Numerology: पितृपक्षातील संकष्टी चतुर्थी या 3 मूलांकाना लकी; गणेश कृपा कोणावर कशी होणार?

Last Updated:

Numerology 10 September 2025: ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 09 सप्टेंबर 2025 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल, त्याबद्दल ज्योतिषी चिराग दारूवाला यांनी सांगितलेलं भविष्य जाणून घ्या.

News18
News18
नंबर 1 (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
आज बुधवारी चांगल्या मूडमध्ये असाल. कोणाकडून मदतीच्या ऑफर्स स्वीकारताना सावध राहा. कारण फसवणुकीची शक्यता जास्त आहे. आज खर्च जास्त होऊ शकतात. अपेक्षित आर्थिक लाभ प्रत्यक्षात येणार नाहीत. जोडीदाराच्या आयुष्यात चांगले बदल घडवण्याची संधी आहे.
Lucky Number : 11
Lucky Colour : Peach
नंबर 2 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
advertisement
बुधवारचा दिवल कामांसाठी चांगला वरिष्ठांकडे प्रलंबित असलेल्या प्रपोझल्सचा निकाल तुम्हाला अनुकूल असा लागेल. आईशी प्रेमळ संवाद होईल. आरोग्य उत्तम असल्याने दिवसभर उत्साह असेल. कामाच्या ठिकाणी तुम्ही ज्या व्यक्तीकडे आकर्षित झाला आहात, त्या व्यक्तीलाही तुमच्याप्रति तीच भावना वाटत आहे. पहिलं पाऊल तुम्ही उचलायचं आहे.
Lucky Number : 5
Lucky Colour : Green
advertisement
नंबर 3 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
आज बुधवारी छोट्या प्रयत्नांतून मोठा लाभ मिळेल. कला, साहित्य आणि संगीतात आज खूप रस घ्याल. विरोधकांना शांत करायला आज फारसं काही लागणार नाही. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यामुळे कामगिरी सुधारेल. रोमँटिक वातावरण आहे. जोपर्यंत आहे तोपर्यंत त्याचा आनंद घ्या.
advertisement
Lucky Number : 4
Lucky Colour : Electric Grey
नंबर 4 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22, 31यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
सामाजिक कार्यात पुढे असाल, दुर्बलांच्या प्रगतीसाठी मदत करण्याची संधी मिळेल. आज तुमची मानसिक आणि शारीरिक क्षमता सुधारेल. या काळात आरोग्याची काळजी घ्या. पब्लिक रिलेशन्समधून पुरेसे लाभ मिळतील. काटकसरीमुळे जोडीदाराशी असलेल्या रिलेशनशिपला धक्का पोहोचेल.
advertisement
Lucky Number : 6
Lucky Colour : Red
नंबर 5 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
कामांचा गोंधळ उडू शकतो. आज संमिश्र भावना उचंबळून येत आहेत. डोळ्यांची समस्या चिंताजनक होऊ शकते. डॉक्टरांचा सल्ला घ्या. नवा प्रोजेक्ट ऐरणीवर आहे. वैवाहिक जीवन चांगले असेल.
advertisement
Lucky Number : 11
Lucky Colour : Peach
नंबर 6 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15, 24 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
आज सामाजिक कार्यात सहभागामुळे तुमची दखल घेतली जाईल. कितीही प्रयत्न केले, तरी विरोधक तुम्हाला या वेळी त्रास देऊ शकणार नाहीत. बँकर्स, इन्शुरन्स कंपन्या आणि आर्थिक संस्थांशी डील करण्याचा दिवस आहे. जोडीदाराशी काही नाजूक क्षण शेअर कराल. त्यामुळे आयुष्य खास होईल.
advertisement
Lucky Number : 1
Lucky Colour : Light Red
नंबर 7 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
बुधवार मजा करण्यासाठी चांगला दिवस आहे. आजचा दिवस मानसिक आणि शारीरिक कसोटीचा असेल. आरोग्य चांगलं आहे. त्यामुळे बराच काळ राबू शकाल. आज उधळपट्टीच्या मूडमध्ये असाल. प्रिय व्यक्तीशी वादाची शक्यता आहे. आपोआप सारं काही ठीक होईल; पण तुम्ही काही जास्त नका.
Lucky Number : 7
Lucky Colour : Maroon
नंबर 8 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17, 26 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
कुठेतरी महत्त्वाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहाल. आनंदी आणि समाधानी असाल, उत्तम यशाचा दिवस आहे. खटला होऊ शकतो. भविष्याचं नियोजन करताना उत्तम कल्पना सुचेल. जोडीदारासोबत समस्या असेल. बोलून अडचणी सोडवा.
Lucky Number : 17
Lucky Colour : White
नंबर 9 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18, 27 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
कामात आज कोणाचं सहकार्य मिळणार नाही. मुलांशी संबंधित वाईट बातमीमुळे दिवस खराब होईल. शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सर्वोच्च पातळीवर आहात. स्टॉक मार्केटमध्ये तोट्याची खूप शक्यता आहे, जपून विवेकीपणे गुंतवणूक करा. जोडीदाराशी बोला, भावना व्यक्त करा. त्यातून प्रेमजीवन सुधारेल.
Lucky Number : 18
Lucky Colour : Rosy Brown
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Numerology: पितृपक्षातील संकष्टी चतुर्थी या 3 मूलांकाना लकी; गणेश कृपा कोणावर कशी होणार?
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement