दुपारी एक वाजता बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळासह ६ ठिकाणी निकाल पाहता येईल. दहाविच्या विद्यार्थ्यांना त्यांचे विषयनिहाय गुण ऑनलाइन निकालात पाहता येतील. तसंच निकालीची छापील प्रतही विद्यार्थ्यांना मिळू शकेल. https://mahresult.nic.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालासोबत निकालाबाबतची इतर माहिती सविस्तर उपलब्ध होईल. शाळा आणि संस्थांसाठी https://mahahsscboard.in या संकेतस्थळावर एकत्रित निकाल पाहता येणार आहे.
advertisement
SSC Result 2024 : कुठे आणि कसा पाहायचा दहावीचा निकाल? एका क्लिकवर संपूर्ण माहिती
यंदा निकालादरम्यान एक मोठा बदल करण्यात आला आहे. यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना रिचेकिंगला टाकायचं आहे किंवा आपला उत्तर पत्रिका पाहायची आहे त्यासाठी काही बदल बोर्डनं केले आहेत. जे विद्यार्थी आणि पालकांसाठी खूप समजून घेणं महत्त्वाचे आहे.
Maharashtra SSC Result 2024 : दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी, निकालात मोठा बदल
दहावीसाठी एकूण 72 विषयांसाठी परीक्षा घेण्यात आली होती. ९ विभागीय मंडळातून 15 लाखहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 14 लाख 84 हजार विद्यार्थ्या उत्तीर्ण झाले. 25 हजार 770 रिपीटर विद्यार्थी होते. त्यापैकी 12 हजार 900 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.विभागनिहाय कसा आहे निकाल, मुलींचा निकाल कसा आणि दरवर्षी प्रमाणे मुलांपेक्षा मुलींच्या निकालाची टक्केवरी अधिक आहे.
Maharashtra SSC Result 2024 : कोकण पुन्हा अव्वल, मुलींची बाजी
विद्यार्थ्यांना काही कारणांमुळे इंटरनेटवर निकाल पाहता येणार नाही, त्यांना SMS द्वारे पाहता येणार आहे. काही ठिकाणी लाईट जाते किंवा काही अडचणी येतात त्यामुळे निकाल पाहता येत नाही. मग अशावेळी तुम्ही टेन्शन घेऊ नका. SMS द्वारे घरबसल्या तुम्ही निकाल कसा पाहू शकता ते आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
लाईट गेली चिंता नको, इंटरनेशिवायही घरबसल्या असा पाहा निकाल
दहावीत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना न्यूज18 मराठीच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा. तुमचा निकाल तुम्ही ऑनलाईन साईटवरुन प्रिंट काढू शकता.
