वर उल्लेख केलेली घटना ज्याच्या बाबतीत घडली, त्या विद्यार्थ्याचं नाव पराग अगरवाल. राजस्थानात अजमेरमध्ये एका सुशिक्षित कुटुंबात पराग अगरवाल यांचा जन्म झाला. त्यांचे वडील भारतीय अणुऊर्जा विभागात वरिष्ठ अधिकारी होते, तर त्यांच्या मातोश्री इकॉनॉमिक्सच्या निवृत्त प्राध्यापिका. 2005 साली पराग अगरवाल यांनी भारतीय पातळीवर 77वा क्रमांक मिळवून मुंबई आयआयटीतून ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. त्यानंतर त्यांनी कम्प्युटर सायन्स या विषयातून पीएचडी करण्यासाठी अमेरिकेतली स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी गाठली.
advertisement
गणिताची शिक्षिका झाली शेतकरी! सेंद्रीय शेतीतून मिळवलं कोट्यवधींचं उत्पन्न
पराग अगरवाल यांच्या करिअरची सुरुवात मायक्रोसॉफ्ट रिसर्च आणि याहू या कंपन्यांमध्ये केलेल्या इंटर्नशिप्समधून झाली. त्यानंतर 2011 साली पराग यांना ट्विटर कंपनीत संधी मिळाली. तिथे सहा वर्षं काम केल्यानंतर त्यांना चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर म्हणून बढती मिळाली. अॅडम मेसिंजर यांनी त्या पदाचा राजीनामा दिल्यावर पराग अगरवालांची त्या जागेवर नियुक्ती झाली.
नंतर त्यांची प्रगती होत गेली आणि एके दिवशी ते ट्विटर कंपनीचे सीईओ झाले. त्यांचं वेतन 8 कोटी होतं आणि त्यांना देण्यात आलेल्या शेअर्सचं मूल्य 94 कोटी रुपये होतं. त्यामुळे त्यांचं एकूण वेतन 100 कोटी रुपये होतं; मात्र या पदावर ते एक वर्षभरही टिकू शकले नाहीत. कारण एलॉन मस्क या जगातल्या सर्वांत श्रीमंत व्यक्तीने 44 अब्ज डॉलर्सच्या डीलमध्ये ट्विटर कंपनी विकत घेतली. त्यानंतर काही महिन्यांतच कंपनीतून अनेकांची गच्छंती झाली. त्यात पराग अगरवाल यांचाही समावेश होता.
सध्या पराग अगरवाल यांच्या लिंक्डइन बायोमध्ये केवळ 'फॉर्मर सीईओ अॅट ट्विटर' एवढीच ओळख लिहिलेली आहे. पराग यांच्या पत्नीचं नाव विनीता असून, ती अँडरसन हॉरोवित्झ या व्हेंचर कॅपिटल फर्ममध्ये जनरल पार्टनर आहे. या दाम्पत्याला दोन मुलं आहेत.