सागर : काही लोकांना असे वाटते की फक्त मुलेच कुटुंबाचं नाव मोठं करू शकतात. मात्र, मुलीसुद्धा मुलांपेक्षा कमी नाही. आज प्रत्येक क्षेत्रात मुली या सर्वांच्या पुढे जाऊन आपल्या कुटुंबाचे, आपल्या परिसराचे नाव मोठे करत आहेत. अशाच एका कुटुंबातील एक नव्हे तर दोन मुली म्हणजे दोन बहिणी सरकारी अधिकारी झाल्या आहेत. एकीची नायब तहसीलदार तर दुसरीची मुख्याधिकारी पदावर निवड झाली आहे.
advertisement
नुकताच एमपीपीएससी 2021 परिक्षेचा निकाल लागला. यामध्ये हिलगन गावातील आणि सागर विद्यापीठात लिपिक पदावरुन निवृत्त झालेले रामप्रकाश चौबे यांची मुलगी आणि त्यांच्या भावाची मुलगी यांनी कमाल केली. यामध्ये रामप्रकाश चौबे यांची मुलगी आस्था चौबे हिची नायब तहसीलदार पदावर निवड झाली आहे. आस्थाने 2019 मध्ये परीक्षा दिली होती. ती मुख्य परीक्षा उत्तीर्ण झाली. मात्र, प्रीलिम्सच्या सुधारित निकालात तिचे नाव आले नाही. यामुळे ती मुलाखत देऊ शकली नाही. दरम्यान, आता तिने यश मिळवले आहे. आस्थाचे शालेय शिक्षण ढाना केंद्रीय विद्यालयातून केले आणि पदवीचे शिक्षण डिग्री महाविद्यालयातून पूर्ण केले. यानंतर त्याने एमपीपीएससीची तयारी सुरू केली.
modi 3.0 : नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान होणार, यांना मिळालं शपथविधीचं आमंत्रण
प्राचीने दुसऱ्या प्रयत्नात यश मिळवलं -
रामप्रकाश यांचे भाऊ आणि पोलीस उपनिरीक्षक हरिओम चौबे यांची मुलगी प्राची चौबे हिची जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी पदासाठी झाली आहे. तिरुपतीपुरम कॉलनीत राहणारी प्राची ही सध्या डीएसपी पदासाठी प्रतीक्षा यादीत आहे. प्राचीने 2020 मध्ये पहिल्याच प्रयत्नात मध्य प्रदेश उच्च परीक्षा राज्य लोकसेवा आयोगामध्ये नायब तहसीलदार पद मिळवले होते. सध्या ती उज्जैनमध्ये तैनात आहेत.
शेतकऱ्याचा पोरगा झाला सरकारी अधिकारी, तिसऱ्या प्रयत्नात मिळवलं यश, कसा होता हा प्रवास?
प्राची 2021 च्या परिक्षेत मिळालं यश -
2021 च्या परिक्षेत तिने यश मिळवलं. मागच्या वर्षी तिचे लग्न एका व्यावसायिकासोबत झाले होते. प्राचीने आपले शालेय शिक्षण हे सेंट जोसेफ कॉन्व्हेंट शाळेतून केले आहे. यानंतर डॉक्टर हरी सिंह गौर विद्यापीठातून फॉरेन्सिक विषयात पदवीचे शिक्षण घेतले. यामध्ये ती टॉपर होती. प्राचीने दहावीपासूनच मुलांची ट्यूशन घ्यायची. यानंतर ती इंदूरला गेली. इथे तिने सेल्फ स्टडीवर दोन वेळा ही परीक्षा पास केली. दरम्यान, दोन्ही बहिणींच्या यशानंतर सर्व कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे.
