अल्मोडा : एकीकडे सरकारी शाळांच्या तुलनेत खासगी शाळांकडे पालकांचा ओढा वाढत आहे. असे असताना काही सरकारी शाळा आजही आपले महत्त्व अधोरेखित करत आहेत. आज अशाच एका शाळेबाबत आपण जाणून घेणार आहोत, ज्या शाळेतील माजी विद्यार्थी आज देशातील विविध क्षेत्रात नामांकित पदावर कार्यरत आहे.
उत्तराखंड राज्यातील अल्मोडा येथे ही शाळा आहे. जीआयसी असे या शाळेचे नाव आहे. आता या शाळेला पीएम श्री अटल उत्कृष्ट राजकीय उच्च माध्यमिक विद्यालयाचा दर्जा मिळाला आहे. 1889 मध्ये या शाळेची स्थापना झाली होती. या शाळेची इमारत आता शहरातील ऐतिहासिक इमारतींमध्ये सहभागी आहेत.
advertisement
या शाळेचा इतिहास खूप शानदार आहे. या शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी केवळ अल्मोडाच नाही तर संपूर्ण उत्तराखंडला गौरव मिळवून दिला आहे. या शाळेतील अनेक विद्यार्थी आयएएस, पीसीएस, राजकारणी आणि अभिनेते आहेत. तसेच अनेक विद्यार्थी आज परदेशातही नोकरी करत आहेत.
दोन वेळा अपयश, पण ती हरली नाही, कनिष्ठ लिपिकाची मुलगी झाली नायब तहसिलदार, आस्थाची प्रेरणादायी गोष्ट!
दिव्यांशी पाठक या विद्यार्थिनीने सांगितले की, तिने याठिकाणी अकरावीत प्रवेश घेतला तेव्हा तिला इथे महान कवी आणि लेखक सुमित्रानंदन पंतसुद्धा याच शाळेत शिकल्याचे समजले. त्यानंतर तिला आणखीनच अभिमान वाटला. सुमित्रानंदन पंत यांनी लिहिलेल्या पुस्तकांचा त्यांच्या अभ्यासक्रमात समावेश आहे. शाळेतील शिक्षक व कर्मचारी नेहमीच मुलांना चांगल्या अभ्यासासाठी व पुढील प्रगतीसाठी प्रेरित करतात. माझे स्वप्न आहे की मी पहिल्याच प्रयत्नात आयआयटीची प्रवेश परीक्षा उत्तीर्ण करावी आणि शाळेचा मान वाढवावा, असे ती म्हणाली.
NEET चा दबाव, आणखी एका विद्यार्थिनीची आत्महत्या, अपेक्षित यश न मिळाल्याने उचललं टोकाचं पाऊल
प्राचार्य राजेश बिष्ट यांनी सांगितले की, 1889 मध्ये हायस्कूल आणि 1921 मध्ये कनिष्ठ महाविद्यालयाची मान्यता मिळाली. या शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी या शाळेला नावलौकिक मिळवून दिला आहे. पद्मश्री छत्रपति जोशी, माजी जनरल बीसी जोशी, आयएएस कमलेश पंत, माजी राज्यपाल बीडी पांडे, प्रसिद्ध कवी सुमित्रा नंदन पंत, जनसंघाचे संस्थापक सदस्य सोबन सिंह जीना, डॉ. मुरली मनोहर जोशी, अल्मोडा येथील खासदार अजय टम्टा आणि आमदार मनोज तिवारी यांच्या अनेक जणांनी याठिकाणी शिक्षण घेतले. सध्या या शाळेत सुमारे 650 विद्यार्थी शिकत आहेत आणि अनेक विद्यार्थ्यांनी IIT आणि NEET ची परीक्षाही उत्तीर्ण केली आहे.
