशोत्सवात साधारणत: ध्वनी प्रदूषणाची तीव्रता 150 डेसिबलपर्यंत पोहोचते. गेल्या 21 वर्षांपासून याच आवाजाची मर्यादा ‘आवाज फाऊंडेशन’ सादर करत असते. परंतू, यावर्षी पाऊसामुळे त्यांना अहवाल सादर करणं शक्य झालं नाही.
advertisement
गेल्या अनेक वर्षांपासून आवाजाच्या पातळीमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे आवाज फाउंडेशनच्या अहवालातून समोर आले आहे. गेल्या वर्षापासून ढोल ताशाचा वापर अनेक गणेश मंडळ करताना दिसत आहे. तरीही देखील आवाजाची पातळी वाढताना दिसत आहे. विशेष म्हणजे, सरकार देखील या आवाजाच्या प्रस्तावावर कोणताही निर्णय घेताना दिसत नाही, अशी प्रतिक्रिया आवाज फाउंडेशनचे सुमैरा अब्दुल अली यांनी दिली आहे. विसर्जनाच्या दिवशी संततधार पाऊस पडल्यामुळे आवाजाची नोंद नीट होत नसल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे यंदा फाऊंडेशनकडून विसर्जन मिरवणुकीदरम्यान आवाजाची पातळी मोजण्यात आली नाही. ‘आवाज फाऊंडेशन’ 2003 वर्षापासून गणेशोत्सवातील आवाजाची पातळी मोजत आहे.
advertisement
गेल्या काही वर्षांपासून ध्वनी प्रदूषण वाढत असल्याचे ‘आवाज फाऊंडेशन’च्या अहवालातून दिसत आहे. 2019 साली 121.3 डेसिबल, 2020 साली 100.7 डेसिबल, 2021 साली 93.1 डेसिबल, 2022 साली 120.2 डेसिबल, 2023 साली 114.7 डेसिबल, 2024 साली 115 डेसिबल इतकी आवाजाची पातळी होती. अनेक गणेश मंडळांनी गेल्या वर्षी ढोल ताशांचा वापर केला तरी, आवाजाची आद्रता एवढ्या प्रमाणावर होती. प्रशासनाने आवाजाच्या पातळीवर घालून दिलेल्या मर्यादा न पाळल्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणावर हे ध्वनी प्रदूषण होत असल्याचे दिसत आहे.
मराठी बातम्या/मुंबई/
Noise Pollution : पाऊसामुळे आवाज गायब? विसर्जन मिरवणुकीत यंदा डेसिबल चेक ठप्प
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement