ओएनजीसीच्या या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीशी संबंधित सर्व तपशील तपासून नंतर अर्ज करता येईल. पात्र आणि इच्छुक उमेदवार ongcindia.com अधिकृत वेबसाइटद्वारे संबंधित पदांसाठी अर्ज करू शकतात. अर्ज करण्यासाठी 23 पर्यंत मुदत आहे.
'या' पदांसाठी होणार भरती
ओएनजीसीमध्ये एकूण 262 रिक्त पदांवर भरती केली जाणार आहे. जनरल ड्युटी मेडिकल ऑफिसर, इमर्जन्सी मेडिकल ऑफिसर, फिजिशियन, सर्जन आणि होमिओपॅथी डॉक्टर ही पदे रिक्त आहेत.
advertisement
( हेही वाचा - पुण्याच्या ट्रॅफिकमधून काढला मार्ग, आयटी इंजीनिअरचा भन्नाट प्रयोग, नेमकं काय केलं? )
अर्ज करण्यास इच्छुक असलेल्या उमेदवाराची पात्रता
- जनरल ड्युटी मेडिकल ऑफिसर आणि इमर्जन्सी मेडिकल ऑफिसर या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त युनिव्हर्सिटी किंवा कॉलेजची बॅचलर ऑफ मेडिसिन आणि बॅचलर ऑफ सर्जरी (एमबीबीएस) पदवी असणं गरजेचं आहे.
- फिजिशियन पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे जनरल मेडिसिन (एमडी) पदवी असणं गरजेचं आहे.
- सर्जन पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे जनरल सर्जरी (एमएस) पदवी असणं गरजेचं आहे.
- होमिओपॅथी डॉक्टरांच्या पदांसाठी बॅचलर ऑफ होमिओपॅथिक मेडिसिन अँड सर्जरी (बीएचएमएस) पदवी असलेले उमेदवार अर्ज करू शकतात.
निवड प्रक्रिया
गुणवत्तेचं मूल्यांकन आणि मुलाखतीच्या आधारे ओएनजीसीतील वैद्यकीय विभागात अर्ज करणाऱ्या उमेदवारांची निवड केली जाईल.
ऑईल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजेच ओएनजीसी ही भारतातील एक सरकारी कंपनी आहे. देशामधील सात महारत्न कंपन्यांपैकी एक असलेली ओएनजीसी खनिज तेल व नैसर्गिक वायूचा शोध घेणारी भारतामधील सर्वात मोठी कंपनी आहे. भारताला लागणारं 69 टक्के खनिज तेल व 62 टक्के नैसर्गिक वायू ही कंपनी पुरवते.
