Maharashtra SSC Result 2024 : लाईट गेली चिंता नको, इंटरनेशिवायही घरबसल्या असा पाहा निकाल
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
Maharashtra SSC Result 2024 : काही ठिकाणी लाईट जाते किंवा काही अडचणी येतात त्यामुळे निकाल पाहता येत नाही. मग अशावेळी तुम्ही टेन्शन घेऊ नका. SMS द्वारे घरबसल्या तुम्ही निकाल कसा पाहू शकता ते आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
मुंबई : दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. मात्र विद्यार्थ्यांना थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे. दुपारी 1 वाजता ऑनलाईन निकाल पाहता येणार आहे. राज्याचा दहावीचा निकाल एकूण 95.81% टक्के लागला आहे. 15 लाखहून अधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदा कोकण विभाग अव्वल तर मुलींनी बाजी मारली आहे. तर सर्वात कमी निकाल नागपूर विभाग 94.73% लागला आहे.
ज्या विद्यार्थ्यांना काही कारणांमुळे इंटरनेटवर निकाल पाहता येणार नाही, त्यांना SMS द्वारे पाहता येणार आहे. काही ठिकाणी लाईट जाते किंवा काही अडचणी येतात त्यामुळे निकाल पाहता येत नाही. मग अशावेळी तुम्ही टेन्शन घेऊ नका. SMS द्वारे घरबसल्या तुम्ही निकाल कसा पाहू शकता ते आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
advertisement
SMS च्या माध्यमातून असा बघा निकाल
विद्यार्थ्यांनी आपल्या मोबाइल फोनवरुन एक एसएमएस करायचा आहे.
त्या नंतर लगेचच त्यांना मोबाइलवर निकाल पहायला मिळेल.
यासाठी विद्यार्थ्यांनी MHSSC टाईप करुन स्पेस द्यायचा आहे.
यानंतर आपला Seat Number टाईप करायचा आहे.
यानंतर हा एसएमएस 57766 या क्रमांकावर पाठवायचा आहे.
तुम्ही हा एसएमएस पाठवताच अवघ्या काही क्षणात विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल पहायला मिळेल.
advertisement
दहावीच्या निकालाचे काही महत्त्वाचे अपडेट्स
एकूण उत्तीर्ण विद्यार्थी
मुली .97.21%
मुले 94.56%
मागील वर्षीचा निकाल 93.83%
गेल्या वर्षी पेक्षा वाढ / घट ....95.81% म्हणजे 1.98 टक्के ज्यादा
नऊ विभागीय मंडळ निकाल
पुणे 96.44%
नागपूर 94.73.%
छत्रपती संभाजीनगर 95.91 %
मुंबई .95.83%
कोल्हापूर 97.45%
अमरावती 95.58%
नाशिक 95.28%
लातूर 95.27%
कोकण 99.01 %
advertisement
किती वाजता जाहीर होणार निकाल?
दहावीच्या विद्यार्थ्यां आणि पालकांना आज दुपारी 1 वाजता ऑनलाईन पाहता येणार आहे. विद्यार्थी आणि पालकांसाठी बोर्डानं ऑनलाईन निकाल कुठे पाहायचा याच्या साईची माहिती देखील दिली आहे.
1- mahresult.nic.in
2- mahahsscboard.in
3- results.digilocker.gov.in
4- results.gov.in
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
May 27, 2024 12:06 PM IST
मराठी बातम्या/करिअर/
Maharashtra SSC Result 2024 : लाईट गेली चिंता नको, इंटरनेशिवायही घरबसल्या असा पाहा निकाल


